नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आहे. यूपी, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणासह देशातील अनेक राज्यांतील शेतकरी आज म्हणजेच सोमवारी दिल्लीत येत आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांच्या वतीने ‘किसान गर्जना’ निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र दिल्लीतील शेतकऱ्यांच्या या अगोदर झालेल्या मोर्चा निदर्शनापेक्षा हे मोर्चा आंदोलन वेगळं आहे.यावेळी भारतीय किसान संघ (BKS), या आरएसएस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS)शी संलग्न शेतकऱ्यांच्या संघटनेचं आंदोलन आहे. शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा करण्याच्या अनेक मागण्यांसह दिल्लीत किसान गर्जना निषेध मोर्चा काढणार आहे. राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचा मोर्चा पाहता अनेक भागात जामची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
शेतकरी रॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ट्रॅफिक पोलिसांकडून एक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे.
सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रामलीला मैदानाभोवती वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते.
शेतकरी का येत आहेत दिल्लीत, काय आहेत प्रमुख मागण्या-
भारतीय किसान संघाचे म्हणणे आहे की, फळे, भाजीपाला, धान्य, दूध इत्यादी पुरवणारे शेतकरी
आज त्यांच्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने अत्यंत निराश झाले आहेत
आणि त्यामुळे आत्महत्या करत आहेत.यासोबतच बीकेएस कडून इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.
– सर्व शेतमालाच्या बदल्यात योग्य भाव देण्याची मागणी
– कृषी उत्पादनांवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लादू नये
– किसान सन्मान निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी
– जनुकीय सुधारित (GM) मोहरीला मान्यता देऊ नये
– देशाचे आयात-निर्यात धोरण जनतेच्या हिताचे असले पाहिजे.
– 15 वर्षांच्या धोरणातून शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर बाहेर ठेवण्याची मागणी
रॅलीसाठी शेतकऱ्यांनी विशेष तयारी केली आहे
या रॅलीसाठी भारतीय किसान संघातर्फे विशेष तयारी करण्यात आली होती. रॅलीमध्ये देशभरातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमणार आहेत.रॅलीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येक 10 गावांसाठी एक प्रमुख नेमण्यात आला असून, तो गावातील शेतकऱ्यांना रॅलीत आणण्याची व्यवस्था करेल.देशातील बहुतांश जिल्ह्यांतील शेतकरी बस, ट्रेन आणि खासगी व्यवस्थेने रामलीला मैदानावर येतील, असा विश्वास आहे. रविवारी रात्रीच अनेक शेतकरी राजधानीत आले होते. त्यांच्या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
किसान रॅलीला लक्षात घेऊन दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एक दिवस आधी एक अॅडव्हायजरी जारी केली होती. बाराखंबा रोड ते गुरू नानक चौक, मिंटो रोड ते कमला मार्केट गोलचक्कर, विवेकानंद मार्ग, जेएलएन मार्ग (दिल्ली गेट ते गुरु नानक चौक) रणजितसिंग फ्लायओव्हरवर वाहतूक प्रतिबंध किंवा मार्ग वळवता येऊ शकतो, असे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. महाराजा रणजित सिंह मार्ग, मिंटो रोड, अजमेरी गेट, चमन लाल मार्ग, दिल्ली गेट, जेएलएन मार्ग, कमला मार्केट गोलचक्कर ते हमदर्द चौक, भवभूती मार्ग आणि पहाडगंज चौक टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.नवी दिल्ली रेल्वे स्थानक, जुनी दिल्ली रेल्वे स्थानक, निजामुद्दीन रेल्वे स्थानक आणि ISBT कडे जाणार्या प्रवाशांना मार्गात संभाव्य विलंब लक्षात घेता वेळे अगोदरच निघण्यास सांगितले आहे. यासोबतच शक्य असल्यास तुमच्या वाहनाऐवजी सार्वजनिक वाहतूक विशेषत: मेट्रोचा वापर करा, असे म्हटले आहे.
भाजप विरोधात आरएसएस चा किसान मोर्चा याचा अर्थ काय?
आरएसएस ही संघटना भाजपची जन्मदात्री संघटना आहे.आरएसएस आणि भाजप वेगळे करून पाहता येत नाही.आरएसएस वर अनेकदा सरकारमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप झाला आहे.याशिवाय भाजपचे सर्व नेते आरएसएस च्या कार्यक्रमात गणवेशसाहित असतात. इतकेच नाहीतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह सारखे भाजपचे मोठे नेतेही आरएसएस च्या कार्यक्रम बैठकीत उपस्थित दिसून येतात.मात्र आताचा हा मोर्चा भाजप अन अनुषंगाने सरकारवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशाने काढला आहे का? गेल्या आठ वर्षात भाजप सरकारने केलेले दावे वादे हे सत्ता भोगताना फेल गेले आहेत हेच यातून सुचवायचे आहे का? असे प्रश्न लोकाना पडले आहेत.
मनोज गरबडे,शाई फेक ते जामीन,कोर्टात काय झालं? प्रत्येक घडामोड
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फासणारे मनोज गरबडे आहेत तरी कोण?
शाई फेक अन मारहाण नेत्यांना कधी कधी झाली ? जाणून घ्या.
Video:न्यायमूर्ती जितेंद्र मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील एक खुलासा
man of hole आणखी एक आदिवासी समाज जगातून पूर्णपणे मिटवला गेला
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 19,2022, 08:40 AM
WebTitle – RSS against BJP, Kisan Morcha movement in Delhi