प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना हे टेलिव्हिजन मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध नाव होतं. लोक त्यांना पितामह भीष्म आणि शक्तिमान म्हणून ओळखतात. मुकेश हे बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहेत पण त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा चर्चेत येतात. अलीकडेच त्याने असे काही म्हंटलं की ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, शनिवारी एका ट्विटमध्ये मुकेश यांनी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
ट्विटमध्ये काय आहे?
शक्तिमान मुकेश खन्ना यांनी आपल्या ट्विटमध्ये हिंदू राष्ट्र बनविण्याची मागणी करत ट्विट मध्ये लिहिले आहे की,हिंदुस्थानात राहून आपल्या देशाला हिंदुस्थान न म्हणता इंडिया म्हणणे आता खूप झाले आहे. ज्या दिवशी पाकिस्तानची निर्मिती झाली त्याच दिवशी हे घडायला हवे होते. या ट्विटसह त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलची लिंक टाकली आहे, ज्यामध्ये जगद्गुरू परमहंस आचार्य देखील अभिनेत्यासोबत दिसत आहेत.
जिना यांनी त्यावेळी पाकिस्तानची मागणी मांडली आणि पूर्ण करून घेतली तेव्हा नेहरू ग्रुपने
हिंदुस्थान का निर्माण केला नाही याचे आश्चर्य वाटते.
मुकेश खन्ना ने व्हिडिओमध्ये म्हंटलं
या व्हिडिओमध्ये जगद्गुरू परमहंस आचार्य मुकेश खन्ना यांना विचारताना दिसत आहेत की तुम्हाला हिंदु राष्ट्राबद्दल काय वाटते? यावर मुकेश खन्ना म्हणतात, ‘मी वर्षभरापूर्वीही हा मुद्दा मांडला होता की, आपला देश पूर्वी एकसंध होता, मग आज का नाही?’ त्यांनी व्हिडिओमध्ये भारत सरकारला देशाला लवकरात लवकर हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्याचे आवाहन केले आहे.
नुकतेच मुकेश खन्ना ‘शक्तिमान’ च्या रीलौंचमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. टीव्हीच्या दुनियेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शक्तीमान आता लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे, असा खुलासा त्यांनी केला होता. मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की, किमान 300 कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, त्यांनी या चित्रपटाबाबत अधिक माहिती दिली नाही.
दलित मुलीला शाळेत जाण्यापासून रोखले,बॅग हिसकावली,सात जणांना अटक
मासिक पाळी प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिस तर्फे वृक्षारोपण
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 31,2022, 13:58 PM
WebTitle – ‘Shaktiman’ on TV mukesh khanna wants Hindu Rashtra, demands from Modi government