लखनऊ : उत्तर प्रदेश च्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे.अद्याप निवडणूक कार्यक्रम तारखा जाहीर झालेल्या नसल्या तरी येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सर्व पक्षीय कार्यकर्ते कामाला लागले आहेत.प्रत्येक पक्षाचे प्रचारमंत्री कंबर कसून कामाला लागले आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत.नुकताच शेतकरी कायद्याच्या संदर्भाने ते कायदे मागे घेण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केला.अलिकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुर्वांचल एक्सप्रेसवेच्या लोकार्पण सोहळ्याला हजेरी लावून उद्घाटन केले होते.आता पुन्हा एकदा मोदी २२ नोव्हेंबर ला राजधानी लखनऊमध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या कार्यक्रमाची पूर्व तयारी पोलिसांनी प्रोटोकॉल प्रमाणे सुरु केली आहे. मात्र तयारीसंदर्भात पोलिसांनी जारी केलेलं एक पत्र सध्या फारच चर्चेत आहे. मोदींचा सुरक्षेचा भाग म्हणून पोलिसांनी या भागातील लोकांना १९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबरदरम्यान खिडकीत , बाल्कनीत कपडे वाळत घालू नका असे निर्देश दिल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जातंय.तर दुसरीकडे सोशल मिडियातून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नरेंद्र मोदी येत आहेत,बाहेर कपडे वाळत घालू नका
लखनऊ शहरात मोदींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय,कार्यक्रमाच्या भागात आसपासच्या परिसरात तसेच पोलिस मुख्यालयाच्या समोरच असणाऱ्य सरस्वती अपार्टमेंट नामक सोसायटीला गोमतीनगर पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी एक पत्र पाठवलं आहे. यामध्ये मोदींचा दौरा होईपर्यंत सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख केलाय. तसेच स्थानिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दलच्या सूचना देण्यात आल्यात. पण या सूचनांमध्ये एक सूचना कपडे वाळत घालण्याबद्दल आहे. बाहेर कपडे वाळत घालू नका, असं या पत्रात म्हटलंय.एवढेच नाही तर तुमच्या घरी कुणी नविन व्यक्ती येत असेल पाहुणा येत असेल तर त्याची माहिती पोलिसांना देण्यात यावी असे निर्देश या पत्रकात देण्यात आले आहेत.
सध्या हे पत्र सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. 714 हून अधिक जणांनी ते शेअर केलं असून 3700 हून अधिक जणांनी ते लाइक केलं आहे.
जय भीम चित्रपट:पोलिसांनी बॅग भरून लाच देण्याचा प्रयत्न केला न्या.चंद्रू
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
Jai bhim film Review – इरुलर जमातीचे भेदक चित्रण करणारा सिनेमा ‘ जयभीम ‘
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 20, 2021 12:18 PM
WebTitle – Prime Minister Narendra Modi is coming: Do not dry clothes in the window security advice by police