पुणे:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ब्राह्मण महासंघाचा वाद पेटताना दिसत आहे.आज पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयात राडेबाजी करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नात जे मंत्रोच्चार म्हटले जातात त्याबद्दल वक्तव्य केलं होतं,सांगलीतील एका सभेत त्यांनी त्यासंदर्भात वक्तव्य करत मंत्रोच्चाराचा अर्थ सांगितला,मात्र यामुळे आमच्या भावना दुखावल्या असा अजब आरोप अखिल ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला,आणि त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर दहा ते बारा ब्राह्मण महासंघाच्या आंदोलकांकडून नारेबाजी आणि अश्लील घोषणा देत आंदोलन करण्यात आलं,असा राष्ट्रवादीकडून आरोप करण्यात आला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील पोहोचल्या तेव्हा ब्राह्मण महासभेचे आंदोलक तिथून पळून गेले असे बोलले जात आहे.
काय आहे राड्याचा वाद?
सांगली मधिल सभेत मिटकरींनी भाषणादरम्यान एक किस्सा सांगितला, “एका ठिकाणी मी गेलो. कन्यादान होत होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना. नवरदेव पीएचडी, नवरी एमए झाली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा हात, तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. मम भार्या समर्पयामी. मी नवरदेवाच्या कानात सांगितलं आरे येड्या, ते महाराज म्हणतायत मम म्हणजे माझी भार्या म्हणजे बायको आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा. आरारारा… कधी सुधरणार”, असं मिटकरी म्हणाले.
यामुळे ब्राह्मण महासंघ नावाची संघटना चिडली आहे.यावेळी या ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “अमोल मिटकरी यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी,त्याचा खरा अर्थ सांगण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात गेलो होतो. आम्ही घोषणाबाजी केली.त्यांना कळेल अशा “भाषेत” आम्ही उत्तर दिलेलं आहे.
पत्रकारांनी प्रश्न विचारला की तिथे तुम्हाला धक्काबुक्की झाली का?
यावर दवे म्हणाले ,”नाही,आम्हाला धक्काबुक्की झाली नाही,आमच्या मध्ये पोलिस सुद्धा होते.
धक्का झाला असता तर बुक्की सुद्धा झाली असती,त्यांनी सुद्धा हे गृहीत धरलं असेल.
आता यापुढे हिंदू धर्मियांच्या प्रथा परंपरेला विरोध केला गेला तर आम्ही हिंदू महासंघ म्हणून
आणि हिंदुत्ववादी संघाचे म्हणून आम्ही असेच रस्त्यावर उतरू..
यावेळी पत्रकारांनी म्हटलं की तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यालयाजवळ गेलात..
तुम्ही म्हणता धक्का बुक्की झाली नाही,परंतु आम्ही तिथं उपस्थित होतो. ती झाली आहे.
परंतु महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याची आतापर्यंतची जी काही परंपरा आहे.
तिला कुठेतरी छेद दिला गेलाय असं तुम्हाला वाटतं का?
यावर आनंद दवे म्हणाले मान.गृहमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे आहेत,त्यांनी त्याचा विचार करावा,आम्हाला काही सांगायचं नाही.
ही प्रश्नोत्तरे सुरू असताना व्हिडिओ मध्ये कदाचित महिला पोलिस कर्मचारी यांचा आवाज आहे.
त्या दवे यांना बाजूला जायला सांगताना दिसतात आणि या आंदोलनाची कोणतीही कायदेशीर परवानगी तुमच्याकडे नाही असे म्हणताना दिसतात.
रुपाली पाटील काय म्हणाल्या?
माध्यमांशी बोलताना रूपाली पाटील म्हणाल्या, “लोकशाहीत कुणीही आंदोलन करू शकतो,मात्र ब्राह्मण महासंघाचे जे दवे आहेत त्यांनी आत घुसून अक्षरश: आमच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावर महिला पाठवल्या ही संस्कृती नाही. आता नेमकं त्यावेळी आम्ही तिथं नव्हते नाहीतर त्या भगिनीला आम्ही घेऊन गेलो असतो,अंगावर आलात तर आम्हालाही शिंगावर घेता येतं.परंतु ही पद्धत नाही,तुम्हाला कोणत्या गोष्टीचा निषेध करायचा आहे,तर आमच्या कार्यालयाच्या आसपासचा परिसर सोडून कुठेही निषेध करा आमचं काही म्हणनं नाही,परंतु आमच्या ऑफिसमध्ये यायचं,आमच्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगावर महिला घालायच्या,ही कुठली आंदोलनाची पद्धत आहे?” “आम्ही कुणालाही धक्काबुक्की केली नाही. मी जेव्हा इथं आले तेव्हा त्यांच्या महिला पदाधिकारी आमच्या रोहन नावाच्या पदाधिकाऱ्याच्या अंगावर गेल्या. तुमचं आंदोलन लोकशाही पद्धतीने परिसराच्या बाहेर करा असं आम्ही सांगत होतो. आम्ही त्यांच्या स्वागतासाठी बुके आणला होता. तसंच रुपये 101 दक्षिणा आणि केळी आणलं होतं मात्र केळी न घेताच ते निघून गेले”.
“सर्वात महत्वाचं अमोल मिटकरी भाऊंनी कुठलच चुकीचं वक्तव्य केलेलं नाही.ज्यामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या नाहीत.” असंही त्या म्हणाल्या. कार्यालयातील पदाधिकारी म्हणाले ” इथे दररोज भेट देण्यासाठी लोक येत असतात आम्ही त्यांच्यासाठी फुलांचा बुके देत असतो.परंतु आमच्याच कार्यालयात येवून आमच्याच नेत्यांच्या विरोधात तुम्ही अश्लाघ्य भाषेत घोषणा देत असाल,शिव्या देत असाल तर मग हे कुणी सहन करणार नाही,दरम्यान,पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं असताना त्यातील काही महिला चाल करून अंगावर आल्या,कॉलर पकडू लागल्या.अशावेळी पोलिसांनीच त्यांना बाहेर काढलं आहे.काल अमोल मिटकरी यांनी जे वक्तव्य केलं त्यावरून उठलेला गदारोळ पाहून असं वाटतं की महाराष्ट्रातील विनोदबुद्धी संपलेली आहे.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
गुणरत्न सदावर्ते यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणी
Amy Wax या युएस प्राध्यापिकेचं ब्राह्मण स्त्री विषयी वादग्रस्त वक्तव्य
राज ठाकरे यांना आता नीलेश कराळे मास्तर यांचे प्रत्युत्तर..म्हणाले
द काश्मिर फाईल्स:भाजप देशाचे वातावरण बिघडवत आहे:शरद पवार
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on APR 21, 2022 17:42 PM
WebTitle – Rupali Patil on akhil Brahmin mahasangh agitation in Pune