नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आफताब अमीन पूनावाला (२८) या तरुणाने श्रद्धा वालकर (२६) या तरुणीची हत्या करून Shraddha Murder Case तिच्या शरीराचे सुमारे ३५ तुकडे केले. इतकच नाही तर त्याने घरातील बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले, नंतर ते तुकडे धुवून, पॉलिथिनमध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले.आणि विल्हेवाट लावण्यासाठी नंतर जंगलात फेकले.या घटनेने खळबळ माजली असून सोशल मिडियात ही बातमी मोठ्याप्रमाणात शेअर केली जात आहे.
22 दिवस तो मृतदेहासोबत घरातच रहात होता Shraddha Murder Case
सोमवारी सायंकाळपर्यंत पोलिसांना 35 पैकी सुमारे 13 मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. सर्व तुकडे हाडांच्या रूपात मिळत आहेत. आरोपीने 18 मे रोजी श्रद्धाचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. त्यानंतर घरातील बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे करून ते तुकडे धुवून पॉलिथिनच्या बॅग मध्ये पॅक करून फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर एका बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे पिशवीत ठेवून जंगलात फेकून देत असे. अशाप्रकारे आफताब तब्बल २२ दिवस मृतदेहाचे तुकडे फेकत राहिला. 22 दिवस तो मृतदेहासोबत घरातच रहात होता.
रोज रात्री दोन वाजता तो मेहरौलीच्या जंगलात तुकडे टाकायला जायचा.
मेहरौली पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर आरोपी तरुणाला अटक केली असता, त्याने हा खळबळजनक खुलासा केला.
दोघेही एकमेकांवर संशय घेत होते, असे आरोपी तरुणाचे म्हणणे आहे.तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना डेक्सटर या परदेशी गुन्हेगारी मालिकेतून आली.
भांडण झाल्यावर श्रद्धा निघून गेल्याचे सांगून आफताब पोलिसांची दिशाभूल करत होता.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या अमानवीय कृत्याचा पर्दाफाश झाला. कृत्याबद्दल आफताबला कसलाही पश्चाताप नाही.
चॉपर च्या सहाय्याने मृतदेहाचे सुमारे 35 तुकडे
दक्षिण जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अंकित चौहान यांनी सांगितले की, श्रद्धा मुंबईतील मालाड येथे राहत होती आणि आफताबही मुंबईचा रहिवासी होता. बॉम्बल डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्री झाली होती. लवकरच ते दोघे प्रेमात पडले आणि मुंबईत सहमतीने लिव्ह-इन रिलेशनशिप नात्यात राहू लागले होते.
काही दिवसांनी त्यांच्या नात्यात वितुष्ट निर्माण झालं भांडण सुरू झालं. ते एकमेकांवर संशय घेत असत. याच कारणावरून त्यांच्यात भांडणे होत होती. बाहेर फिरायला गेल्यास सर्व काही ठीक होईल असे त्यांना वाटले. हिमाचल प्रदेशला भेट देऊन ते दिल्लीत आले.
15 मे रोजी छतरपूर, मेहरौली येथे भाड्याने खोली घेतली. तिसर्याच दिवशी 18 मे रोजी त्यांच्यात भांडण झाले आणि आफताबने श्रद्धाचे तोंड एका हाताने दाबले. श्रद्धाने आरडाओरडा सुरू केल्यावर आरोपी आफताब ने दुसऱ्या हाताने तिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मृतदेह बाथरूममध्ये ठेवला.
त्याने चॉपर च्या सहाय्याने मृतदेहाच्या सुमारे 35 तुकडे केले आणि नंतर ते फ्रीझमध्ये ठेवले.
रात्री 2 वाजता फ्रीझमधून मृतदेहाचा तुकडा बाहेर काढून तो मेहरौलीच्या जंगलात टाकायचा.
त्याचवेळी मृतदेह घरात ठेवल्याने दुर्गंधी येते हे आरोपी आफताबला माहीत होते. त्यामुळे तो नेहमी घरात अगरबत्ती जळत ठेवत असे. याशिवाय तो रूम फ्रेशनरचाही वापर करत असे. अशा प्रकारे, त्याने सुमारे 22 दिवसांत बरेच रूम फ्रेशनर रिकामे केले होते.
खाद्यपदार्थही फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते
आरोपी फ्रिजच्या बाजूच्या डोअर मध्ये खाद्यपदार्थ ठेवायचा. दुसरीकडे त्याच फ्रीजमध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले.
शीतपेये, पाणी, लोणी, पेप्सी, दूध फ्रीजमध्ये ठेवले होते. आरोपी हे दररोज फ्रीजमधून खाद्यपदार्थ बाहेर काढायचा.
तो ऑनलाइन खाद्यपदार्थही ऑर्डर करत असे.
10 जूनपर्यंत इन्स्टाग्राम चालवले
दक्षिण जिल्हा पोलिस अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, आफताबने चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की,
श्रद्धाच्या खुनावर संशय येऊ नये म्हणून तो दहा दिवस तिचे इन्स्टाग्राम चालवत होता.
मृत श्रद्धाचा एखादा मित्र तिला मेसेज करायचा तेव्हा आफताबच त्याला उत्तर द्यायचा.
10 जूननंतर त्याने श्रद्धाचे इन्स्टाग्राम आणि मोबाईल बंद केले होते. यानंतर श्रद्धाच्या मैत्रिणींना तिची काळजी वाटू लागली.
६ ऑक्टोबर रोजी हरवल्याची तक्रार
14 सप्टेंबर 2022 रोजी, श्रद्धाचा भाऊ श्रीजय विकास वालकर याला तिचा मित्र लक्ष्मण नाडर याने फोन केला आणि सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून तिचा फोन बंद आहे. यानंतर वडिलांनी 6 ऑक्टोबर 2022 रोजी वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.त्यानंतर तपास सुरू झाल्यावर ही धक्कादायक माहिती समोर आली.
‘अटक वेगाने, खटल्याच्या वेळी मात्र ईडी मंद’, न्यायाधीश नी फटकारले
५० लाखांची लाच घेताना BMC अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15,2022, 13:47 PM
WebTitle – Shraddha Murder Case Aftab was dismembering the body for two days Marathi news