देशातील काही भागात शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेतकोरोना (coronavirus) म्हणजेच कोव्हीड 19 (covid 19) या व्हायरस ने जगाची झोप उडवली आहे.जगभरात हाहाकार माजवला आहे.जगातील मोठमोठ्या महसत्ता कोरोना कोलमडून पडल्या असून युद्ध पातळीवर यावर लस शोधली जात आहे.
अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये
यासोबतच काही ठिकाणी करण्यात आलेले लॉकडाउन अनलॉक करण्याची प्रक्रिया देखिल आस्तेकदम सुरू आहे.भारतात सुद्धा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे.मंगळवारी (17 नोव्हेंबर) राज्यात रुग्णांची एकूण संख्या ही 16 लाख 23 हजार 503 एवढी झाली आहे. राज्याचा Recovery Rate 92.64 टक्के एवढा झाला आहे. तर मृत्यूदर हा 2.63 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 81 हजार 925 रुग्णांवर उपचार सुरू आहे.जगभरातील देशांच्या तुलनेत कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.अमेरिकेत कोरोनामुळे एकूण 2,51,256 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिकेनंतर जगात सर्वाधिक मृत्यू भारतामध्ये झाले आहेत. भारतात कोरोनामुळे (15 ऑक्टोबर 2020) 1,28,668 लोकांचा मृत्यू झाला आहे.(coronavirus death)
शाळांमध्ये कोरोना टेस्ट (corona test) अनिवार्य
दरम्यान, या पार्श्वभूमीवर भारतात अनलॉक ची प्रक्रिया सुरू झाली असून देशातील काही भागात शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्या अनुषंगाने काही राज्यात शाळा सुरूही करण्यात आल्या.हरयाणा येथेही शाळा सुरू करण्यात आल्या असून येथील जिंद गावात सुद्धा शाळा सुरू करण्यात आल्या.इयत्ता 9 वि ते इयत्ता 12 वि च्या विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक तत्वावर शाळा उघडण्यात येत आहेत.जिंद येथेही शाळा उघडण्यात आल्या.जिंद येथील या शाळेतील तब्बल 8 शिक्षक आणि 11 विद्यार्थी कोरोना संक्रमीत असल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे.यानंतर सर्वच शाळांमध्ये कोरोना टेस्ट (corona test) अनिवार्य करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.सोमवारी येथील राजकीय कन्या शाळेतील चार विद्यार्थिनीही कोरोना संक्रमीत असल्याची माहिती समोर आली आहे.यामुळे कन्या शाळेला चार दिवसांची सुटी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सुद्धा 23 नोव्हेंबर पासून शाळा उघडण्याचे आदेश देण्यात आले असून
इयत्ता 9 ते 12 वि च्या विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आदेश आहेत.
नियम आणि अटींचे पालन करायचे असून आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठीची परवानगी
पालकांनी शाळेला एक संमती पत्रक लिहून कळवायची आहे.म्हणजे पालकांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे.
जिंद येथील शाळेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवायचे का? हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1