देशभरात ,आणि इतर जगातही कोरोनाचा कहर सुरूच आहे.कोरोना मुळे अनेकांनी आपले प्रियजन गमावले आहेत.यातच स्वत:चे जीव धोक्यात घालून कोरोना पासून नागरिकांचे संरक्षण करणारे डॉक्टर्स नर्सेस यांनीही आपल्या प्राणांचा बळी मानवतेसाठी दिलेला आहे.तसेच अनेक पोलिस कर्मचारी सफाई कामगार सुद्धा कर्तव्य बजावताना या लढाईत धारातीर्थी पडले आहेत.त्यामुळे सामान्य नागरिकांनी याचे गांभीर्य ओळखले पाहिजे. कोरोना रुग्णांना (corona patient) कोरोनाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी धडपडणारा अवघ्या 26 वर्षांचा कोरोना योद्धा (corona warrior) स्वतः कोरोनाच्या विळख्यात सापडला. रुग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालून लढा देणारा कोरोना वॉरिअर्स स्वतः मात्र कोरोनाविरोधातील लढाई हरला आहे. कोरोनामुळे मध्य प्रदेशातील (madhya pradesh) डॉ. शुभम उपाध्याय (dr. subham upadhyay) यांचा मृत्यू झाला आहे.
या घटना आपल्याला आतून हलवून टाकतात, अवघे 26 वय हे काही जाण्याचे वय नाही.
अशा उमद्या देशाची संपत्ती असणाऱ्या तरुणांना गमावणे देशासाठी ही मोठी हानी आहे.
त्यामुळे आमची सर्व नागरिकांना कळकळीची विनंती आहे.सरकारी पातळीवर ज्या उपाययोजना सुरू आहेत.
आणि शासन प्रशासन कर्मचारी वर्ग आपले जीव धोक्यात घालून मानवतेसाठी संघर्ष करत आहेत.
एक नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडू शकतो. नव्हे ती पाडलीच पाहिजे.
कायद्याचे पालन करणे, सुचनांचे पालन करणे आणि त्या कसोशीने पाळणे हे नागरिकांचे कर्तव्य नागरिकांनी पार पाडले पाहिजे
.ही आमची विनंती आहे.
टीम जागल्या भारत
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)