मुबंई, दि.10 – मुंबईतील मुसळधार पावसात मालाड मधील एका रहिवासी इमारतीचा भाग कोसळला आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी आहेत. (mumbai malwani building collapse) जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. (mayor kishori pednekar slams bjp over Malad Building Collapse incidents)

मालाड मधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एक दुमजली घर अचानक नजीकच्या दुमजली रहिवासी इमारत वर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत ७ जणं गंभीर जखमी आहेत. तसंच, अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून बचावकार्य अजूनही सुरु आहे.

मुंबईतील मुसळधार पावसामुळं ही दुर्घटना घडली आहे.
अग्निशमन दल व पोलिसांचे सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम चालु आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
मंगळवारी निर्णय घेणार
आपल्याला या कोविड-19 मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी अनधिकृत कामे झाली. त्याचे फायदे घेणाऱ्यांनी घेतले आहेत.
त्याच्याबद्दल मागच्यावेळी मिटिंग झाल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांकडेही या अनधिकृत बांधकामांविषयी मिटिंग झाली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूखंडावर आणि बीपीटीच्या भूखंडावरही अनधिकृत बांधकाम झालं आहे.महापालिकेच्या भूखंडावरही अतिक्रमण झालं आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी आढावा घेऊन त्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
मतभेद हा लोकशाही व्यवस्थेचा एक भाग आहे
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)