चाकरमान्यांच्या एकजुटीचा यल्गार,
विनाशकारी बारसू रिफायनरी विरोधात जोरदार निदर्शने..
मुंबई ( प्रतिनिधी ) 29/4: राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी विरोधी तिव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत. भारतीय लोकसत्ताक संघटना, भीम आर्मी, कुणबी समाजोन्नती संघ, कुणबी युवा आदी संघटनांच्या माध्यमातून कोकणातील चाकरमान्यांनी दादर पुर्वेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्पा विरोधात काल जोरदार निदर्शने करण्यात आली. हा लढा कोणत्या जाती धर्माचा नसून, रिफायनरी विरोधी लढ्यात आम्ही कोकणवासीय एक आहोत, आम्ही भारतीय असून नाणार प्रमाणेच बारसू येथील प्रकल्प आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी ठाम निर्धार व्यक्त केला. यावेळी घोषणातून चाकरमान्यांची कोकणाविषयी असलेली आत्मियता, जिव्हाळा दिसून येत होता.
बारसू रिफायनरी विरोधात चाकरमान्यांची जोरदार निदर्शने
निदर्शकांची उपस्थिती, त्यानंतर आयोजित करण्यात आलेली बैठक व विविध सामाजिक संघटनांचा मिळत असलेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता,
विनाशकारी रिफायनरी विरोधी लढा अधिक व्यापक होणार असल्याचे दिसून येत असून,
१ मे महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकात अभिवादन करुन आझाद मैदानात त्याची व्याप्ती दिसून येईल.
मुंबईत चाकरमान्यांचे एकसंघ शक्तीचे दर्शन
कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू व परिसरातील गावांमध्ये जगातील सर्वात मोठी सहा कोटी टनांची रिफायनरी
आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात घाट घातला जात आहे.
त्या विरोधात स्थानिकांनी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी २८ एप्रिल २०२३ रोजी
मुंबईत दादर पुर्वेला एकवटलेल्या चाकरमान्यांनी आपल्या एकसंघ शक्तीचे दर्शन घडवून दिले.
रिफायनरी विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. स्थानिकांची दिशाभूल करुन रोजगाराच्या नावाखाली विनाशकारी प्रकल्पाव्दारे वैभवशाली निसर्ग संपन्न कोकणाचे वाळवंट न करता, निसर्गाचा ऱ्हास न करता रिफायनरी प्रकल्प कोकणातून हद्दपार करुन, त्या ऐवजी वेदांता फॉक्सकॉन, रेल्वे वर्कशॉप, स्वाफ्टवेअर इंडस्ट्री, आयटी अशा पर्यावरण पुरक प्रकल्पांची कोकणात निर्मिती करावी अशी सर्वांनी आग्रहाची मागणी केली.
सदर आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनात भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष अमोलकुमार बोधिराज, कुणबी महिला संघाच्या सचिव आणि भारतीय लोकसत्ताक संघटनेच्या उपाध्यक्षा दिपीका आंग्रे, कुणबी युवा संघाचे अध्यक्ष महादेव कांबळे, भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, जेष्ठ समाजसेवक सुमेध जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नाईक, अनिल कदम, वैभव मोहिते, मनिष जाधव, दिलीप शेडेकर, पिलाजी कांबळे, शोभा चिंचवलकर, किरण गमरे, गुणवंत कांबळे, रुपाली खळे, अंकिता मोरे. योगेश कांबळे, वैशाली कदम, मयुरेश जंगम, अमित खैरे, संदिप कांबळे, मनिष कदम, अभिषेक कासे यांच्यासह शेकडो कोकणवाशी चाकरमानी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान,मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना दोन वेळा पत्र लिहिले पण आम्हाला प्रतिसाद दिला नाही . आता ते म्हणतात तुमचे गैरसमज, शंका दूर करतो..हा attitude योग्य नाही..आमचे गैरसमज नाहीयेत..आम्हाला आमची भूमिका माहित आहे..आम्ही चर्चेला तयार आहोत असं या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले सत्यजित चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
कॅलिफोर्निया मध्ये जातीय भेदभाव विरोधी कायदा संमत
UK मध्ये आंबेडकर जयंती जल्लोष, हर्षोल्हासात साजरी
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 29,2023 10:20 AM
WebTitle – protests against Barsu Refinery in mumbai