डॉ बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे स्वप्नद्रष्टे होते.त्यांनी त्यांच्या आयुष्यात जी काही स्वप्न बघितली ती पूर्ण करण्यासाठी जीवाचें रान केलं.आपल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या ज्ञातीतील लोकांच्या सुधारणेविषयी उन्नतीची त्यांना अनेक स्वप्ने पडत होती.त्यातीलच एक स्वप्न होतं या लोकांकरिता एक प्रशस्त महाविद्यालय असलं पाहिजे जेणेकरून शिक्षणामुळे त्यांच्यातील अज्ञानमूलक भोळ्या समजूती नष्ट होतील आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची पिळवणूक कुणीही करणार नाही.
नुसत्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाने सामाजिकदृष्ट्या प्रगती होतं नाही.तर उच्च शिक्षणामुळे होणारा सर्वात मोठा फायदा हा की त्यांच्यांत आत्मविश्वास निर्माण होईल व हाच आत्मविश्वास त्यांच्या उन्नतीची पहिली पायरी होय.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात आपल्या लोकांसाठी एक महाविद्यालय असलं पाहिजे हे खुप वाटतं होतं अनेक वर्षे त्यांच्या मनात हे वादळ निर्माण झाले होते.या महाविद्यालयातून अनेक क्षेत्रांतील नेते निर्माण होतील अशी आशा त्यांना होती.
यासाठी ते योग्य काळाची आणि संधीची वाट पाहत होते ती त्यांना मिळाली १९४४-४५ या सालात.
मुंबईत दर वर्षी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच होती.
ती १९४४ साली ४१००० एवढी झाली.या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी महाविद्यालय कमी पडू लागली.
अनेक नवीन महाविद्यालय निर्माण होवू लागली पण ती मुंबई शहाराच्या बाहेर.
मुंबईत या काळात एकही महाविद्यालय निघालं नाही.त्यामुळे जी काही महाविद्यालय होती ती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात असमर्थ होती.
ती योग्य वेळ पाहून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी २० जून १९४६ रोजी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
सुरवातीच्या काळात सिद्धार्थ महाविद्यालय हे मरीन लाइन्स येथील बॅरेक मध्ये भरत होते.
१९४६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती.
सिद्धार्थ महाविद्यालयाने अनेक बाबतीत विक्रम केला आहे त्यापैकी काही विक्रम हे सांगितले पाहिजे.
मुंबई विद्यापीठांशी संलग्न झालेल्या महाविद्यालयाच्या इतिहासातील पहिले महाविद्यालय हे सिद्धार्थ महाविद्यालय आहे.
जेव्हा सिद्धार्थ महाविद्यालय सुरू झालं तेव्हा पहिल्याच वर्षी B.A व B.Sc पर्यंत सर्व वर्ग उघडण्यात आले.
इतर महाविद्यालयात अशी पद्धत नव्हती ते प्रथम दोन वर्ग सुरू करतं तो ही दुसरा वर्ग हा रिकामाच असे.
नंतर दर वर्षी एक एक वर्ग वाढवत.सिद्धार्थ महाविद्यालयाने ही पुराण परंपरा मोडीत काढून संपूर्ण महाविद्यालय म्हणून जन्म घेतला.हा पहिला विक्रम.
सिद्धार्थ महाविद्यालयाने जन्म घेतला तो बालक म्हणून नाही तर चांगला सशक्त तरुण म्हणून.
पहिल्याच वर्षात सिद्धार्थ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या ही १४०० च्या वर गेली होती.
जी महाविद्यालयाच्या इतिहासातील विक्रमी संख्या आहे हा इतिहास त्याकाळी दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालयात घडला नाही. हा दुसरा विक्रम.
भारत हा स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता.कोणत्याही स्वतंत्र राष्ट्राला संरक्षण करण्याचे सामर्थ्य आपल्या अंगी असलेच पाहिजे.ते सामर्थ्य म्हणजे भू सेना, नौ सेना आणि वायू सेना.
भारताचे संरक्षणमंत्री सरदार बलदेव सिंह यांनी घोषणा केली होती, विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैनिक शिक्षण घेतलं पाहिजे.
त्यावेळी University Officer’s Training Corps ही संस्था स्थापन केली. (आजची NCC.)
या कोअरची संख्या मर्यादित असल्यामुळे अनेक महाविद्यालयांना इच्छा असूनही त्यांना कोअर मध्ये प्रतिनिधित्व मिळाले नाही परंतु सिद्धार्थ महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी एक पथक स्थापन केले.हा तिसरा विक्रम.
तसेच चौथा आणि सर्वात महत्त्वाचा विक्रम म्हणजे. शासकीय सेवेत असणाऱ्या लोकांना विश्वविद्यालयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्याकाळी कला शाखेचे वर्ग सकाळी ७:३० ते १०:४५ या वेळेत भरत जेणेकरून या वेळेत आपल्या वर्गांना उपस्थित राहून नंतर आपापल्या सेवेसाठी जाणं हे नोकरी करणाऱ्यांना शक्य होतं. असे शिक्षण घेणारे त्याकाळी ६००च्या वर नोकरीपेशा विद्यार्थी होते जे नंतरच्या काळात मोठे अधिकारी झाले.
————————————————————————–
हे चार विक्रम सिद्धार्थ महाविद्यालयाने केलेले आहेत. एकाच लेखात सर्व काही मांडता येणार नाही. बाकीचे अजूनही खुप काही शेअर करायचं आहे. इथं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे काही फोटो प्रत्येक लेखात टाकणार आहे जे फक्त सिद्धार्थ महाविद्यालयाशी निगडित आहेत. आजचा पहिला फोटो. जो मरीन लाइन्स येथील बॅरेक मध्ये सुरू झालेल्या महाविद्यालयाच्या आवारातील आहे.
(डावीकडून) प्रा. व्ही.जी. राव, सी. एन्. मोहिते गुरुजी, उपप्राचार्य एच.आर. कर्णिक, कमलाकांत चित्रे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, म. भि. चिटणीस आणि प्राचार्य व्ही. एस्. पाटणकर.
लेखन – Subhash Wankhade
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
सिद्धार्थ महाविद्यालय – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न 2
हे ही वाचा.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक धोरण
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 07, 2021 12 : 16 PM
WebTitle – Siddharth College – Dr. Babasaheb Ambedkar’s dream 2021-04-07