साधेपणा इतका की त्या मातीच्या चुलीवर स्वयंपाक करताना मिडिया दाखवते. साधेपणा इतका आहे की अब्जावधींची मालकिन आहे असे कोणीही म्हणू शकत नाही. पण त्या UK PM Rishi Sunak यांच्या सासू आहेत.त्या नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी आहेत, जे प्रसिद्ध आयटी कंपनी (Infosys) इन्फोसिसचे सह-संस्थापक आहेत. आणि त्या इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.आम्ही बोलत आहोत साध्या राहणाऱ्या सुधा मूर्ती यांच्याबद्दल.सुधा मूर्ती (Sudha Murthy) पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसल्या.या शोमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगितले.मात्र त्यांच्या एका किस्स्याने त्यांना ट्विटरवर ट्रोल होण्याची वेळ आली.गेले तीन दिवस त्या सातत्याने ट्रोल होत आहेत.इतकच नाहीतर आता त्यांच्यावर गंभीर आरोप देखील होऊ लागले आहेत.मात्र इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या देशातील समाजातील 85% घटकांना बेसिक गरजा भागत नाहीत अशा लोकांना हे लोक साधी राहणी दाखवून आणखी वेड्यात काढण्याचा प्रयत्न आपल्या मिडियाकडून सातत्याने होत असतो,या शुगर कोटिंगपासून सावध असलं पाहिजे.
नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या
कपिल शर्मा शोमध्ये अर्चना यांनी सुधा मूर्ती यांना तिचे कपडे पाहून कॅटल क्लास म्हटल्यावर घडलेल्या घटनेबद्दल विचारले. सुधा उत्तरली, ‘हो, खरं आहे. मी 4-5 वर्षांपूर्वी सलवार-कमीज घालून विमानतळावर गेले होते. माझ्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट होते आणि रांगेत उभी होते.तिथे इकॉनॉमी क्लास वर्गातील दोन महिलांनी मला पाहिले आणि म्हटलं की हे कॅटल क्लासचे लोक आहेत. इकॉनॉमी क्लास म्हणजे काय हे त्यांना कसं कळणार. साडी किंवा सलवार-कमीज घातलेली व्यक्ती बिझनेस क्लासचा प्रवासी असू शकत नाही, असे त्यांना वाटत होते.
यानंतर सुधा मूर्ती यांनी “क्लास” म्हणजे काय हे सांगितले.त्या पुढे म्हणाल्या , ‘मी त्या महिलांना विचारलं की कॅटल क्लास म्हणजे काय? तुमच्याकडे किती पैसे आहेत यावरून तुमचा क्लास कळत नाही. तुम्ही श्रीमंत आहात याचा अर्थ तुमच्याकडे “क्लास” आहे असे नाही. महानगणितज्ञ मंजुल भार्गव यांनी भारताला जगात इतका मान मिळवून दिला, तो असतो “क्लास”. मदर तेरेसा ही “क्लास” असलेली व्यक्ती आहे. कपिल शर्मा कॉमेडी करण्यात “क्लास” आहे. जे लोक त्यांचे काम चांगले करतात ते “क्लास” लोक असतात. पैशाने “क्लास” होत नाही.
सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप
एका ट्विटर युजरच्या मते वास्तविक हे सगळं सुरू झालं सुधा मूर्ती यांच्या एका व्हिडिओमुळे नुकत्याच कर्नाटक राज्याच्या निवडणुका पार पडल्या.आणि कॉँग्रेसने कर्नाटकमध्ये बहुमत मिळवलं.यावेळी पत्रकारांनी सुधा मूर्ती यांना प्रश्न विचारला होता.धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला कर्नाटक इलेक्शन दरम्यान जास्त महत्व दिलं गेलं का? या प्रश्नावर सुधा मूर्ती म्हणतात, “मी काही राजकीय जाणकार नाही,मला खरोखर त्या गोष्टींची काळजी नाही” I am not a politically savvy person.’. I really don’t worry about those things. -Sudha Murthy
यामुळे कर्नाटक पासून अनेक राज्यातील लोकांनी सुधा मूर्ती यांच्यावर टीका करणे सुरू केले.
मग त्यावर उतारा म्हणून त्यांच्या PR टीमने हे साधेसुधेपणाची टूम आणली. लोकांनी त्यावरही त्यांना उघडे पाडले.
एवढच नाहीतर infosys चा कारभार देखील उघडा केला,किती फ्रॉड केले ते समोर आलंय.
लोक प्रेम करतात दुर्लक्ष करतात पण आवडलं नाही तर असं भयंकर पद्धतीने एक्सपोज देखील करतात.
ट्विटर युजर श्रीधर रामास्वामी यांनी तर इन्फोसिसचा कारभारच उघडा पाडला.त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय
“ज्यांना राग येतो आणि सुधा मूर्ती आणि कुटुंबाला फसवणूक करणारे म्हटले जात आहे,त्यांच्या काही फसवणुकीच्या प्रकरणांची माहिती इथे दिली आहे.
चार मुद्याद्वारे त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
1. मूर्ती यांनी स्थापन केलेल्या कंपनीला न्यूयॉर्कमधील व्हिसा उल्लंघनाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी
$1 दशलक्ष द्यावे लागले होते. अमेरिकेच्या न्यायालयांनी त्यांच्यावर गैरवर्तनासाठी तीक्ष्ण ताशेरे ओढले होते.
2. कामगारांच्या चुकीच्या वर्गीकरणासाठी त्यांना कॅलिफोर्नियामध्ये $800,000 चा दंड ठोठावण्यात आला. (दंडाची रक्कम भारतीय रुपायांत 6,61,36,000 इतकी होते) (उदा.H1B व्हिसाच्या ऐवजी B1 व्हिसावर कर्मचार्यांना कामावर पाठवणे,
खर्च वाचवण्याचा प्रयत्न करणे तसेच H1B ची आवश्यकता असताना (65,000 व्हिसाची मर्यादा ) B1 द्वारे अधिक लोकांना पाठवण्यात आले,
B1 व्हिसा तुम्हाला यूएसमध्ये सतत 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहण्याची परवानगी देत नाही आणि तुम्हाला फक्त सेमिनार, कॉन्फरन्स इत्यादींमध्ये सहभागी होण्यासाठी अभ्यागत म्हणून प्रवेश करण्याची परवानगी देतो,मात्र या व्हिसा वर तुम्हाला कुशल कामगार म्हणून काम करण्याची परवानगी नाही, तर H1B तुम्हाला जास्त काळ राहण्याची आणि कुशल कामगार-संबंधित कार्य करण्यास अनुमती देते ज्याचा फायदा बहुतेक तंत्रज्ञ घेतात..
3. अक्षता मूर्ती (मुलगी) वर जवळपास £20 दशलक्ष कर भरण्याचे टाळल्याचा आरोप आहे आणि तोही निवासी नसलेल्या स्थितीसह. तिने नंतर स्वेच्छेने पैसे देण्यास तयार असल्याचा दावा करून पैसे देण्यास सहमती दर्शविली जी एक मखलाशी होती कारण तिच्याकडे पैसे देण्याशिवाय पर्यायच नव्हता कारण सुनकचे कुलपती Chancellor म्हणून पद धोक्यात आले होते,पत्नीच्या कृत्यामुळे विरोधी मजूर पक्षाकडून राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता.
4. सुधा मूर्ती या फसव्या पीएम केअर्सच्या ट्रस्ट सदस्य होत्या आणि जेव्हा त्यांनी असं म्हटलं की “जातीय हिंसाचाराची पर्वा नाही”
तेव्हा आश्चर्य वाटले नाही.
जे लोक या कुटुंबाला पवित्र मानतात आणि त्यांना संत समजतात त्यांनी खरोखरच अपडेट राहण्याची गरज आहे.
आणि नारायण मूर्ती व कुटुंबाच्या शुगर कोटिंग इमेज बिल्डिंगच्या भारतीय प्रसारमाध्यमांच्या प्रोपौगंडा ला बळी पडू नये.
असं ट्विटर युजर श्रीधर रामास्वामी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.
इन्फोसिसची OpIndia राइट विंग पोर्टल मध्ये 2% भागिदारी
OpIndia ही एक हिंदुत्ववादी विचारसरणीची न्यूज वेबसाइट आहे जी वारंवार चुकीची माहिती/फेक न्यूज प्रकाशित करते. डिसेंबर 2014 मध्ये स्थापन झालेल्या, वेबसाइटने 2020 च्या एका घटनेसह अनेक प्रसंगी बनावट बातम्या आणि इस्लामोफोबिक भाष्य प्रकाशित केले आहे ज्यात बिहारच्या मशिदीमध्ये एका हिंदू मुलाचा बळी दिल्याचा खोटा दावा केला होता.
विकिपीडियावरील माहितीनुसार,OpIndia ची स्थापना डिसेंबर 2014 मध्ये राहुल राज आणि कुमार कमल यांनी चालू घडामोडी आणि बातम्या वेबसाइट म्हणून केली होती. OpIndia ही खाजगी मर्यादित कंपनी, Aadhyaasi Media and Content Services च्या मालकीची आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये, कोवई मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, Kovai Media Private Limited कोइम्बतूर-आधारित कंपनी, ज्यांच्याकडे अगोदरच हिंदुत्ववादी विचारसरणीचे नियतकालिक “स्वराज्य” आहे, त्या कंपनीने आधारसी मीडियाचे अधिग्रहण केले.कोवई मीडियाचे सर्वात प्रमुख गुंतवणूकदार हे इन्फोसिसचे माजी अधिकारी टी.व्ही. मोहनदास पै (3%तीन टक्के मालकी) आणि एन.आर. नारायण मूर्ती (2% दोन टक्के मालकी) होते. कोवई मीडियाने जुलै 2018 पर्यंत आध्यासी मीडियाची मालकी कायम ठेवली.
इमिग्रेशन अधिकाऱ्याचा लंडन पत्त्यावर विश्वास ठेवण्यास नकार -मूर्ती
एका इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यांच्या निवासी पत्त्यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला जेव्हा त्यांनी त्यांचा पत्ता 10 Downing Street ’10 डाउनिंग स्ट्रीट’ – युनायटेड किंगडमच्या प्रधानमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आणि कार्यालय असे लिहिले होते. यावरही एका ट्विटर वापरकर्त्याने स्पष्ट केलेय. तुम्ही तिच्या साधेपणावर रडण्याआधी, मी सांगू इच्छितो की ब्रिटीश गुप्त पोलिस अत्यंत कार्यक्षम आहेत आणि प्रधानमंत्र्यांच्या घरी येणार्या कोणत्याही अभ्यागताचे अगोदर सुरक्षा मंजुरी, स्वत:हून कडक सुरक्षा आणि पोलिस पथकाद्वारे त्यांचे स्वागत केले जाते.या महिला खूप दिवसांपासून खोट्या साधेपणाच्या कथा विकत आहेत.
या एकूणच प्रकरणावरून सुधा मूर्ती नारायण मूर्ती अन इन्फोसिस
यांच्याबद्दल लोक उघडपणे आपलं मत सोशल मिडियात व्यक्त करत आहेत.
‘सच्चे मुस्लिम-अच्छे मुस्लिम’ ; निवडणूक 2024: RSS चा नवा प्लॅन
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on 19, MAY 2023, 14:08 PM
WebTitle – Serious allegations against Infosys president Sudha Murthy and her family