आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी आपल्या भारत देशाला सम्यक संविधान अर्पण केले आणि २६ जानेवारी १९५० पासून, पुर्वीची सर्व व्यवस्था संपुष्टात येऊन भारतात संविधानिक प्रजासत्ताक कार्यप्रणाली अस्तित्वात आली. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता अन् राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मानपुर्वक मुलभूत अधिकार दिला. भारतीय नागरिकांना समान हक्क अन् अधिकार मिळाले आहेत त्याचा विसर पडला तर तो कृतघ्नपणा ठरेल. काही मंडळींना तर, काही तरी अडचण निर्माण झाल्यावरचं संविधान अन् लोकशाहीची आवर्जून आठवण येते.
काही राजकीय संघटनांना, समाज घटकांना नेहमीचं लोकशाही अन् संविधानाबद्दल तिटकारा, कृतघ्नपणा
देशभर प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. जगातील सर्वात मोठी आदर्श लोकशाही म्हणून भारतीय लोकशाहीला जगात ओळख आहे. भारतात अनेक जाती, धर्म, रुढी, परंपरा, पंथ, वर्ण व्यवस्था, विषमता अशी विभिन्न परिस्थिती असतांना देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता अन् न्याय या संविधानिक तत्वांवर देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचे महान, अनमोल कार्य केले म्हणून आपला भारत देश अखंड, सार्वभौमत्व आहे. बाबासाहेबांनी घटनेत सर्वचं समाजातील घटकांसाठी ठोस तरतूद करुन ठेवली. या युगपुरुषांने अस्पृश्यांनाचं नव्हे तर, स्पृश्यांनाही पुनीत केले. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीयांवर केलेल्या अनंत उपकारामुळेच, भारतीय संविधानाला जगात वेगळा आयाम मिळाला आहे यासाठी आपण कृतज्ञ असायला पाहिजे होत. पण, त्याची जाणीव न ठेवता आजही काही राजकीय संघटनांना, समाज घटकांना नेहमीचं लोकशाही अन् संविधानाबद्दल तिटकारा, कृतघ्नपणा असल्याचे दिसून येत आहे.
देशाला जाती, धर्माची नाही तर, संविधानानिष्ठ, राष्ट्रप्रेमी भारतीयांची नितांत गरज
७४ वर्षानंतरही आज आपल्या देशासमोर अनेक आवाहने, अनेक प्रश्न आहेत. त्या आवाहनांचा, प्रश्नांचा सामना करतांना बहुमताच्या जोरावर, कायद्याच्या घालमेळी करुन किंवा वटहुकूम काढून संसदीय लोकशाहीला एकाधिकारशाहीचे स्वरुप येईल अशी कृती, गळचेपी होता कामा नये. दांडगाई आणि दडपशाहीने, ज्या तत्वांवर लोकशाही टिकून आहे ती स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मुलतत्वे पायदळी तुडवली जाणार नाहीत, देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होणार नाही याचीही दक्षता घेतली पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून देशाचे राखलेले अखंडत्व अबाधित राखणे हे प्रत्येक भारतीयाचे, राजकीय पक्षांचे अन् सत्ताधार्यांचेही आद्य कर्तव्य आहे. राजकारणात धर्म हा तर कळीचा, भावनेचा अन् प्रतिष्ठेचा मुद्दा होऊन बसला आहे. आज आपल्या भारत देशाला जाती, धर्माची नाही तर, संविधानानिष्ठ, राष्ट्रप्रेमी भारतीयांची नितांत गरज आहे. त्यामुळे प्रत्येकांने आपला जात, धर्म घरात ठेवून, बाहेर भारतीयचं म्हणून जगल पाहिजे, कार्यरत राहिल पाहिजे. बाबासाहेबांनी प्रस्थापित केलेली मानवी मुल्ये आत्मसात केली तर, भारतीय म्हणूनचं सामाजिक सलोखा निर्माण होऊन, कोण्या राजकारण्याला अन् पक्षांना जाती, धर्माच्या आधारे सोयीचं राजकारणही करता येणार नाही.
१९५० पासून आपल्या देशात संविधानिक प्रजासत्ताक कार्यप्रणाली अस्तित्वात असून,
गेली ७४ वर्षे संविधानाच्या माध्यमातून आपण विकासाकडे अन् जागतिक स्पर्धेत दमदार वाटचाल करीत आहोत.
म्हणूनच, प्रत्येक भारतीयांने २६ जानेवारी हा दिवस सुट्टी म्हणून एन्जॅाय न करता
किंवा त्या दिवशी इतर असंविधानिक कार्यक्रम साजरे न करता,
त्याच्या प्रती कृतज्ञता बाळगून २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन अभिमानाने राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला पाहिजे,
संविधानाचा सन्मानपुर्वक गौरव केला पाहिजे. आपण संसदीय लोकशाही कार्यप्रणालीत
संविधानाची मुल्ये रुजवली तरचं भारतात एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही टिकून राहील
अन् भारत प्रजासत्ताक बनेल. कारण, संसदीय लोकशाही राज्य प्रणाली हीच सर्वोत्तम राज्य प्रणाली आहे.
प्रजासत्ताक दिन अन लोकशाही
संविधानाच्या प्रास्ताविकेत न्याय, व्यक्ती, स्वातंत्र्य, समानता, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, बंधुता या मानवी मुल्यांचा घटनाकारांनी उल्लेख, पुरस्कार केला आहे. ही घटना आम्ही स्विकारली, ही किती अभिमानास्पद बाब आहे. म्हणून, फक्त गरजेपुरते अन् सोयीच्या राजकारणासाठी संविधानावर स्तुतीसुमनांची उधळण न करता, नतमस्तक होण्याचा दिखाऊपणा न करता, संविधानाची प्रामाणिक अन् काटेकोरपणे कशी अंमलबजावणी होईल यासाठी प्रयत्नशील, जागृत राहून त्याला लोकाभिमुख केल तरच, लोकशाही प्रजासत्ताक प्रणाली चिरकाल जीवंत राहिल. कारण जाती, धर्म, प्रांतापेक्षा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय तसेच देशाची एकात्मता, अखंडता, धर्मनिरपेक्षता संविधानात सामावलेली आहे.
आम्ही भारताचे लोक हीचं आपली ओळख अन् राष्ट्रीयत्व निर्माण झाले पाहिजे. देशातील सामाजिक सलोखा, देशाची एकता, एकात्मता जोपासली जाऊन, धर्मनिरपेक्ष ही जागतिक ओळख जपली गेली पाहिजे. जाती, धर्माच्या नावाखाली देशात जी विचारधारा निर्माण होत आहे ती भविष्यात देशाला घातक आहे. संविधानाला धक्का लागला तर, घटनाकारांनी महत् प्रयासाने उभारलेला लोकशाहीचा हा डोलारा उध्वस्त व्हायला, राष्ट्रीय एकात्मता धोक्यात यायला वेळ लागणार नाही. म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला एक सम्यक संविधान देऊन, प्रजासत्ताक भारताच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला आहे त्याचं अखंडत्व आपण प्रामाणिकपणे जपलं पाहिजे.
download bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?
जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25,2023 21:10 PM
WebTitle – Republic Day is the national festival of unbroken India democracy