सावित्रीबाई फुले वसतिगृह पुणे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती ने जागा वाटप आणि कोटा वितरणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला असून देशातील उच्चस्तरीय संस्थेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहप्रमुख यांनी पदाचा गैरवापर करत स्वतः च्या विभागासह काही विशिष्ट विभागांना झुकते माफ दिले आहे. वसतिगृह कार्यालयाच्या चुकीच्या धोरणामुळे अनेक गरजू विद्यार्थी वसतिगृह अभावी शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. सामान्य विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या दोषींवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे.
सावित्रीबाई फुले वसतिगृह जागा वाटप आणि कोटा वितरणामध्ये घोटाळा?
प्रश्न – वसतिगृह मिळाले नाही म्हणून आपला प्रवेश रद्द करून शिक्षण सोडून घरी गेलेल्या विद्यार्थीच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण ?
आठ दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोढवड गावातील कष्टकरी मजुरांची दोन मुले विद्यापीठामधील वाणिज्य विभागात प्रथम वर्ष m.com करण्यासाठी आले होते. आठ दहा दिवसांपासून त्यांनी इकडे तिकडे फिरून पुणे शहरात दिवस काढले. आणि शेवटी या सर्व जाचाला कंटाळून त्यामधील एक विद्यार्थी वसतिगृह मिळत नाही म्हणून शिक्षण सोडून घरी निघून गेला. एक विद्यार्थी घरी जाणे म्हणजे त्यांची व त्यांच्यासह येणाऱ्या पुढील कित्येक पिढ्यांना शिक्षणापासून वंचित करणे होय. गावा खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना असे परत जावे लागणे हे आपल्या विद्यापीठाचे अपयश आहे. माझी विद्यापीठ प्रशासनास विनंती आहे की त्यांनी तात्काळ सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृहात जागा उपलब्ध करून द्यावी. नाहीतर राहिलेले विद्यार्थी देखील आपले प्रवेश रद्द करून घरी निघून जातील.
विद्यार्थींना वसतिगृहात जागा मिळत नाही, पौष्टिक आहार मिळत नाही , शिष्यवृत्ती वेळत जमा होत नाहीत , तसेच इतर आवश्यक सेवा सुविधा वेळेत उपलब्ध होत नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो आणि हे भ्रष्ट रक्तपिपासू अधिकारी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करतात. समाज आणि चळवळीच्या नावावर मोठी होतात. आणि फक्त आणि फक्त स्वतःची घरं भरण्याची कामे करतात.
ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, कामगार , बहुजनांच्या मुलांना लुटण्याचे काम करतात.
अशा नालायक भ्रष्ट अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
या सर्व भ्रष्टाचाराची CBI मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी
*विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने देशातील उच्चस्तरीय संस्थेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
सखोल चौकशीअंती जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यासर्वांवर निलंबन तसेच इतर कठोर कारवाई करून
सर्व रक्कम वसूल करण्यात यावी.तरच या सर्वसामान्य विद्यार्थी व पालकांना न्याय मिळणार आहे.
आम्ही या गोष्टीचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहू.

राहुल ससाणे
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती 9823810301
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 02,2023 | 20:00 PM
WebTitle – Scam in Savitribai Phule hostel seat allocation and quota distribution?