मुंबई – मराठी तरुणांच्या नोकऱ्या रोजगार परप्रांतीय विशेषत: युपी,बिहारचे (भय्या) उमेदवार लोक पळवून नेतात या मुद्याला हात घालून राज्यात रान उठवत जन्माला आलेली मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आता चक्क याच परप्रांतीय (भय्या) उत्तर भारतीयांना लोकाना मतांसाठी साद घालताना दिसत असून यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मनसे सैनिकांनी अनेक उत्तर भारतीयांना चोप दिला होता.रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेले हिन्दी भाषिक उमेदवार आणि अनेक हातावर पोट असणारे अशा उत्तरभारतीय लोकांना मनसेने चोप दिला होता.शिवसेनेचा इतिहास पाहिला तर त्यातही काही फरक दिसणार नाही,मराठी माणूस आणि मराठी माणसांच्या रोजगार नोकऱ्यांचा प्रश्न या अजेंड्यावर सेनेनेही सुरुवातीला रान पेटवले होते.त्यानंतर हिंदुत्वाचा मुद्दा स्वीकारत शिवसेनेने हिंदी भाषिकांनाही जवळ केले.
अलिकडे मनसेने सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा घेत याच मार्गाने जाण्याचे ठरवले आहे असे दिसते.मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा पुढे केल्याने आता अनेकांच्या मनात आश्चर्ययुक्त संभ्रम निर्माण झाला आहे.मराठीचा आग्रह धरणाऱ्या शिवसेना आणि मनसेच्या अशा भूमिकांबद्दल अनेकजण नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहेत.
या अगोदर गुजराती भाषेतील पोस्टर वरुन प्रतीक कातकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. “मराठीसाठी उत्तम काम करणारा पक्ष म्हणून सकाळीच सदस्य नोंदणी केली आणि आता हे समोर आलं” असं कॅप्शन देत त्यांनी शहरात लागलेल्या बॅनरचे फोटो शेअर केले आहेत.
मनसेच्या बॅनर्सवर काय लिहले आहे?
जय श्री राम …हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में,
महाराष्ट्र की उन्नति और हिंदुत्व की बुलंद आवाज…हर हिन्दू की लड़ाई लड़ने वाले योद्धा आपन हिन्दू जननायक श्री राजसाहेब ठाकरे के साथ पूरी ताकत के साथ जुडेके बा, हमहू ई अभियान से जुडल बा, आप लोगन से बिनती करात बा, आप लोग भी ई मंगल अभियान से जुड़ जाई, और पूरे महाराष्ट्र के भगवा रंग में बदल देइ…..
अशा प्रकारे आता भोजपुरी,हिंदी भाषिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेने कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.
हा महाराष्ट्र आहे, गुजरात नाही, गुजराती पोस्टवरून शिवसेनेविरुद्ध आगपाखड
माजी आमदार आणि भाजपचे नेते हेमेंद्र मेहता यांनी काही दिवसांपूर्वी भाजपला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेहता यांनी शिवबंधन बांधलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
यानंतर मुंबईतील बोरिवलीत या पोस्टरवर गुजराती भाषेचा वापर केला गेला.यामुळे त्यावर मनसेने काही चिठ्या चिटकवण्यात आल्या. ‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ अशाप्रकारचे मजकूर लिहिण्यात आले होते. यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
घाटकोपर मध्ये मात्र मनसेचा वेगळाच सुर
घाटकोपर येथे अलिकडच्या काळात गुजराती टक्का वाढला असल्याने या भागात गुजराती बहुसंख्येने स्थायिक झाल्याचे दिसून येते,या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने गुजराती भाषेत मतदार नोंदणी चे आवाहन केले.त्यावर मात्र मनसेने आक्षेप घेतला असून, “मराठीचा कैवार घेण्याऱ्या शिवसेनेला सत्तेत आल्यावर मराठीचा विसर पडला.मतांसाठी ही शिवसेनेची कसली लाचारी आहे? राज्यात मराठी सक्तीचे असताना नगरसेवकांकडूनच मुंबईत गुजराती भाषेचा प्रचार होत असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे.” अशा शब्दात मनसेचे घाटकोपरचे उपविभाग अध्यक्ष नीलेश जंगम यांनी प्रतिक्रिया दिली असल्याचे समोर आले आहे.
एकूणच निवडणुकांच्या या धूराळ्यात,भाषिक अस्मितेच्या राजकारणात मराठी भाषिकांच्या डोळ्यात मात्र धूळफेक होतेय की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
पुरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात; शालेय वस्तूंचे वाटप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 27, 2021 17:00 PM
WebTitle – Raj Thackeray mns put bhojpuri banners in mumbai to attract north indians bmc election 2021