अर्थसंकल्प देशाचा असो की राज्याचा.अर्थसंकल्पात अनुसूचित जाती अन अनुसूचित जमाती साठी निधी ची तरतूद केली जाते,मात्र हा निधी योग्यप्रकारे खर्च केलाच जात नाही,काहीवेळेस तर तो इतर खात्यात इतर योजनांसाठी वापरला जातो,मात्र ज्यांच्यासाठी तरतूद केलीय,त्या अनुसूचित जाती अन अनुसूचित जमाती च्या उत्थानासाठी प्रगतीसाठी हा निधी खर्चच केला जात नाही,याबद्दल सातत्याने ओरड ऐकायला मिळते.या पार्श्वभूमीवर २०२२-२०२३ च्या राज्याच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती जमाती साठी २५ हजार कोटींच्या निधी ची तरतूद केलेली असताना वर्षभरात त्यातील ५०% रक्कम खर्चच केली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
यासोबतच अनुसूचित जाती जमाती च्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विविध शैक्षणिक योजनांवर खर्च केल्या जाणाऱ्या निधी ची देखील कपात करण्यात आल्याचे समजते.
आपल्या राज्यात अनुसूचित जाती जमाती मधिल घटकांसाठी त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी २३० प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
यामध्ये १५४ राज्यशासनाकडून तर ७६ योजनांना केंद्राकडून अर्थसहाय्य देण्यात येते.राज्य व जिल्हा स्तरावर या योजना राबविल्या जातात.
लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार सन २०२०-२०२१ मध्ये अनुसूचित जाती साठी ९६६८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती,या निधी पैकी केवळ ६ हजार ४६१ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला.पुढीलवर्षी म्हणजे सन २०२१-२०२२ मध्ये १० हजार ६३५ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला.व ८ हजार ८२८ कोटी ४९ लाख रुपये इतका खर्च करण्यात आला.
२०२२-२०२३ या चालू वर्षात १२ हजार २३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मात्र १५ फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत
केवळ ४ हजार ५८१ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आलीय,म्हणजे ही आकडेवारी ५०% हूनही कमी आहे.
छत्रपती शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना
अनुसूचित जाती जमाती मधिल घटकांसाठी विविध शैक्षणिक योजना राबविल्या जातात.
यामध्ये देशांतर्गत तसेच परदेशातील उच्चविद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.
छत्रपती शाहूमहाराज शिष्यवृत्ती असं या योजनेचे नाव आहे.
या छत्रपती शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजनेच्या अंतर्गत २०२१-२०२२ या वर्षासाठी देशभरातून केवळ १४५ विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देण्यात आली व त्यासाठी केवळ ३ कोटी रुपये इतका खर्च आला.२०२२-२०२३ या वर्षात तर विद्यार्थ्यांच्या संख्येत आणखी घट पाहायला मिळाली.या वर्षात केवळ ७० विद्यार्थ्यांना छत्रपती शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजने अंतर्गत शिष्यवृत्ती देण्यात आली.त्यावर केवळ ९८ लाख रुपये खर्च आला.
अनुसूचित जाती जमाती च्या घटकांसाठी लढणारे राजकीय नेते तसेच विविध सामाजिक संघटना झोपलेल्या असून अनुसूचित जाती जमातीचा समाज देखील झोपला असल्याचे दिसून येत आहे.आपल्या हक्काच्या निधीवर कुणीही बोलायला तयार नाही.असं एकूण चित्र आहे. मग निधी न वापरणे इतरत्र वळविणे या गोष्टी तर स्वाभाविकपणे होणारच,दोष कुणाला द्यायचा हाही प्रश्न आहे.
फक्त वामनदादांच्या गीतातील काही ओळी आठवणे अन समाधान करून घेणे एवढेच आपल्या हाती,अर्थात प्रश्न जर भावनिक असता,तर मात्र जनता पेटून उठली असतील. लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम मात्र जागल्याभारत चोखपणे करत राहील.
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठं हाय हो
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले; पतीला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 09,2023 11:58 AM
WebTitle – Reluctance to spend funds of Scheduled Castes and Tribes? Budget 2023