मुंबई : आज 26 नोव्हेंबर भारत या स्वतंत्र देशाने त्याचं अधिकृत लिखित संविधान स्विकारले तो दिवस,भारतीय संविधान हे तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. त्याचं रक्षण प्रत्येक नागरिकाने प्राणपणाने केलं पाहिजे.संविधान दिनाच्या या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी पार्क दादर येथे संविधान सन्मान सभा आयोजित करण्यात आली होती.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी संविधान बदलण्याच्या षडयंत्राच्या संदर्भात जी चर्चा सुरू करण्यात आली त्यावर भाष्य केले,यासोबतच त्यांनी विविध विषयांवर आपले परखड मत मांडले.तसेच मराठा आरक्षण संदर्भातही महत्वाच्या सूचना केल्या,यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी कंबर कसून राज्यात विविध ठिकाणी दौरे करत असलेल्या आणि मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना गर्भित सल्ला दिला,
यामुळे पुन्हा एकदा ॲड.प्रकाश आंबेडकर यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भातील समर्थनीय भूमिका स्पष्ट झालीच,
पण मराठा समाजाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना देखील योग्य तो सल्ला देत योग्य मार्गावर चालण्याचे दिशादर्शक मतही मांडले,
यावर मनोज जरांगे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.
(Prakash Ambedkar gives suggestion to Manoj Jarange at Shivaji Park in Samvidhan Sanman Sabha)
काय होता तो गर्भित सल्ला
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी संविधान सन्मान सभेत बोलताना एका जुन्या मुद्याचे उदाहरण दिले.यावेळी ते म्हणाले की,गुजरातच्या दंगलीनंतर लागलेल्या निवडणुकांच्या प्रचार सभेत शेक्सपिअरचं एक नाटक “द मर्चंट ऑफ व्हेनिस” या नाटकात, “पाऊंड ऑफ फ्लेश” ‘A Pound of Flesh‘ हा वाक्प्रचार रूपक रीतीने वापरला गेला आहे ज्याचा उल्लेख शायलॉकच्या कर्जाची परतफेड करण्याच्या मागणीच्या कठोर, अक्षम्य स्वभावाशी जोडला गेला आहे.
ॲड.प्रकाश आंबेडकर याचं अधिक स्पष्टीकरण देताना म्हणाले की,या वाक्याच्या काँग्रेसच्या सल्लागारांनी ‘मौत का सौदागार” अशा चुकीच्या पद्धतीने हिंदी अनुवाद करत सोनिया गांधींना गुजरातच्या निवडणुकांच्या प्रचारात वापर करण्यास सांगण्यात आले,आणि हीच गोष्ट बॅक फायर झाली.आणि गुजारत मध्ये 117 जागा जिंकत पुन्हा भाजपचे सरकार आले होते.जिथे खरतर काँग्रेससाठी वातावरण अनुकूल होते.
हाच मुद्दा अधोरेखित करत ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांना गर्भित इशारा देत म्हटले की, “जरांगे पाटील यांना माझा सल्ला आहे की,सोनिया गांधी यांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका,सल्लागारांचे बिलकुल ऐकू नका.या देशात कुणी घोडा गाढव नाही तर या देशात माणसं राहतात आणि आपण प्रत्येकाला माणूस म्हणून बघितलं पाहिजे.”अशी सूचना केली.
यामागचा अर्थ असा की आरक्षण मिळवायचे असेल तर प्रत्येकाचा आदर केला पाहिजे अशा चुका केल्या तर
मिळणारे आरक्षण देखील मिळणार नाही.ते बॅकफायर होईल.जसे सोनिया गांधींच्या सोबत घडले.
मनोज जरांगे पाटील म्हणाले.. सल्ला मान्य..
सदर गर्भित सल्ला गांभीर्याने घेत मनोज जरांगे पाटील यांनी ॲड.प्रकाश आंबेडकरांचा सल्ला मान्य असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
आरएसएस ओबीसींचं कधीच भलं करणार नाही
आंबेडकर म्हणाले, “मंडल आयोगानं दिलेल्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढत होतो त्यावेळी काही ओबीसी मंडळी सोबत होती पण त्याला आरएसएसनं विरोध केला होता. आरएसएस कधीच ओबीसींचं भलं करणार नाही. तसेच जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत रयतच्या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, एवढंच मी जरांगे पाटील यांना सांगतो”
ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे मनोज जरांगे यांना पत्र!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 26,2023 | 12:20 PM
WebTitle – Prakash Ambedkar gives suggestion to Manoj Jarange