मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे.या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या एका गुप्त भेटीची जोरदार चर्चा सुरु झालीय. त्यातही ही गुप्त भेट होती मोदी-शाहांच्या गुजरातमधली. या भेटीत पवार आणि पटेल नेमके कुणाला भेटले याबद्दल राज्यात आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.शरद पवार आणि अमित शाह यांची गुजरातमध्ये रात्री गुप्त बैठकझाल्याचे
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी गुजरातमध्ये नेमकी कुणाची गुप्त भेट घेतली? अमित शाह की गौतम अदानी?
महाराष्ट्राच्या राजकारणात अँटिलिया- वाझे प्रकरणावरुन गदारोळ सुरु असताना शरद पवारांची पावलं गुजरातकडे का वळाली?
या प्रश्नांची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झालीय.
दैनिक भास्करच्या गुजराती आवृत्तीनं तर पवारांची ही भेट अमित शाहांसोबतच होती असा दावा केलाय.
संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता.आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला आले.अहमदाबादमधील एका फार्महाऊसवर २६ मार्चला रात्री ९.३० वाजता पटेल आणि बड्या उद्योगपतीची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील गुजरातमध्येच होते. मात्र ते या बैठकीला उपस्थित होते का, हे समजू शकलेलं नाही. याशिवाय शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याचं वृत्त दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं दिलं आहे. या भेटीसाठी पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटनं शांतिग्राममधल्या गेस्टहाऊसला आले असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या भेटीबाबत दोन थेअरी मांडल्या जात आहेत. एक थेअरी अशी की ही भेट गौतम अदानींसोबत होती. तर दुसरी चर्चा ही भेट अमित शाहांसोबत होती. पण अशा काही भेटी झाल्याचं अधिकृतपणे अद्याप तरी कुणी स्पष्ट केलेलं नाहीय त्यामुळे राज्यात मात्र यावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीकडून खंडन
राष्ट्रवादीकडून याबाबत खंडन करण्यात येत होते.शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी
निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.
अमित शाह यांचे सूचक स्पष्टीकरण
सगळ्या गोष्टी सार्वजनिक केल्या जाऊ शकत नाहीत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीच्या बातम्यांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी भेटी बाबत नकार सुद्धा दिलेला नाही.
भेटी बाबत एवढी गुप्तता का हा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on March 28 , 2021 15 : 43 PM
WebTitle – secret meeting between ncp chief sharad pawar praful patel and amit shah,amit shah comment on the meeting 2021-03-28