संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या आपणा सर्वांना खूप खूप सदिच्छा.
गाडगेबाबा आणि गोरक्षण – कुंभमेळ्यात एकदा तुकडोजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साधू समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती. संत गाडगेबाबा सुद्धा सभेला हजर होते. सभामंचावर विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर, महापंडित, आचार्य, साधू वगैरे विराजमान झाले होते पण गाडगेबाबा मात्र श्रोत्यांमध्ये जमिनीवर बसले होते.
सभामंचावर बसलेल्या तुकडोजी महाराज व अन्य साधुसंतांनी त्यांना वर येऊन बसण्याचा खूप आग्रह केला पण बाबा ऐकेनात.
ते लोकांमध्येच बसून राहिले. थोडयावेळाने सभा सुरू झाली.
एक एक महामंडलेश्वर, महापंडित, साधू, संत वगैरे येऊन गोरक्षणावर मोठमोठी आवेशपूर्ण भाषणं ठोकून गेले.
शेवटी तुकडोजी महाराज आणि महामंडलेश्वर प्रभुदत्तजी यांनी गाडगेबाबांना दोन शब्द बोलण्याची विनंती केली.
गाडगेबाबा आणि गोरक्षण
गाडगेबाबा विनंतीला मान देऊन सभामंचावर गेले आणि बोलू लागले. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. लोक प्रवचन ऐकण्यात तल्लीन असताना मधेच गाडगेबाबांनी आपला मोर्चा गोराक्षणकडे वळवला. गोरक्षणाविषयी तथाकथित साधुसंतांनी बाबांनी केलेल्या भाषणबाजीचा उल्लेख करून गाडगेबाबांनी उपस्थित साधुसंताना विनंती केली की आपण साधू संतांनी मोठमोठे गोठे बांधून गोसेवा करावी. अस झालं तर मी सगळ्या भारतातून गाई गोळा करून आणून देईन.
या विनंतीमागे गाडगेबाबांचा हेतू हा साधुसंतांच्या कथनी आणि करणीतील अंतर उपस्थितांना दाखवून देणे हा होता. त्या विनंतीला उत्तर द्यायला प्रभुदत्त महाराज उभे राहिले. त्यांनी गोरक्षा उपक्रमावर काही ठोस काम करावे यासाठी साधूंचे नाव घ्यायला सुरुवात केली आणि उपस्थित साधूंमध्ये चुळबुळ सुरू झाली. गोसेवेवर, गोरक्षणावर भाषणबाजी प्रवचन देणारे साधू, संत महाराज हळू हळू एक एक करून सभामंचावरून पसार होऊ लागले.
गाडगेबाबांना उपस्थित साधूंसंतांचा हेतू लक्षात आला. ते हातात झाडू घेऊन अफाट गर्दीमुळे घाण झालेला गंगेचा घाट साफ करायला निघून गेले.
NEET : आकांक्षा सिंह ला सुद्धा पैकीच्या पैकी गुण मिळूनही दूसरा नंबर का आला?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on February 23, 2021, 10:22 am
Web Title: Sent Gadgebaba and GoRaksha