मुंबई: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतर च्या मुद्यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव विमानतळाला देण्याचा आग्रह धरला आहे या विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची कृती समितीची मागणी कायम आहे तर, राज्य सरकारच्या पातळीवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. (Raj Thackeray on Naming Navi Mumbai International Airport)
पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. नवी मुंबईतील विमानतळ नामांतर करताना दि. बा. पाटील यांचं नाव दिलं जावं यासाठी पाठिंबा देण्याची मागणी त्यांनी राज यांच्याकडं केली. ठाकूर यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज यांनी आपली भूमिका मांडली.
‘कोणतंही विमानतळ उभं राहताना शक्यतो शहराबाहेरची जागा निवडली जाते. तेव्हाच्या मुंबईच्या सीमेनुसार मुंबईतील विमानतळ सांताक्रूझला गेलं. कालांतरानं ते वाढत सहारपर्यंत गेलं. नंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी विभागणी होऊन स्थानिक ठिकाणांच्या नावानं ती विमानतळं ओळखली जाऊ लागली. आता नवी मुंबईत होणारं विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्स्टेन्शन आहे. माझ्या माहितीनुसार, मुंबईतील विमानतळ हे देशांतर्गत विमानसेवेसाठी असेल आणि नवी मुंबईतील नवं विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. त्यासाठीच शिवडी-न्हावा शेवा मार्ग होतोय. त्यामुळं त्याला शिवरायांचंच नाव राहील असं मला वाटतं,’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.
तशी मागणी केली जात आहे असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना राज ठाकरेंनी, “स्वत: बाळासाहेब असते तर
त्यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नावं द्या असं सांगितलं असतं,” असं मत व्यक्त केलं.
हे ही वाचा.. धुवांधार वॉटर फॉल : त्यांच्या जीवाची किंमत फक्त ५० रूपये
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on JUN 21 , 2021 14 : 42 PM
WebTitle – Raj Thackeray jumps into Navi Mumbai airport renaming controversy, suggests another name 2021-06-21