शेअर मार्केट जोखीम : काल सेन्सेक्स १४५० अंकांनी कोसळून ५२,८५० वर बंद झाला आहे ;
सात लाख कोटींचे बाजारमूल्य हवेत उडून गेले ; पोस्ट वाचाल तोपर्यंत हि बातमी शिळी झाली असेल
परकीय संस्थाच नाही तर अनेक गुंतवणूकदार इक्विटी मधील आपल्या गुंतवणुकी काढून घेत आहेत ;
त्यामुळे शेअर निर्देशांक कोसळत आहेत ; अजून कोसळतील. हे एवढ्यात थांबणारे नाही.
सेन्सेक्स कसा चढला , कोसळला याचे चित्र आहे
खाली दिलेल्या ग्राफमध्ये गेल्या वर्षभरातील सेन्सेक्स कसा चढला , कोसळला याचे चित्र आहे.
ऑगस्ट २०२१ : ५२,००० पासून चढत
ऑक्टोबर २०२१ ६२००० खाली येत
परत डिसेम्बर २०२१ : ५६,००० पासून चढत
जानेवारी २०२२ : ६१,००० खाली येत
मार्च २०२२ : ५३,००० पासून चढत
एप्रिल २०२२ : ६०,००० प्लस
जून २०२२ : ५३,०००
हा काय लहान मुलांच्या अम्युजमेंट पार्कमधील रोलर कोस्टर खेळ नाही मित्रानो
लाखो कोटी रुपयांचा खेळ आहे हा ; काही गोष्टी लक्षात घ्या
१. सेन्सेक्स ज्यावेळी वर जातो आणि खाली येतो नंतर पुन्हा वर जातो हे काही गुरुत्वाकर्षणासारख्या नैसर्गिक शक्तीने नाही ; ते मानवी एजन्सीज अतिशय सजगपणे करतात ; म्हणजे शेअर्सची खरेदी-विक्री कोणत्या शेअर्सची , किती शेअर्सची , केव्हा हे कोणीतरी ठरवते
२. सेन्सेक्स वर गेल्यावर सर्व शेअर वर जातात , सर्वांचा नफा होतो ; सेन्सेक्स खाली आल्यावर सर्व शेअर्स खाली येतात आणि सर्वांचे नुकसान होते असे कधीच नसते.
३. शंभर टक्के रिटेल गुंतवणूकदार फक्त कॅश सेगमेंट मध्ये व्यवहार करतात ; तर संस्थात्मक गुंतवणूकदार आणि हाय नेटवर्थ व्यक्ती एकाचवेळी कॅश आणि डेरिव्हेटीव्ह मध्ये खेळतात; त्यामुळे त्यांचा नफा / तोटा एकत्रित पणे बघतात ; आणि तीच शास्त्रीय पद्धत आहे.
६२,००० सेन्सेक्स असतांना तुम्हाला जी लोक सल्ला देत होती कि शेअर्स अजून वर जातील घ्या ; ती त्यावेळी स्वतःचे शेअर्स विकत असतील ; सेन्सेक्स ५६,००० आला ,मग तुम्हाला भीती वाटली कि अजून खाली जाईल , म्हणून तुम्ही आहेत ते शेअर्स तोटा पत्करून विकले असतील तर याच लोकांनी याच लोकांनी तुमचे शेअर्स विकत घेत सेन्सेक्स ६१,००० वर नेला , मग परत विकले , मग परत खरेदी केले.
प्रत्येक चांगली बातमी पेरली जाते , बातमीला साखर लावली जाते ; प्रत्येक वाईट बातमीला तिखट , कडू लावले जाते ; घबराट पसरवली जाते.
रक्तरंजित खेळ आहे हा ; xxx दम असेल , खोल खिसा असेल, जोखीम घेण्याची पैशाची ऐपत असेल तरच उतरा ; नेहमीचे नैतिक जजमेंट पास करू नका.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 14 2022, 09: 09 AM
WebTitle – Sensex down 1450 points, stock market risk, and your pocket