मुंबई, दि 14 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांची पुण्यात भेट झाली.त्यावेळी दोन्ही राजे मध्ये मराठा आरक्षणाबाबत सविस्तर चर्चा झाली.या भेटीनंतर विविध राजकीय नेते प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. शिवसेनेनेही या भेटीबाबत भाष्य केले आहे. दोन्ही राजे एकत्र आले याचे स्वागत आहे, मात्र दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत.
त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबाबत ते बोलत नाहीत.ते मिठाला जागल्यासारखे बोलत आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी खासदार संभाजीराजे आणि खासदार उदयनराजे भोसले यांना लगावला आहे. (shiv sena mp arvind sawant criticizes mp sambhaji raje and mp udayanraje bhosale)
राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांबाबत बोलताना राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत घटनेप्रमाणे निर्णय घेतला गेला पाहिजे.
पण निव्वळ राजकारण करण्यात काम सध्या सुरु असल्याचं सांगत घटनेची पायमल्ली होत असल्याचा आरोप सांवत यांनी केलाय.
त्याचबरोबर राम मंदिर जमीन घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे.राम मंदिराबद्दल आमच्या भावना स्पष्ट आहेत.
धर्माच्या भावनांशी खेळू नका असं वक्तव्यही सावंत यांनी केलंय.
‘मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन म्हाडाने करावे’
मुंबईतील मोडकळीस आलेल्या चाळींबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. मात्र असे असतानाही गेल्या सहा महिन्यांपासून या कायद्याला मंजुरी मिळत नाही. म्हणूनच पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले आहे, असे सावंत म्हणाले. राज्य सरकारच्या कायद्याप्रमाणे जर मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्वसन होऊ शकत नसेल, तर म्हाडाने हे पुनर्वसन करावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांनी नक्षलवाद्यांना पत्र लिहिलं
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)