संत तुकाराम महाराज माझ्याकडे 22 वेळा आले – सुबोध भावे : हरहर महादेव या चित्रपटामुळे राज्यात सध्या वातावरण तापत आहे,तसेच यामुळे मराठी अभिनेता सुबोध भावे देखील सतत चर्चेत आहे.या चित्रपटात (subodh bhave) सुबोध भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली आहे.रविवारी 18 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला.मात्र निर्मिती प्रक्रियेत असतानाच अनेकांनी याबाबत आक्षेप घेण्यास सुरूवात केली होती.छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी तर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असे म्हटले होते.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं होतं की,
“हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.
हर हर महादेव हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी
झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे.
इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व
तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये,
याबाबत #स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे.
या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल.”
यानंतर राज्यातील वातावरण तापले होते,कोल्हापुरातही यावर विरोध सुरू झाला,तसेच तिथे काही शिवप्रेमींनी अभिनेते सुबोध भावे यांची भेट घेतली होती.या चित्रपटातील काही दृश्य व संवाद काढून टाकावेत अशी विनंती यावेळी शिवप्रेमींनी केलेली होती.
सुबोध भावे यांनी शिवप्रेमींसोबत चर्चा करताना त्यावेळी म्हटलं होतं की ” यापुढे कोणताही ऐतिहासिक बायोपिक मी करणार नाही.”
“माझं महाराजांवरील प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं आहे. ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण इथून पुढे ऐतिहासिक चित्रपटातील कोणाचीही भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक सिनेमा असेल,”
सुबोध भावे यांनी या दरम्यान,आपण संत तुकाराम महाराज यांच्यावर चित्रपट करत असल्याचे म्हटले होते,त्यावेळी त्यांनी म्हटलं “मी आता संत तुकाराम महाराजांवर चित्रपट करत आहे. तुकाराम महाराज माझ्याकडे २२ वेळा आले. माझा पहिला चित्रपट हा देखील तुकाराम महाराज यांच्यावरच होता. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही”.
सुबोध भावे संत तुकाराम महाराज यांची भूमिका करत असलेला चित्रपट हा हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून त्याचं लेखन व दिग्दर्शन ओम वैद्य करत आहे. मे २०२२मध्येच संत तुकाराम महाराजांवरील या बायोपिकची घोषणा करण्यात आली होती.
प्रेम किंवा जातीबाहेर लग्न केल्यामुळे दरवर्षी अनेक हत्या – न्या.चंद्रचूड
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 20,2022, 16:23 PM
WebTitle – Sant Tukaram Maharaj came to me 22 times – Subodh Bhave