शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे नेहमी कोणत्यातरी वादात असलेले पाहायला मिळतात.यावेळी संभाजी भिडे यांनी आहुपे गावात काढलेली गडकोट मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली असून भीमा शंकर ते शिवनेरी या मोहिमेमुळे आदिवासी भागातील गावांनी विरोध केल्याचे चित्र समोर आले आहे. परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरल्याचा आरोप करत यास प्रशासन जबाबदार असेल असे म्हणत आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी लेखी तक्रार करत केली आहे.यावेळी गावात धारकऱ्याना पिण्याचे पाणी देखील न दिल्याचा प्रकारही समोर आला आहे.तर ग्रामस्थांनी अनेक आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
याबाबतचे सविस्तर वृत्त जुन्नर टाइम्सने युट्यूबवरून प्रसारित केले आहे.आहुपे गावाचे माजी सरपंच आणि सध्या पेसा अध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे शंकर आबाजी लांघी यांनी याबाबत बोलताना म्हटले की,संभाजी भिडे यांच लोक जानेवारी 29 जानेवारीला येथे आले होते,त्यांनी 8 जानेवारीला तसे पत्र ग्राम पंचायतीला दिलेले होते,मात्र आम्ही मोहिमेला परवानगी द्यायची की नाही यासाठी चार दिवस चर्चा करत होतो,कारण आमचे गाव हे पेसा अंतर्गत येते,आणि त्यामुळे इथे कोणत्याही गोष्टीला शासनाची परवानगी आवश्यक असते.अगदी प्रधानमंत्री असतील तरीही त्यांच्या कार्यक्रमाला परवानगीची आवश्यकता असते,आमच्याकडे पहिली ते दहावी पर्यंतची निवासी शाळा आहे,आमच्याकडे मोठ्या संख्याने येणाऱ्या धारकऱ्यांची सोय करण्याच्या दृष्टीने जागेची व पाण्याची कमतरता आहे.त्यावेळी शिवप्रतिष्ठान संघटनेचे काही प्रतिनिधी आम्हाला येवून भेटले होते,आणि त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की आम्ही गावात थांबणार नाही,गावापासून पुढे तीन किलोमीटर किंवा मागे तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर आम्ही थांबू,आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या कुणाला अडवू शकत नाही,त्यामुळे आम्हीही मग हे मान्य केलं.
पाणी आम्हाला पिण्यायोग्य राहणार नाही
मात्र 29 तारखेला संभाजी भिडे यांची गडकोट मोहीम करणारे जवळपास 500 धारकरी इथे गावात आले,आणि त्यांनी आमचे पिण्याचे पाणी अंघोळीसाठी व इतर गोष्टीसाठी वापरले.त्याच पाण्यात कपडे धुण्यात आले.गावात पिण्यासाठी तेवढेच पाणी असल्याने आता हे पाणी खराब होणार हे जाणवल्याने आम्ही त्यांच्या प्रतिनिधींना सांगितलं की हे पाणी आम्हाला पिण्यायोग्य राहणार नाही,त्यामुळे यापुढे आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही.
मात्र अचानक मोठ्याप्रमाणार धारकरी तिथे आले.आम्ही त्यांना जागा दिलेली नसताना ते याच जागेत येऊन राहिले.दुसऱ्या दिवशी ते गेल्यानंतर इथे एवढी दुर्गंधी पसरली की कुणालाच या शिवारातून जाताच येत नव्हतं.एवढी विष्ठा आणि प्लॅस्टिक पडलेलं होतं.त्यामुळे आम्ही ग्रामस्थ मिळून प्रशासनाला एक पत्र दिलं आहे,आम्ही त्यांना तीन किलोमीटर लांब जागा दिलेली असताना त्यांनी पेसा कायद्याचे उल्लंघन करण्यात आलं.यागावात प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती यांना यायचं असेल तर त्यांनाही पेसा कायद्याच्या अंतर्गत परवानगी घ्यावी लागते,मात्र यांनी तशी कोणतीही परवानगी न घेता इथे येऊन राहिले,जवळपास सत्तर ते एंशी हजार इतक्या संख्येने लोक होते.असं शंकर आबाजी लांघी यांनी बोलताना म्हटलं.
आम्ही प्रशासनाला पत्र लिहून विचारलं की तुम्ही यांना परवानगी दिली होती का? आजही या रस्त्याने आपण गेलो तर प्रमाणाच्या बाहेर दुर्गंधीचा वास येतो, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे की आपण याची परवानगी दिली होती का? यावर काही इलाज केला आहे का? जर एखाद्या रोगाची साथ गावात पसरली आणि आमची मुलं बाळं आजारी पडली तर याला जबाबदार प्रशासन असेल.
कायदा फक्त आदिवासी लोकांसाठीच आहे का?
आम्ही आदिवासी जंगलाला आई मानतो आणि याच जंगलावर तुम्ही घाण विष्ठा करत असाल तर हा आमच्यावर अन्याय झाल्यासारखे आहे.
दुसरीकडे हे संवेदनशील क्षेत्र आहे,आमच्या आदिवासी स्त्रिया स्वसंरक्षणासाठी हातात कोयता घेऊन गेल्या,
तर वन विभाग आमच्यावर गुन्हे दाखल करतो मात्र काल जे धारकरी आले त्यांच्या हातात काठ्या तलवारी होत्या
त्यांच्यावर वनविभागाने गुन्हा का दाखल केला नाही? आम्हाला म्हणतात जंगलात फिरू नका,
आम्ही फिरलो तर एक एक माणसावर गुन्हा दाखल होतो आणि एवढ्या मोठ्याप्रमाणावर बाहेरचे लोक येऊन गेले त्यांच्यावर गुन्हा नाही,
म्हणजे कायदा फक्त आदिवासी लोकांसाठीच आहे का? असा प्रश्नही शंकर आबाजी लांघी यांनी यावेळी विचारला आहे.
तसेच हाही आमच्यावर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमचा आदिवास समाज असा आहे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकाना आम्ही पाणी देतो
घरात जे काही असेल चटणी भाकरी देतोच.ही आमची रूढी परंपरा पद्धतच आहे.परंतु दोन चार लोक असतील तर शक्य आहे,
एवढ्या मोठ्याप्रमाणावर आलेल्या गर्दीला आम्ही काय पुरवणार? आम्हालाच तशा सोई सुविधा इथं उपलब्ध नाहीत,आम्ही आज पेसा कायद्यामुळे आहोत,तोच जर पाळला जात नसेल तर आमचं अस्तित्व धोक्यात येईल अशी चिंताही शंकर आबाजी लांघी यांनी यावेळी व्यक्त केली.
जाती भगवान ने नहीं, पंडितों ने बनाई.. – मोहन भागवत
मातंग समाज इतिहास संदर्भात काही प्रश्न – शाहू पाटोळे
शरजील इमाम अन्य लोकांची देशद्रोह आरोपातून मुक्तता
लंडनच्या एडवर्ड चा औरंगाबादच्या सांची सोबत बौद्ध पद्धतीने विवाह
अदानी यांच्या अडचणीत वाढ NDTV सोडतायत पत्रकार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 06,2023 17:40 PM
WebTitle – Sambhaji Bhide’s Gadkot campaign in controversy, Demand for action