दिग्दर्शक पा.रंजीत आपला मुद्दा मांडताना कधी आढेवेढे घेत नाहीत.जे म्हणायचं असतं ते थेट भिडणारं.विचारधारा मांडताना सुद्धा ते कधी समझोता करत नाहीत.कबाली आणि काला मध्ये ते ठळकपणे मांडलेलं,जाणवतं.सारपट्टा परंबराइ (Sarpatta Parambarai) ही बॉक्सिंग मॅचवर आधारित स्पोर्ट फिल्म आहे.कमर्शियल सिनेमा करताना काही गोष्टींची अडचण असते.मर्यादा येते.त्यामुळे मास ऑडियन्स लक्षात घेऊन फिल्मची निर्मिती होत असते.
पा.रंजीत कमर्शियल सिनेमातून कोणत्याही दडपणाशिवाय या गोष्टी प्रेक्षकांच्या समोर मांडत आहे.या धाडसाचे कौतुक केले पाहिजे.सारपट्टा परंबराइ,सारपट्टा परम्बराई किंवा सारपट्टा परंपरै तमिळ नाव असल्याने त्याची ही वेगवेगळी मराठी वर्जन तयार झालीत.सारपट्टा चा अर्थ चार चाकू असलेला पट्टा तर परंबराइ म्हणजे कुळ परंपरा.जसं गायकांचं घराणेपरंपरा असतं तसं हे बॉक्सिंग खेळणाऱ्या लोकांचं घराणं,कुळ.परंपरा साठी Clan हा उर्दू शब्द चित्रपटात योजला आहे.तो चेन्नईतील उत्तर भागातील मुस्लिम समुदायात वापरला जातो.
फिल्मची कथा
तर सारपट्टा परंबराई फिल्मची कथा म्हणजे गोष्ट ही सत्तरच्या दशकातील बॉक्सिंग कल्चरवर आधारलेली आहे.फिल्म पूर्णपणे बॉक्सर मोहम्मद अली यांच्या प्रेरणेतून बनलेली आहे.सत्तरच्या दशकातील आणीबाणीच्या काळातील घडमोडीना स्पर्श करणारी ही फिल्म.एका गावातील दोन बॉक्सिंग संघात होणारी बॉक्सिंग मॅचची लढत,त्यातून निर्माण होणारी ईर्षा,ठसन,त्याचे भांडण मारामाऱ्यात होणारे पर्यावसन,मानविय स्वभावगुणांचे वैशिष्ट्य,स्पर्धकांची रोमांचक लढत,कष्टकरी वर्गाचं जीवन या सगळ्यांचे मिश्रण तुम्हाला या सिनेमात पाहायला मिळेल.त्या पार्श्वभूमीवर त्या काळातील राजकीय वातावरण हे चित्रपटाला विशेष बनवते.
आणीबाणीनंतर करुणानिधी इंदिरा गांधी यांच्यापुढे झुकले नाहीत. त्यांचे सरकार बरखास्त झाले.
द्रमुकच्या सर्व बड्या व लहान नेत्यांना मिसा कायद्यांतर्गत तुरूंगात टाकले गेले.त्या काळातल्या द्रविड राजकारणाची स्थिरता हा चित्रपट साजरा करतो.
एमजीआरने कॉंग्रेसमध्ये सामील झाल्याचा निषेधही करण्यात आला आहे.चित्रपटात जातीय मुद्यावर उघडपणे भाष्य नाही,
पण पेरियारच्या राजकारणाचा हिरोच्या लग्नावर होणारा परिणाम नक्कीच दिसून येतो.
कबिलानच्या लग्नात नवविवाहित जोडपे बुद्ध, पेरियार, आंबेडकर आणि करुणानिधी यांच्या फोटोसोबत पोझ देतात.
काही फॅक्टस
या चित्रपटाचा मुख्य नायक आर्या (कबिलान) च्या रोलसाठी अगोदर सूर्या चा विचार करण्यात आला होता.पा.रंजीत ने सूर्याला समोर ठेवून या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिली असे समजतेय.परंतु नंतर इतर प्रोजेक्ट मध्ये व्यस्त झाल्याने आणि तारखांचा मेळ न जुळल्याने ही भूमिका आर्या कडे गेली.हाच सूर्या आता जयभीम असं टायटल असणारा सिनेमा करत आहे.अर्थातच आता असं वाटतं की या भूमिकेसाठी आर्या पेक्षा वेगळी चॉइस असू शकली नसती.त्याने आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला.मुख्य नायक कबिलान (aarya) हे पात्र मोहम्मद अली वर बेतलेलं आहे.या चित्रपटाचे पार्श्वसंगीत क्वेंटीन टारंटिनो यांच्या डान्सिंग रोजची पैसा वसूल फाईट
चित्रपटातील एक पात्र डान्सिंग रोजची फाईट या चित्रपटतील पैसा वसूल फाईट मानली जातेय. डान्सिंग रोज हे पात्र शब्बीर कल्लारकल याने जबरदस्त रंगवलं आहे. डान्सिंग रोज हे पात्र युके च्या नसिम हमीद वर बेतलेले आहे.खालील यूट्यूब व्हिडिओ मध्ये त्याची ओरिजिनल फाईट पाहता येईल. परंतु सिनेमात असणारी फाईट पाहिली तर तुमचे पैसे तिथेच वसूल होतात हे नक्की. विशेष म्हणजे डान्सिंग रोज हा अंटागोनिस्ट असताना प्रेक्षकांना आवडून जातो. ट्विटरवर लोकानी डान्सिंग रोज ट्रेंड केला होता,त्यावरून तुम्हाला या पात्राची परिणामकारकता लक्षात येईल. चित्रपट सत्तरच्या दशकातील असल्याने अनेक बारीक बारीक गोष्टीवर काम करण्यात आले आहे.जून तमिळ चित्रपट त्यातील तत्कालीन काळातील वेशभूषा पाहिली तर या चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषा तुम्हाला नेमक्या दिसतील.अगदी डोक्यावर केसांची स्टाईल,मिशा,दाढी,कपडे.स्त्रियांच्या नाकातील नोजपीन,अशा अत्यंत बारीक बारीक गोष्टीवर काम केले आहे.यासोबत पोलिसांची वेशभूषा,त्याकाळचे साजेसे नेपथ्य,इव्हन रस्ते,आणि घरांची ठेवण या गोष्टीवर विशेष लक्ष देत अक्षरश: जुनं मद्रास जीवंत करण्यात आलं आहे.त्यामुळे चित्रपट पाहताना तुम्ही त्याकाळाशी एकरूप होता. पा.रंजीत एका मुलाखातीत (18 july ) म्हणाले की लोकांना वाटतं चित्रपट क्षेत्रात दलितांचे प्रश्न केवळ आर्ट फिल्म मधूनच मांडले जाऊ शकतात.गेल्या दहा वर्षात मात्र हे चित्र बदललं आहे.मी जेव्हा पहिला चित्रपट (2012) बनवला तेव्हा लोक म्हणायचे आंबेडकरांचा फोटो दाखवला तर मदुराईत जाळपोळ होईल.आग लागेल,पण ते युग आता मागे पडलं आहे.चित्र बदललं आहे.आम्ही आता आंबेडकर चित्रपटातून दाखवू शकतोय.जर चित्रपट चांगला असेल तर लोक त्याच्याशी जोडले जातात.चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या चालेल की नाही याबद्दल लोक साशंक असतात.पण चित्रपट पाहणारा मोठा वर्ग आहे.हे त्यांच्या लक्षात येत नाही.राजकीय भाष्यापलिकडे चांगली कलाकृती सुद्धा निर्माण झाली पाहिजे. Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई केवळ बॉक्सिंग मॅच पुरती मर्यादित रहात नाही. एका वळणावर चुकीच्या निर्णयाने आयुष्याची वाताहत करून घेणारा नायक स्वत:ला संपवू पाहतो. स्वत:बद्दल त्याला प्रचंड चीड आणि घृणा उत्पन्न होते.सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात अशा घटना येतात तेव्हा काय होतं? Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई हा चित्रपट अशा खोलात जाऊन भाष्य करतो.चुकीची संगत लागल्याने उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पूर्ववत करायला पुन्हा निर्धाराने उभं करण्याची ताकद नायकाला स्वत:च निर्माण करावी लागते.त्यात तो कितपत यशस्वी होतो हे चित्रपटात पाहणे एक सुंदर अनुभव आहे. एका सीन मध्ये नायिका आई होणार असल्याचे नायकाला सांगते,तुला मुलगी हवी की मुलगा? या प्रश्नावर नायक सहजपणे काहीही चालेल.म्हणून मोकळा होतो.तेव्हा नायिका मला मुलगीच हवी असं म्हणते. विशेष म्हणजे हे त्यांचं दुसरं अपत्य असतं,यातून जो मॅसेज दिलेला आहे.तो पुरुषप्रधान समाजाने समजून घेतला पाहिजे. गोडाऊन काम करत असताना पोत्याच्या ढिगारावर टेकून काबिलान चा मित्र त्याला म्हणतो – “आपल्याला संधी सहजासहजी मिळत नाही. तू धाडस दाखव काबिलान, हा आपला काळ आहे” तेव्हा मागे बाबासाहेबांचा हसरा शांत आणि गंभीर दिसणारा फोटो आपल्याला आश्वस्त करतो. लग्नात नाचताना वस्तीतील लोक भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर,भोवताली नाचताना दिसतात.दोन लहान मुलं मूर्तीच्या एजवर मूर्ती ठेवलिय त्या चवथऱ्यावर बसले आहेत.बुद्ध हे देव आहेत. ईश्वर स्वरूप आहेत.असं काही लोक मानतात.मात्र तो एक हाडामासाचा माणूस होता.हे बुद्ध अनुयायी जाणतात.इथं मुद्दा पावित्र्याचा येतो.आणि दैवी मूर्ती समोर बसण्याचे,जवळ जाण्याचे काही संकेत असतात.काही वेळा बंदी असते,स्त्रियांना बंदी असते.इथं तसं काही दिसत नाही.आजोबांच्या मांडीवर आश्वस्त बसणाऱ्या नाती प्रमाणे त्या मुली बसलेल्या आपल्याला दिसतात.तिथे कोणत्याही प्रकारचे “सोवळे” नाही.ज्यांनी मूर्तिपूजेला विरोध केला त्या बुद्धाच्या मूर्तीच जगभरात सर्वात जास्त आहेत.असं,काही लोक उपहासाने म्हणतात मात्र त्यांना त्यामागचं हे कल्चर समजत नाही.या मूर्त्यांचे अस्तित्व तुम्ही समजता तसं दैवी बिलकुल नाही.ते प्रातिनिधिक आहे. या चित्रपटातील बॉक्सर्स लोकांनी (अभिनेत्यांनी) प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसते.ती मेहनत त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वरून स्पष्ट दिसते. मुख्य नायकाची भूमिका करणारा आर्या सहा महीने दिवसातून सहा तास वेगवेगळ्या कसरती वर्क आऊट करत होता. त्याचा परिणाम सिक्स पॅक्स एब्ज मध्ये दिसतो.ते आर्टिफिशियल नाहीत. शेवटच्या सीनमध्ये नायक कबिलान डार्क सिल्की निळ्या कलरचा रोब घालून पाठमोरा रिंगणाकडे निघालेला हा नुसत्या बॉक्सिंग साठी रिंगणात उतरायला चालला नसून तो “आमचं असणं आणि आमचं इथं पाय रोवून ठामपणे उभं राहणं” दर्शवत आहे,आणि लोक त्याला तू आमच्यासाठी जिंकलं पाहिजेस,असं म्हणतात.मात्र नायक या शेवटच्या फाईट मध्ये यशस्वी होतो का? हे चित्रपट पाहूनच अनुभवणे योग्य राहील. चित्रपटाचे पार्श्वसंगीत विशेष आहे.तसेच चित्रपटाचा वेग प्रचंड खिळवून ठेवणारा आहे. तुम्ही तीन तासात विदाऊट ब्रेक हा अविस्मरणीय आनंद भाषेचा अडसर विसरून घेता ही आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. Sarpatta Parambarai सारपट्टा परम्बराई हा चित्रपट तुम्ही अॅमेझोन प्राइमवर पाहू शकता. जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा. (वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा) First Published by Team Jaaglya Bharat on JULY 25, 2021 22 :57 PM WebTitle – sarpatta-parambarai-film-review-2021-07-25डिटेलिंग वर्क
काही महत्वाचे सीन्स
प्रतीकांचा परिणामकारक वापर
अप्रतिम लिहीलंय सरपट्टा बद्दल. धन्यवाद