महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शिवसेना आमदार नितीन देशमुख सुरतच्या हॉटेलमधून नागपुरात पळून गेले आहेत. नागपूरला आल्यावर आमदार देशमुख म्हणाले की, मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी जबरदस्तीने इंजेक्शन दिले. ती इंजेक्शन्स काय होती, मला माहीत नाही. तो पुढे म्हणाला – मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे मला काहीच समजत नाही. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक होतो, शिवसेनेतच राहणार.
सुरतचे स्थानिक शिवसेना नेते परेश खेर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, नितीन देशमुख हॉटेलमधून बाहेर पडले
आणि एका चौकात आले, जिथे त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आमच्याकडे मदत मागितली.
आम्ही चौकात पोहोचलो तोपर्यंत पोलीस त्यांना पकडून हॉटेलमध्ये घेऊन जात होते.
आम्हीही त्याच्या मागे लागलो, पण आम्हाला हॉटेलच्या बारमध्ये थांबवण्यात आलं.
नितीन देशमुख हे मुंबईला जाण्यावरून हॉटेलमध्ये गोंधळ घालत असताना,
त्यावेळी त्याना पोलिस अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.
दुसरीकडे, मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये गोंधळ सुरू असताना स्थानिक पोलीस अधिकारी
आणि आमदार यांच्यात बाचाबाची झाली, त्यानंतर नितीनला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माझा घातपात करण्याची प्रयत्न
नितीन देशमुख यांनी खळबळजनक आरोप करून देशातील राजकारणातच मोठा भूकंप केला आहे.
मला 20-25 पोलिसांनी जबरदस्ती माझे कुणी हात पकडले पाय पकडले कुणी कंबर पकडून एका लाल रंगाच्या गाडीत टाकलं
आणि तिथून एका सरकारी हॉस्पिटल मध्ये नेलं.मला कोणताही आजार नाही.बिमारी नाही.
कोणताही त्रास नाही मग मला दवाखान्यात का नेलं असा विचार मी करत राहिलो.
काही पोलिस आणि डॉक्टर कोपऱ्यात काहीतरी चर्चा करत होते,ते पाहून माझ्या मनात शंका आली की हे लोक माझा काहीतरी घातपात करण्याच्या बेतात आहेत.नंतर डॉक्टर आले,मी त्यांना विनंती केली की,मला काहीही झालेलं नाही तुम्ही इतर रुग्णांची देखभाल करा,काळजी घ्या.मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही.तर एक डॉक्टर म्हणाले की,तुम्हाला अटॅक आलेला आहे.तुमच्या डोक्यावर घाम आला आहे.”मी म्हणालो मला अटॅक आलेला नाही आणि घामही आलेला नाही, कदाचित अटॅकच्या नावाखाली काहीतरी माझ्या शरीराला इजा करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे माझ्या निदर्शनास आलं.
शिवसेना आमदार इंजेक्शन देण्याचा आरोप
जवळपास साडेतीन वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी कुणाला माझ्या शरीराला हात लावू दिला नाही. मी त्यांच्याशी संघर्ष करत होतो. मला हात लावू नका,मला तुमच्यावर विश्वास नाही,तुमच्या इथल्या कोणत्याच गोळ्या औषधांवर विश्वास नाही.साडेसहाच्या दरम्यान वीस एक लोकांनी कुणी माझी कंबर पकडली कुणी हात तर कुणी मान पकडली,आणि त्यातील एकाने माझ्या दंडाला एक सुई टोचली. जशी ढोराला सुई टोचतात तशी टोचली.
अटॅकच्या नावाखाली माझा घातपात करण्याचे षडयंत्र गुजरात सरकारने केले.तिथल्या स्थानिक शासन प्रशासनाने केले.परंतु तुमच्या सर्वांच्या आणि देवाच्या आशीर्वादाने मी वाचलो,नंतर शिवरायांची शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ ही रणनीती माझ्या लक्षात आली,त्याशिवाय आपण इथून पळ काढू शकणार नाही,मग मी मवाळ भूमिका घेतली,आणि तुम्ही म्हणाल तसे वागतो असे म्हणून मी त्यांचे ऐकले,आणि गुवाहाटी येथून स्वत:ची सुटका करून घेतली.
40 आमदार सुरत ते गुवाहाटी एअरलिफ्ट
दरम्यान,राजकीय गोंधळाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० बंडखोर आमदार विशेष विमानाने गुवाहाटीला पोहोचविण्यात आले. भाजपच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळाबाहेर तीन बसमधून त्यांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा स्वतः त्यावर लक्ष ठेवून आहेत.या विमानात मोहित कंबोज देखील आहे असा दावा नितीन देशमुख यांनी केला.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
400 हून अधिक सीए चिनी कंपन्यांना मदत करत होते,कारवाई ची तयारी
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 22, 2022, 20:35 PM
WebTitle – Shiv Sena MLA fled from Surat, they injected me to make me unconscious