या कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली
सोनिपत सोनिपतच्या कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव बाबा राम सिंग असल्याची माहिती समोर आली असून ते कर्नालच्या सिंगरा गावातील रहिवासी आहेत. बाबा राम सिंग हे त्यांच्या गावातील गुरुद्वारेतील ग्रंथी होते. ते गेले २० दिवस रोज शेतकरी आंदोलनासाठी कर्नाल ते कुंडली सीमा असा प्रवास करत होते.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम सिंग आजही आंदोलनात सहभागी होण्यासाठी कुंडली सीमेवर आले होते.
आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठाच्या मागे जाऊन त्यांनी स्वत:वर गोळी झाडली. त्यांच्याकडे असलेल्या खासगी बंदुकीतून त्यांनी गोळी झाडली असल्याची माहिती मिळत आहे. बाबा राम सिंग यांच्या या कृत्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. उपस्थित शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने पानीपत येथील रुग्णालयात उपचारासाठी नेलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं आहे.बाबा राम सिंग यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली असून ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ही चिठ्ठी पंजाबी भाषेत असून तिचा अनुवाद असा –
शेतकऱ्यांचे दु:ख पाहिले,आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाहून मला दु:ख झालं.
सरकार त्यांना न्याय देत नाही
जो की अन्याय आहे
जो अन्याय करतो तो पापी आहे
अन्याय सहन करणे देखील पाप आहे
कुणी शेतकर्यांच्या हक्कासाठी तर कोणीतरी जुलमा विरोधात काहीतरी केले आहे
कुणीपुरस्कार परत करून आपला राग व्यक्त केला आहे
कुणी शेतकर्यांच्या हक्कासाठी, सरकारी जुलमाच्या विरोधात सेवादार आत्मदहन करतो
जुलूमशाहीविरूद्धचा हा आवाज आहे
हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा आवाज आहे.
वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह
शेतकरी नेते सांगतात की दररोज एका शेतकऱ्याचा मृत्यू होत आहे. कोरोना काळात, कडाक्याच्या थंडीमध्ये उघड्यावर असे आंदोलन करणे खूप आव्हानात्मक आहे. तथापि, शेतकरी खूप मजबूत आहेत. ते म्हणाले की त्यांनी 6 महिन्यांपर्यंत आंदोलन करण्याची तयारी केलेली आहे. या आंदोलनात आतापर्यंत सहभागी 11 हून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत.
हेही वाचा.. कृषी विधेयक : बडे उद्योगपती शेतकऱ्यांचा हक्क हिरावणार
हेही वाचा.. एमएसपी वा किमान आधारभूत मूल्य
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)