मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे जात दक्षता समितीकडे त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अयशस्वी ठरलेत, असे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी वर धाड टाकून प्रसिद्धी झोतात आलेले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वत: अनुसूचित जातीतून असल्याचे सांगितले होते,
त्यांच्या या दाव्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी आक्षेप नोंदवत एक फर्जीवाडा सिरिज चालवली होती.तसेचआरक्षण मिळवण्यासाठी समीरच्या वतीने बनावट कागदपत्रे दाखवण्यात आली. असा आरोप करत स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मी आणि भीम आर्मीने जिल्हा जात छाननी समितीकडे तक्रार केली होती.
समीर वानखेडे यांच्या वतीने त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांची कायदेशीर टीम सादर करणार होती,मात्र टीम ने न्यायालयाला सांगितले की त्याचे जात वैधता प्रमाणपत्र त्याच्याकडे उपलब्ध नाही आणि ते सादर करण्यासाठी आणखी वेळ मिळावा असे आवाहन समीर वानखेडे यांच्या कायदेशीर टीमने केले आहे.
हेही वाचा समीर वानखेडे ची नोकरी तर जाणारच ! नवाब मलिक यांचा दावा
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
समीर वानखेडे यांच्या विरोधात आता दलित संघटना; छाननी समितीकडे तक्रार
समीर वानखेडे अडचणीत;कागदपत्रावर न्यायालयाचं मोठं भाष्य
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 29, 2021 10:58 AM
WebTitle – Sameer Wankhede could not submit caste validity certificate, asked for more time