अहमदनगर : मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.राज ठाकरेंच्या ताफ्यात मागे असणाऱ्या तीन गाड्या एकमेकांची धडक लागून त्यांचे नुकसान झाल्याची माहिती समजतेय. या अपघातात अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनटचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदनगर पासून काही अंतरावरील घोडेगाव जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.
औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा होणार आहे.यासाठी ते आज पुण्यातून औरंगाबादसाठी 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन निघाले होते.अशी माहिती मिळत आहे. दरम्यान या अपघात झाल्याच्या घटनेत अद्याप कुणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.
राज ठाकरे यांच्या मशिदिवरील भोंग्याच्या मुद्यावरील व्यक्तव्याने महाराष्ट्रातील वातावरण तणावात आहे.त्यामुळे औरंगाबाद येथे सभा होऊ नये यासाठी काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती,याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने याचिकाकर्त्यानाच दंड ठोठावला होता.तसेच या सभे संबंधी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा विरोध करण्याची भूमिका घेतली होती.
महाराष्ट्रातील तणावाचे वातावरण लक्षात घेता पोलिस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत.
सभेत सहभागी होणाऱ्यांनी असभ्य वर्तन न करता स्वयंशिस्त पाळावी.
सभेमध्ये शस्त्र, तलवारी, स्फोटकं बाळगू नयेत.
वंश, जात, धर्म, भाषा, प्रदेशावरून चिथावणी देणारं वक्तव्य करू नये.
सभेदरम्यान चेंगराचेंगरी वा गोंधळासारखे प्रकार घडल्यास आयोजक जबाबदार असतील.
सुव्यवस्था राखण्यासाठी मजबूत बॅरिकेट्स उभारावेत
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
इतर वाचनीय लेख/अपडेट्स सुद्धा पहा
फेसबुकने डिलिट केलेली हिटलर वरील पोस्ट वाचा अन विचार करा
पायरेटस् ऑफ कॅरेबीयन कॅप्टन जॅक स्पॅरो पत्नीचा मार खाऊनही…
संभाजी भिडे सायकल वरून पडल्याने गंभीर जखमी; उपचार सुरू
पुण्यात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन; अंगावर आलात तर..-रूपाली पाटील
First Published by Team Jaaglya Bharat on APR 30, 2022 17:45 PM
WebTitle – Raj Thackeray’s convoy accident collided with each other