पुत्र व्हावा ऐसा बंडा, त्याच्या कर्तृत्वाचा झेंडा.. असा कर्तृत्ववान पुत्र म्हणजे समाजसेवक संजयकुमार सुर्यवंशी साहेब. एखादा कार्यक्रम असो, एखादी वैयक्तीक घटना, अडचण असो किंवा इतर कोणताही प्रसंग असो.. त्यांनी सढळ हस्ते पुढे केलेला हात हा माणूसकीचाच असतो. सर्वांच्या सुख दुःखात ते नेहमीचं सहभागी होत असतात. आपणही समाजाचे देणे आहे या भावनेने प्रत्येक माणसाला तळमळीने कामी पडणार व्यक्तीमत्व. मला आठवतय सरांचा रक्त गट ‘B निगेटिव्ह’ हा अत्यंत तुरळक असणारा, परंतु त्यांनी आजवर सात ते आठ वेळा रक्तदान केलं आहे. आयुष्याच्या शेवटीही आपल्या अवयवांचा कोणाला तरी उपयोग व्हावा या प्रामाणिक हेतूने त्यांनी आपले अवयवदान करण्याचा निश्चय केला आहे. आई वडील सुशिक्षित असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना चांगले संस्कार, मार्गदर्शन लाभले. त्यातूनच ते घडत गेले आणि म्हणूनच आज ते सर्वांना मार्गदर्शक, प्रेरणादायी, आदर्श वाटतात, त्यांच्याबद्दल सर्वांना अभिमान आणि प्रेम भावना वाटते.
वृध्दाश्रमात वृध्दांना दान, अनाथ मुलांना शैक्षणिक मदत, खेळाची आवड असणाऱ्या अनेक गोरगरीब नवोदित होतकरु खेळाडूंना ‘टी शर्ट’, फुटबॉल, क्रिकेट बॅट’चे वाटप, विविध सणांच्या शोभायात्रांना पुलाव, बिस्कीट, पाणी वाटप, कोरोना काळात अनेक कुटुंबांना आधार तर कोरोना तपासणीसाठी अनेकांना आर्थिक मदत केली. त्याकाळात त्यांचे जिवलग मित्र डॉ. विश्वंभर शिंदे यांनी त्यांना खूप मोठ सहकार्य करुन त्यांच्या समाज कार्यात मोलाचा वाटा उचलला. कोरोना काळात काही मृतदेहांनाही त्यांनी स्वतः अंत्यसंस्कार केले आहेत. नैसर्गिक आपत्तीत आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत, नांदेड जिल्हात असो, ते राहत असलेल्या बदलापूर, अंबरनाथ तसेच इतर कोणत्याही ठिकाणी महापुरुषांची संयुक्त जयंती असो, बुध्द विहार, स्मारक, इतर कोणताही उपक्रम असो किंवा कोणतीही अडचण असो ते नेहमीचं मदतीसाठी सर्वशक्तीनिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी सामाजिक बांधिलकी आणि समाज भावनेबरोबरच मंगल मैत्री भावनाही कायम जपली आहे. त्यांच्या रुपानं चळवळीला लाभलेलं ते एक आधारस्तंभ, आधारवडचं आहेत.
कोकणरत्नभूमी सामाजिक संघटनेच्यावतीने आम्ही अनेक उपक्रम राबविले. त्यावेळी सुर्यवंशी साहेबांनी आम्हांलाही अनेक वेळा मदत केली. साहेब नेहमीचं म्हणायचे, तुम्ही चांगले उपक्रम राबवित आहात, काही तरी चांगले करत आहात, त्यामुळे काही मदत लागली तर निसंकोचपणे कधीही माझ्याकडे मागणी करा. मी साहेबांना अनेक वेळा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी आग्रहाने निमंत्रीत केले पण, त्यांनी एकाही कार्यक्रमाला कधीचं उपस्थिती न दर्शविता नेहमीचं प्रसिद्धीपासून दूर राहत सहकार्य आणि मार्गदर्शन करत राहिले.

माझ्या ‘दृष्टीक्षेप’ लेख संग्रहासाठीही त्यांनी सढळ हस्ते मदत केली. उजव्या हाताने दान केलेलं डाव्या हातालाही कळू न देणारे,
पडद्यामागील निस्वार्थी, दानशूर व्यक्तीमत्व, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे.
गेल्या काही वर्षात साहेबांचा जो सहवास लाभला त्यातून त्यांचे ग्रेट उदारमतवादी, प्रेमळ, आदर्श, मार्गदर्शक,
प्रेरणादायी सेवाभावी असे व्यक्तीमत्वाचे विविध पैलू दिसून येतात. एवढेच नाही तर, चिंचवली स्मशानभूमी प्रकरणी मध्यंतरी काही लोकांनी मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही मान्यवर मंडळींनी मला अनमोल सल्ला देऊन माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले त्यात साहेबांचाही प्रमुख समावेश आहे.
पन्नासाव्या वर्षी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून कार्यकारी अभियंता म्हणून स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा फार मोठा बॅड पॅच निर्माण झाला आणि मानसिक, आर्थिक फारच मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांच्या मदतीला त्यांचे बालपणीचे जिवलग मित्र डेप्युटी कमिशनर दिलीप पवार, कार्यकारी अभियंता भारत गुंटुरकर, उप प्रमुख अभियंता महेंद्र उबाळे, डॉ. दिनेश पवार धावून आले. त्यांना हॉटेल व्यवसायात उतरवून त्यातून त्यांना बाहेर काढले, मोलाचे सहकार्य केले. मित्र सुखामध्येच नाही तर, संकट काळात साथ देणारे पाहिजेत. मित्रत्व काय असतं हे त्यांच्या मित्रांनी सिद्ध करुन दाखविले. सध्या हॉटेल व्यवसायात त्यांची वाटचाल दमदार असून भविष्यात हॉटेल व्यवसायात ते निश्चितच यशाची शिखरे पादाक्रांत करतील यात शंकाच नाही.
दोन वर्षापुर्वी त्यांच्या आईला अर्धांगवायू झाला तेव्हा त्यांनी सर्व वैद्यकीय यंत्रणा उभ्या करुन आईच्या तब्बेतीत सुधारणा घडवून आणली.
काही महिन्यातच त्या पुर्ववत होतील. डॉक्टर, सिस्टर यांच्या देखरेखीखाली आई आजही एका स्पेशल रुममध्ये उपचार घेत असून,
महाराष्ट्रातील आणि परदेशातील सर्व नातेवाईकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांनी जोडून ठेवले आहे.
घरात आणि नातेवाईकांमध्ये ‘कुमार’ ह्या टोपन नावानेचं संजयकुमार सुर्यवंशी यांना ओळखले जात असले तरी, सर्व मित्रांमध्ये ते संज्या नावानेचं ओळखले जातात. ते कुटुंबवत्सल असून, आई वडिलांवर त्यांचे असलेले निस्सीम प्रेम त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून दिसून येते. त्यांच्या आईला सर्व नातेवाईकांना भेटण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे त्यांनी अर्धांगवायू असणाऱ्या आईला ८०० किलो मिटर लांब असलेल्या नांदेड येथील राहत्या घरी जाऊन त्यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा साजरा करुन, समाजामध्ये आई वडिलांची सेवा करावी असा एक अनमोल संदेश दिला.
संजयकुमार सुर्यवंशी साहेबांची सहचारिणी मनिषा सुर्यवंशी डॉक्टर असून त्या सध्या Health care म्हणून स्त्रियांचे Physical Fitness Classes, ‘Glow Fit With Manisha’ नावाने अंबरनाथमध्ये घेत आहेत. तर त्यांची तिन्ही मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आई वडील डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील असेल तर, आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील व्हावे अशी प्रत्येक आई वडिलांची प्रबळ इच्छा असते. मुलांना फिल्डच्या बाहेर पडू दिल जात नाही अशी एक मानसिकता असते. पण, त्यांची तिन्हीही मुल उच्चशिक्षित असून, मोठी मुलगी दिशा व्यवसायात असून, त्या व्यतिरिक्त आवड म्हणून belly डान्सचे मोठे स्टेज शो करते, मुलगा सिद्धांत Graduation सोबत सामाजिक बांधिलकी आणि समाज भावना जपत जेष्ठ नागरिकांची सेवा करत आहे. तर, मुलगी ईशा फिल्म क्षेत्रात अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे. त्यांनी करियर निवडीसाठी मुलांना स्वातंत्र्य दिले आहे. खरंच, मुलांच्या आवडीनिवडी जोपासत करियरसाठी मुलांना प्रोत्साहन देणे हीच पालकांची भूमिका असेल तर, मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच उत्तुंग भरारी घेतील, आकाशाला गवसणी घालतील यात शंकाच नाही.
संजयकुमार सुर्यवंशी साहेबांच्या स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने, प्रामाणिकपणा,
सौजन्यशीलपणा, अडचणीत धावून जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. त्यांचा मित्र परिवार फार मोठा आहे.
आपल्या सोबत असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी कधी लहान असल्याची जाणीव होऊ दिली नाही.
त्यांनी नेहमीचं सर्वांना सन्मानाची, आदराची, प्रेमाची वागणूक दिली. सर्वांना सहकार्य करुन, सोबत घेऊन जाण्याचा नेहमीचं प्रयत्न केला.
म्हणूनच त्यांच्याबद्दल सर्वांनाच आत्मियता, जिव्हाळा वाटतो.
सामाजिक क्षेत्रात त्यांचे फार मोठ योगदान असूनही ते प्रसिद्धीपासून नेहमीचं दूर राहतात, पडद्यामागे राहतात.
म्हणून त्यांच्या ५७ व्या जन्म दिवसानिमित्त त्यांच थोडक्यात व्यक्तीमत्व उलगडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
अशा दानशूर, प्रेमळ व्यक्तीमत्वाचे भावी जीवन सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदीमय,
यशस्वी, सुरक्षित, इच्छित मनोकामनापुर्तीचे आणि निरोगी दीर्घायुष्यमय जावो ह्याच मंगलमय अनेकोत्तम सदिच्छा !

मिलिंद कांबळे चिंचवलकर
लेखक,सामाजिक कार्यकर्ते
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 06,2023 | 19:40 PM
WebTitle – sanjaykumar suryawanshi