देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरूच असून रविवारची सकाळ रेल्वेसाठी अपघाताने सुरू झाली. बांकुरा येथील ओंडा रेल्वे स्थानकावर दोन मालगाड्यांच्या धडकेने मोठे नुकसान झाले आहे. यात मालगाडीचा चालक जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा भीषण रेल्वे अपघात पश्चिम बंगाल मध्ये घडला, जिथे रविवारी, 25 जून रोजी पहाटे 4 वाजता Railway accident West Bengal पश्चिम बंगालमधील ओंडाग्राम किंवा ओंडा रेल्वे स्थानकाजवळ दोन मालगाड्यांची टक्कर झाली.
एक मालगाडी मेन लाइनऐवजी लूप लाइनमध्ये घुसली आणि रुळावर उभ्या असलेल्या दुसऱ्या मालगाडीला धडकली. असे सांगितले जात आहे की एक मालगाडी आधीच रुळावर होती ज्यावर दुसरी ट्रेन जाण्याचा संकेत देण्यात आला, त्यामुळे मालगाडी मागून धडकली आणि सुमारे 6 डबे रुळावरून घसरले.याचा अर्थ रेल्वेचा ढिसाळ कारभार उघडा पडला आहे.काहीच दिवसांपूर्वी बालासोर येथे झालेला भीषण अपघात सुद्धा सिग्नल यंत्रणांचा घोळ हाच असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.
रशिया मध्ये सैन्याची बंडखोरी,सत्ता पालट? पुतिन च्या पाठीत खंजीर खुपसणारा वॅगनर ग्रुप काय आहे?
या अपघातानंतर खडगपूर-बांकुरा-आद्रा मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा अपघातही ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातासारखाच आहे. 2 जून रोजी झालेल्या बालासोर रेल्वे दुर्घटनेत तीन गाड्यांची टक्कर होऊन शेकडो लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे 1000 लोक जखमी झाले. आता पुन्हा तीच चूक बांकुरा येथे पाहायला मिळाली असून दोन मालगाड्यांना एकाच ट्रॅकवर जाण्याचे सिग्नल देण्यात आले आहेत.
नेमका कसा झाला अपघात?
पश्चिम बंगाल मधिल या रेल्वे अपघात नंतर मुख्य जनसंपर्क अधिकारी, दक्षिण पूर्व रेल्वे, यांनी माहिती दिली की, “ओंडग्राम स्टेशनवर रेल्वे मेंटेनन्स ट्रेन (BRN) शंटिंग सुरू होती. गुड्स ट्रेन (BCN) ने लाल सिग्नल ओव्हरशॉट केला आणि ती थांबली नाही आणि BRN देखभाल ट्रेनसह रुळावरून घसरली. सुमारे 4.05 वाजता सुमारे 8 वॅगन्स रुळावरून घसरल्या. जीर्णोद्धार सुरू आहे. UP मेल लाईन आणि अप लूप लाईन आधीच 7.45 वाजता पूर्ववत करण्यात आली आहे”:
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत एक चालक जखमी झाला आणि इंजिनसह रेल्वेच्या सहा बोगी रुळावरून घसरल्या आहेत.
मोदी अमेरिका दौरा दरम्यान या गोष्टी ज्या भारतीय मिडियाने तुम्हाला दाखवल्या नाहीत, दाबून टाकल्या
भगवान बुद्ध अस्थि दर्शन ,सुट्टी न दिल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी दिला राजीनामा
मोदी सरकार आल्यापासून महिलांची उंची वाढली: भाजप नेता
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 25 JUN 2023, 13:45 PM
WebTitle – Railway accident, two goods trains collided on the same track in West Bengal