उत्तर प्रदेश : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath kovind) शुक्रवारी विशेष ट्रेनने कानपूरमध्ये दाखल झाले. त्यांच्यासाठी खास ट्रेन सोडण्यात आली होती.राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद पहिल्यांदाच आपल्या जन्मगावी परौंख येथे ट्रेनने पोहोचले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.
कानपूरमधील झीझक रुरा रेल्वे स्थानकावरही थांबून रामनाथ कोविंद यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी त्यांनी आपल्या पगाराचा उल्लेख करत आपल्यापेक्षा शिक्षक जास्त कमावत असल्याचं म्हटलं.यामुळे सोशल मिडियात उलट सुलट चर्चा सुरू झाली.
या बातमीखाली एक युजर पुष्पेंद्र कुमार यांनी म्हटलंय की “सर तुम्ही खोटं का बोलताय ..?
तुम्हाला करमुक्त वेतन तसेच इतर भत्ते प्राप्त आहेत“
जाणून घ्या राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना किती वेतन मिळते?
याबद्दल आम्ही अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला.असता अशी माहिती समोर आली की राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांचे वक्तव्य अर्धसत्य आहे.तसेच लोक म्हणत आहेत त्याप्रमाणे त्यांचे वेतन हे करमुक्त असते.कसे ते पाहा.
दीड लाखांवरून थेट पाच लाख पगार वाढला
राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च नागरिक असतो. या पदावर जी व्यक्ति असते तीला चांगल्या पगाराशिवाय अनेक भत्ते आणि सुविधा सुद्धा मिळत असतात. सध्या भारताचे १४ वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे आहेत. त्याना महिना तब्बल पाच लाख रुपये पगार मिळतो.
तसे, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की २०१७ पर्यंत भारताच्या राष्ट्रपतींना दरमहा १.५० अक्षरी दीड लाख रुपये पगार मिळत होता, जो देशातील उच्च पदस्थ अधिकारी आणि कॅबिनेट मंत्र्यांपेक्षा कमी होता.यामुळे राष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेसाठी हा पगार तब्बल २०० टक्क्यांनी वाढवण्यात आला.या सोबतच उपराष्ट्रपतींचा पगारही जो १.२५ लाख होता तो ३.५ लाख करण्यात आला.
म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांना महिना ५ लाख रुपये वेतन मिळत आहे.आता आपण पाहू राष्ट्रपती रामनाथ कोविन्द नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रपती रामनाथ कोविन्द म्हणाले त्यांना ५ लाख पगार मिळतो आणि त्यातून त्यांचे २.७५ पावणे तीन लाख रुपये महिना कर स्वरूपात भरावे लागतात.
याचं गणित मांडलं तर ५ लाखाला जर २.७५ लाख कर बसत असेल तर गणितानुसार ती टक्केवारी होते तब्बल ५५% टक्के परंतु आपल्या देशात सर्वात जास्त कर म्हणजे शेवटची मर्यादा ही केवळ ३०% एवढीच आहे.
भारतात आताच्या घडीला किती टॅक्स स्लॅब आहे इथे जाणून घ्या. ICICI TAX SLAB
याचा अर्थ असा होतो की राष्ट्रपतींनी केलेलं विधान हे अर्धसत्य आहे.आता तुम्ही म्हणाल हे सपशेल चुकीचंच विधान आहे मग अर्धसत्य कसं काय म्हणताय?
तर, यात एक मुद्दा असा आहे की कोरोना साथीच्या विरूद्ध लढा म्हणून योगदान म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या वर्षी स्वेच्छेने आपल्या पगारामधून ३० टक्के कपात करून सरकारला पाठिंबा दर्शविला.ही कपात आजही सुरू आहे का याबद्दल माहिती नाही. परंतु या मुद्यावरून त्यांचा पगार ३०% कापला जात आहे असे म्हणता येते.आणि म्हणून आम्ही त्यांच्या विधानाला अर्धसत्य म्हणतो कारण सत्य हे की आता पगार तीस टक्के कापला जातोय,असत्य हे की तो ५५% टक्के इतका कापला जात नाही जसा त्यांनी दावा केला. आणि आणखी एक असत्य असं की मुळात राष्ट्रपतींचा पगार हा करमुक्त श्रेणीत आहे. त्यामुळे त्यावर कर बसतच नाही.हा कर त्यांनी वर म्हणल्याप्रमाणे स्वेच्छेने स्वीकारला.
आता पाहू भारताच्या राष्ट्रपतींना कोणकोणत्या सुविधा आणि इतर भत्ते मिळतात ?
-
पाच लाख करमुक्त पगाराव्यतिरिक्त
-
विना मूल्य निवास
-
विना मूल्य वैद्यकीय उपचार सुविधा
-
मोफत फोन सुविधा
-
मोफत प्रवास सुविधा,
-
विनामूल्य पेट्रोल (आजीवन) समाविष्ट आहे.
-
याशिवाय इतर खर्च, निवास, कर्मचारी, नोकर चाकर,पाहुणे व पाहुण्यांच्या आगतस्वागतच्या खर्चा पोटी भारत सरकार दरवर्षी सुमारे २.२५ कोटी रुपये खर्च करत आहे.
-
याशिवाय राष्ट्रपतींच्या पत्नीला सहाय्यक सचिव म्हणून ३० हजार रुपये पगार दिला जातो
निवृत्ती नंतर
1. दरमहा दीड लाख रुपये पेन्शन
2. राष्ट्रपतींच्या पत्नीला सहाय्यक सचिव म्हणून ३० हजार रुपये पगार
3.एक फर्निश्ड रेंट फ्री बंगला
4. कर्मचारी,नोकर चाकर यासाठी दरवर्षी ६०००० हजार रुपये
5. रेल्वे अथवा विमान सेवा फ्री,शिवाय एक व्यक्ती सोबत नेण्याची सुविधा
या सर्व भत्ते आणि सुविधा पाहता राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी आपले वेतन कर लागून कपात होते हा उल्लेख करण्याची खरच गरज होती का? असा इथे प्रश्न निर्माण होतो.
राष्ट्रपती पदासाठीची पात्रता –
भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार
-
ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
-
त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.
-
त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
-
ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
-
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.
राष्ट्रपतींची निवडणूक
-
राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
-
राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.
राष्ट्रपतींचा कार्यकाल
-
भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
-
टीम जागल्याभारत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUN 27, 2021 23: 00 PM
WebTitle – President Ramnath kovind: President False statements about taxes. know how much president’s salary allowances, taxes, and eye-catching facilities 2021-06-27