मुंबई, डॉ.आंबेडकर भवन : गेले अनेक दिवस राज्य अन देशभरात चर्चा होत असलेल्या आणि उत्सुकता लागून राहिलेल्या शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युती संदर्भातील शक्यता आणि स्पष्टता आता अधिकृतपणे लोकांसमोर आलेली आहे.आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युती ची घोषणा केली.
आम्ही एकत्र का आलो?
यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, देशातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस अधोगतीकडे जाताना दिसत आहे. लोकशाही स्वातंत्र्याची गळचेपी करत देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. हुकूमशाहीकडे सुरू झालेली वाटचाल थांबवण्यासाठी राजकीय पाऊल उचलण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत आहे. जनसामान्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बाजूला सारून अवास्तव विषयांना प्राधान्य दिले जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात (25 नोव्हेंबर 1949 रोजी) देशाला उद्देशून इशारा दिला होता की,
देशामध्ये सामान्यांचे प्रश्न सोडून इतर विषयांत महत्त्व दिले तर देशाच्या स्वातंत्र्याला पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही नेहमीच देश आणि लोकहिताला प्राधान्य दिले.
लोकशाहीस प्राधान्य दिले नाही तर देशात अराजक निर्माण होईल ही त्यांची भूमिका डॉ. आंबेडकरांच्या परखड विचारांशीच मिळणारी आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म ही आवश्यक बाब असल्याचे नमूद केले आहे, परंतु या तिघांनीही राष्ट्राला प्राधान्य दिलेले आहे. लोकशाही टिकली तरच देश टिकतो, असे मत प्रबोधनकार ठाकरे यांनीसुद्धा मांडले आहे. म्हणून आम्ही एकत्र येऊन देशाचे स्थैर्य, नीतिमत्ता व राष्ट्रीय हिताचे राजकारण करण्यास कटिबद्ध आहोत!
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले, देशात आंबेडकर आणि ठाकरे या नावाला एक इतिहास आहे.आम्हा दोघांचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे स्नेही होते. दोघांनीही त्या काळात वाईट रूढीप्रथांवर आघात केले आहेत. आताही राजकारणात वाईट प्रघात अन चाली सुरु आहेत. हे सगळं मोडून काढण्यासाठी आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
ऍड. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.
या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे.
उपेक्षितांचे, मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे.
आमचं राष्ट्रवादी काँग्रेससोबत फक्त मुद्द्यांचे भांडण आहे.सध्या देशभर ED च्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आले नाहीये. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पक्षातील लीडरशिप संपवली आहे.
हुकूमशाहीविरोधात उभे राहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आमचा पाठिंबा असेल. राजकारण नितीमत्तेवर येईल असा आमचा प्रयत्न असेल. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वावर चालत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आहोत.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युती संदर्भात सर्वात पहिली बातमी जागल्याभारत ने दिली होती.
श्रीमंत-गरिब यांच्या मध्ये दरी वाढत आहे
भारतातील मुस्लिमांना घाबरण्याची गरज नाही – मोहन भागवत
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 23,2023 16:08 PM
WebTitle – Shiv Sena and Vanchit Bahujan Aghadi formed an alliance on this issue
नागपुर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व त्या करिता दिलेली २० एकर एकर जागा स्थानिय प्रशासनाने कशी हेतूपुरस्कर हस्तगत करुन घेतली व आंबेडकर प्रतिष्ठान भूई सपाट केले, यावर दुर्लक्ष केल्या जात आहे. तेथे ह्या कार्यवाही विरोधात आंबेडकरी महिला धरने आंदोलन करित आहे. साखळी उपोशनाला पन बसले होते.
हा मुद्दा प्रकाश आंबेडकर व उध्दव ठाकरे यांनी उचलुन धरुन धरायला हवा.