Sanatani Bulldozer : गुजरातमधील राजकोटमध्ये एक धार्मिक रथयात्रा काढण्यात आली होती, जी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. हे प्रकरण राजकोटमधील नाना मावा भागातील आहे. येथील जगन्नाथ मंदिरापासून मंगळवारी रथयात्रा काढण्यात आली. ज्याचे नेतृत्व “सनातनी बुलडोजर” करत होते. बुलडोझर च्या लोडिंग बकेटवर Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर असे लिहिलेले बॅनर होते.
यासंदर्भात अधिक बोलताना आयोजक म्हणाले “सनातन धर्माच्या रक्षणासाठी” धार्मिक रथात बुलडोझरचा समावेश करण्यात आला आहे.
शहरातील पॉश नाना मावा रोडवर असलेल्या मंदिरापासून सकाळी 9.30 वाजता
यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मंदिरातील देवतांची पूजा केली.
जाणून घ्या मंदिराचे मुख्य पुजारी काय म्हणाले
धार्मिक मिरवणुकांमध्ये भगवान जगन्नाथ किंवा भगवान कृष्ण, त्याचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती रथात बसवल्या जातात
आणि शहरात त्यांची मिरवणूक काढली गेली.
ही रथयात्रा राजकोटच्या मुख्य रस्त्यांवरून 26 किलोमीटर फिरून सायंकाळी जगन्नाथ मंदिरात समाप्त होईल.
रथयात्रा सुरू झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजकोटच्या जगन्नाथ मंदिराचे मुख्य पुजारी मनमोहन दास म्हणाले,
‘या विशेष रथयात्रेत सनातनी बुलडोझर चालत आहे. बुलडोझरचे महत्त्व आणि उद्देश सनातन धर्माचे रक्षण आणि प्रचार करणे आहे.
यूपी-एमपीसह अनेक राज्यांमध्ये बुलडोझरचा वापर
हे नेमकं काय सुरू आहे हे समजून घ्यायचे असेल तर आपल्याला 2019 मध्ये, जावं लागेल,बुलडोजर ची सुरुवात तिथून झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने देशात ही पद्धत सुरू केली.
भाजप सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवर बुलडोझर उतरवत कारवाई केली होती.
यादरम्यान सरकारने अनेक घरे बुलडोझरने जमीनदोस्त केली. त्यानंतर हा बुलडोझर चर्चेचा विषय बनला होता.
गेल्या वर्षी कच्छमध्ये 400 इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या
मध्य प्रदेशसह इतर काही भाजपशासित राज्यांनी गुन्हेगारी खटल्यांमध्ये दाखल झालेल्या लोकांची घरे पाडण्यासाठी आता
उत्तर प्रदेश सरकारची बुलडोजर नीती स्वीकारली आहे.
गुजरात सरकारने अलीकडेच देवभूमी द्वारका येथील बेट द्वारका बेट
आणि गांधीवी मासेमारी बंदरातील अल्पसंख्याक समुदायांची शेकडो घरे आणि इतर इमारती जमीनदोस्त केल्या.
गेल्या वर्षी, कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरात 400 हून अधिक इमारती,
ज्यात अल्पसंख्याक समुदायातील लोकांची संख्या होती त्या पाडण्यात आल्या.
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 20 JUN 2023, 20:40 PM
WebTitle – sanatani Bulldozer rath yatra gujrat rajkot