शक्ती विधेयक कायदा : सन 2020 चे विधानसभा विधेयक क्र. ५१ -भारतीय दंड संहिता,फौजदारी प्रक्रिया संहिता,१९७३ व लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम,२०१२ हे,महाराष्ट्र राज्यात लागू असताना त्यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता सुधारणा विधेयक राज्याचे गृहमंत्री श्री.अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आले.सदर विधेयक सभागृहातील संयुक्त समितीकडे विचारार्थ पाठवण्यात आले आहे.या विषयात स्वारस्य असणाऱ्या महिला संघटना,स्वयंसेवी संस्था तसेच विधीज्ञ व्यक्ती यांच्याकडून या संबंधी सुधारणा/सूचना पाठवण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
त्यानुसार ज्या व्यक्ती/संस्थां सुधारणा/सूचना पाठवू इच्छितात त्यांनी आपल्या सूचना/सुधारणा तीन प्रतींमध्ये निवेदनाच्या स्वरूपात महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाकडे शुक्रवार,दिनांक १५ जानेवारी,२०२१ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचतील अशा बेताने श्री. राजेंद्र भागवत,सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय ,विधानभवन,बॅकबे रेल्कमेशन मुंबई-४०००३२ यांच्याकडे पाठवाव्यात किंवा a1.assembly.mls@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात.
सदर विधेयक – www.mis.org.in येथे उपलब्ध आहे.
तसेच उक्त शक्ती विधेयक कायदाविधेयकाच्या मराठी आणि इंग्रजी प्रती शासकीय ग्रंथागार,पुणे,नागपूर,औरंगाबाद,कोल्हापूर,आणि व्यवस्थापक ,प्रकाशने,शासकीय मुद्रणालय,चर्नी रोड, नेताजी सुभाष मार्ग,मुंबई ४००००४ येथे विक्रीस उपलब्ध आहे.
शक्ती कायद्यातील प्रमुख तरतुदी
– २१ दिवसात खटल्याचा निकाल लागणार- बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार
– अती दुर्लभ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
– ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद
– महिलांवरील क्रूर अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंड शिक्षेची तरतूद
– वय वर्ष १६ पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप
– सामूहिक बलात्कार – २० वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप, १० लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
– १६ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जमठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप, दहा लाख रुपये दंड
– बारा वर्षाखालील मुलीवर अत्याचार मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड
– पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा
– सगळे गुन्हे अजामीनपात्र असतील- बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड
– एसिड हल्ला केल्यास किमान दहा वर्षांची किंवा मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, पीडित व्यक्तीला दंड रक्कम द्यावी लागणार
– एसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास १० ते १४ वर्षापर्यंत तुरुंगवास
– महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड
– सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
महात्मा जोतीबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)