भगवान बुद्ध आणि विज्ञान यांचा संबंध आहे का? भगवान बुद्ध कालबाह्य आहे असं एके ठिकाणी वाचलं.बुद्ध कालबाह्य आहे का? मध्यंतरी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच कुणीतरी बौद्ध धम्मातील वैज्ञानिक दृष्टिकोण काय? बुद्ध धम्मात विज्ञान आहे का? अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली तिथं अनेकांनी टिंगल उडवली.याची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
बिग बँग थिअरी फार अलिकडची आहे.19 व्या शतकात म्हणजे १९३१ ला जॉर्ज लेमाइटर यांनी प्रथम एका महास्फोटाची संकल्पना मांडल्याचे दिसते.बिग बँग थिअरी आणि जॉर्ज लेमाइटर यांचं मत यात साम्य आहे.त्याला दुसरे शास्त्रज्ञ हबल यांनी दुजोरा दिला.हबल दुर्बिण आपण ऐकलं असेल या दुर्बिणचे नाव याच एडविन हबल यांच्या नावावरून देण्यात आलं आहे.
बिग बँग थिअरीनुसार, महास्फोट झाला. त्यानंतर प्रचंड प्रमाणावर ऊर्जा निर्माण झाली.त्यावेळी वातावरणात तापमान जवळपास पाच अब्ज अंश सेल्सिअस एवढे होतं. या ऊर्जेतून अनेक घटक बाहेर पडत होते. प्रसरणामुळे थंड होऊन त्यातून न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांसारखे अतिसूक्ष्म कण तयार झाले. विश्व पुरेसे थंड झाल्यानंतर या अतिसूक्ष्म कणांपासून प्रभाररहीत अणू तयार झाले. प्रसरण पावणाऱ्या घटकांवर गुरुत्वीय बलाचा परिणाम होऊन ते एकत्र येऊ लागले आणि त्यांचे पुंजके तयार झाले. त्यातूनच तारे, ग्रह, आकाशगंगा यांचा जन्म झाला. महास्फोटानंतर तयार झालेल्या हायड्रोजनचा वापर करून आजही नवीन तारे जन्म घेतात.
विश्वाची उत्पत्ती किंवा निर्मिती अशी झाल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे.पुढे मग त्यातून लाखों वर्षांची प्रक्रिया त्यातून पृथ्वीवर जीव सृष्टी निर्माण झाली.
विज्ञान अधिक स्पष्ट करायचं म्हणजे विज्ञान हे वस्तूंवर (गोष्टीवर) आधारित असतं.त्याला काहीतरी आधार असतो.आधार नसलेल्या गोष्टीवर विज्ञान बोलत नाही.तसं नसतं तेव्हा ते अध्यात्म ठरतं.कपोलकल्पित.
भगवान बुद्ध जगाच्या निर्मिती बाबत स्पष्टपणे मत मांडतात
भगवान बुद्ध जगाच्या निर्मिती बाबत स्पष्टपणे मत मांडतात.
हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे आणि त्याचे आध्यात्मिक पातळीवर सर्वमान्य उत्तर ईश्वराने निर्माण केले असं दिलं जातं.
बुद्ध जगाची निर्मिती ईश्वराने केली हेच नाकारतो.याबद्दल आपल्याला भारद्वाज आणि वासेठ्ठ या दोघांशी भगवान बुद्धांनी केलेली चर्चा
बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकात पान.नं 189 पासून पाहता येईल.त्यामध्ये विस्ताराने मुद्दे आलेले आहेत.
भगवान बुद्ध म्हणतात हे जग निर्माण केलेले नसून ते विकास पावलेले आहे. यावर स्पष्टीकरण देताना डॉ. आंबेडकर म्हणतात” जगाची निर्मिती झाली यावर बुद्धाचा विश्वास नव्हता,तर ते “उक्रांत” झाले असे त्याचे मत होते”बुद्धाने हे मत मांडणे आणि एकोणिसाव्या शतकात महास्फोटाची संकल्पना बिगबँग थिअरी ने सृष्टीची निर्मिती कशी झाली त्यावर शास्त्रज्ञांचे एकमत होते ही दोन्ही मते सारखीच आहे.
परंतु विचार करा, दोन हजार वर्षापूर्वी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हते.बरेच शोध लागायचे होते
तेव्हा हा विज्ञानवादी दृष्टिकोन मांडणारा बुद्ध होता.म्हणून भगवान बुद्धांना जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणलं जातं.
प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत
बुद्धाच्या प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांताद्वारे वैश्विक गतिशील परिवर्तनाचे सूत्र अधिक स्पष्ट होते.प्रतित्य म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणे तर,समुत्पाद म्हणजे निर्माण होवुन नष्ट होणारी क्रिया पुन्हा,पुन्हा होणे म्हणजेच पुनरूपी जनम,पुनरूपी मरण होय.कार्यकारण भाव म्हणजेच कोणतीही गोष्ट कारणांशीवाय घडत नाही तो सांगणारा सिद्धांत म्हणजेच प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत होय.
बुद्धाच्या प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत मुळात द्वंदात्मक भौतिकवादी न आद्य ग्रीक तत्वज्ञ हिरॉक्लिट्सच्या सिद्धांताशी त्याची समानता दर्शविली जाते.हिरीयण्णा म्हणतात बुद्धाचे तत्वज्ञान त्याच्या मृत्यूनंतर दोन तीन पिढ्यांनी ग्रीस मध्ये हिरॉक्लिट्सच्या नावाने व नंतर दुसऱ्यांदा युरोपात अठराव्या शतकात फरसंच्या बर्गसने मांडलेले आहे.
थोडक्यात म्हणायचं तर ईश्वरीय संकल्पना नाकारणे आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असणे हे मतच निर्विवाद विज्ञानवादी आहे.दोन हजार वर्षापूर्वीचा बुद्धा एकोणिसाव्या शतकातही उभा ठाकतो.त्याचा प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत आजही तसाच लागू पडतो.तो बुद्ध कालबाह्य झाला असं मत मांडणारे एकतर अज्ञानी असू शकतात.किंवा मूर्ख तरी.
त्रिपिटिक ग्रंथाचे दाखले अतार्किक गोष्टी अंधश्रद्धा अविज्ञान मानणारे म्हणून टीकाकार पुढे करतात.त्याबद्दल बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मोलाचे मार्गदर्शन करताना म्हणतात.”त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले जाते ते बुद्ध वचन आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे” याचा अर्थ त्यात भेसळ असणे काही गोष्टी प्रक्षिप्त असणे स्वाभाविक असल्याचे मत डॉ.आंबेडकर नोंदवतात.
“जग हे अनित्य आहे” जग हे सतत बदलत असते
बुद्धाचं आणखी एक जगप्रसिद्ध मत म्हणजे “जग हे अनित्य आहे.” जग हे सतत बदलत असते.
बुद्धाने ग्लोबल वॉर्मिंग बद्दल मत नोंदवलेले आहे का?
असा एक बाळबोध प्रश्न वाचला. ग्लोबल वॉर्मिंग ही कॉन्सेप्ट शंभर वर्षापूर्वी अस्तित्वात आली आहे.
एका माणसाने आपल्या आयुष्यात किती प्रश्नावर काम करावं? परंतु याचेही उत्तर स्पष्टपणे देता येते.
ग्लोबल वॉर्मिंगचा मानवनिर्मित स्रोत अमर्याद जंगल तोडीशी जोडला जातो. हा पर्यावरणाचा मुद्दा सम्राट अशोकाने हातळल्याचे दिसते.
आज आपण रस्त्याच्या दुतर्फा जी झाडं बघतो,त्यावर सरकारने पांढरे चॉकलेटी पट्टे मारलेले असतात.
तो आदेश सम्राट अशोकचा.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची संकल्पना त्याची.
फळझाडे औषधी झाडे वाटसरु रोगी इत्यादींसाठी लावण्यात आलेली होती.
हे सगळं आजही आपण करत आहोत.काय कालबाह्य झालं आहे? स्वत:ला विचारा
अत्त दीप भव:
संदर्भ – बुद्ध आणि त्यांचा धम्म/ बुद्धाचा भौतिकवाद / बिग बँग थिअरी – महाराष्ट्र टाइम्स बातमी
भगवान बुद्धांचा मृत्यू कोणता पदार्थ सेवन केल्याने झाला? जाणून घ्या..
हे ही वाचा.. बुद्ध पौर्णिमा हिंदू तिथी पंचांगाप्रमाणे येते का?
काय पिंपळ दिवस रात्र हवेत प्राणवायू सोडतो ?
मातंग समाज अन तरुणांच्या अधोगतीला जबाबदार कोण?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on SEP 5, 2021 17:30 PM
Web Title – Science and Lord Buddha: Is Buddha Outdated?