पहिल्या दलित मराठी स्त्री आत्मचरित्रकार शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचं वृद्धपकाळाने निधन झालं.माज्या जल्माची चित्तरकथा १९८७-८८ दरम्यान ची दुरदर्शन वरील सीरीयलच्या आत्मचरीत्र लेखिका व त्या कथेतील ओरिजनल पात्र” नाजुका ” तसेच पॅथर संस्थापक व आंबेडकरी विचारधारेचे व्याख्याता कालकथीत प्रा. आरुण कांबळे याच्या मातोश्री नाजुका फेम शांताबाई कृष्णा कांबळे यांचे आज दिनांक २५ जाने 23 वयाच्या १०० वर्षी निधन झालं, सध्या त्या त्यांची कन्या आयु. मगंल नारायण तिरमारे यांच्या बरोबर औंध. पुणे येथे राहत होत्या.
पूर्वाश्रमीच्या नाजुका सखाराम बाबर (शांताबाई कृष्णाजी कांबळे) यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील (तालुका आटपाडी, मु. पो. करगणी) महूद या गावी झाला. या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. त्यानंतर पुणे येथील प्राथमिक शिक्षिका प्रशिक्षणाची २ वर्षे पूर्ण करून त्या १९५२मध्ये उत्तीर्ण झाल्या. प्राथमिक शिक्षिका म्हणून त्यांनी कुर्डूवाडी, आटपाडी, दिघंची, करगणी इत्यादी ठिकाणी अध्यापन केलं.पुढे त्या मुख्याध्यापिका, व शिक्षणाधिकारी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास झाला.
शोषित वंचित वर्गातील स्त्रीचे मराठी साहित्यातील पहिलं आत्मकथन ‘माज्या जल्माची चित्तरकथा’ हे त्यांनी लिहिलेलं आहे. या आत्मकथनाची भाषांतरं इंग्रजी, फ्रेंच, कानडी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये झालेली आहेत. या आत्मकथनाच्या दुसर्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्या साठी विश्वनाथ प्रताप सिंग हे उपस्थित होते,हा सोहळा त्यांच्या हस्ते पुणे शनिवार वाडा येथे संपन्न झाला होता. या आत्मकथनावर आधारित ‘नाजुका’ नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यात झाली होती.
समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपुर्ण आदराजंली.
download bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?
जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25,2023 15:40 PM
WebTitle – Shantabai Krishnaji Kamble