नाशिक : राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्चपद असणाऱ्या ठिकाणी नुकत्याच एक आदिवासी महिला विराजमान झाल्या असताना आणि पाठोपाठ आदिवासींच्या प्रगतीचे ढोल वाजवले जात असतानाच गावपातळीवर मात्र अद्यापही बुरसटलेल्या, खुळ्या विचारांचा पगडा सुटलेला नसल्याचे देवगाव (ता. त्र्यंबकेश्वर) आश्रमशाळेतील निंदनीय प्रकाराने समोर आले आहे. देवगाव आश्रमशाळेतील १२ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षकाने ‘तुला मासिक पाळी असल्याने, तू वृक्षारोपण करू नको’ असे म्हणत इतर मुलींसमोर अपमानित केले. तसेच, वृक्षारोपणापासूनही रोखले. संबंधित विद्यार्थिनीने मंगळवारी नाशिक येथे आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांची भेट घेत घडला प्रकार कथन केला. या मुलीच्या तक्रारीची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून, संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास भवन संचलित शासकीय कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवगाव येथील महाराष्ट्रभर गाजलेल्या मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनीला वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध करणाऱ्या प्रकरणाची महाराष्ट्र अंनिसने गांभीर्याने दखल घेतली. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली.सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थिनींच्या मनातील अंधश्रद्धा जाणून घेतल्या. चमत्कार सादरीकरण करून,त्यामागील सत्यशोधन केले.
विद्यार्थिनीं कडूनही चमत्कार प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून घेतले.पीडित विद्यार्थिनीला सन्मानाने विचार मंचावर बसवले.
तिच्या हस्ते चमत्कार प्रात्यक्षिक करून घेतले.
मासिक पाळी संदर्भात वयात येणाऱ्या विद्यार्थिनींच्या शरीरात नेमके काय बदल होतात,
याचे पाळी विज्ञान कार्यकर्त्यांनी सर्व विद्यार्थ्यांनींना समजावून सांगितले.
त्यामुळे विद्यार्थिनींच्या मनातील मासिक पाळी संदर्भातील समज व गैरसमज, अंधश्रद्धा, भीती दूर होण्यास मोठी मदत झाली.
त्याचबरोबर शिक्षकांनाही एकत्र करून त्यांचे प्रबोधन कार्यकर्त्यांनी केले.
मासिक पाळी आली म्हणून ज्या विद्यार्थिनीला अपवित्र, अशुद्ध मानून, वृक्षारोपण करण्यास प्रतिबंध केला होता,
त्याच विद्यार्थिनीच्या हस्ते कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून घेतले.
यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक ,शासकीय अधिकारी, विद्यार्थीनी उपस्थित होते.
त्यावेळी पीडित विद्यार्थीनीने मनोगतात सांगितले की,
मी स्वतः आता मासिक पाळी किंवा तत्सम अंधश्रद्धांना बळी पडणार नाही
आणि इतर माझ्या मैत्रिणी व विरोध करणाऱ्यांना यापुढे अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका, असे सांगेन.
या मोहिमेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे,कृष्णा चांदगुडे,
महेंद्र दातरंगे ,कोमल वर्दे,संजय हरळे ,दिलीप काळे हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
निवडणुकीपूर्वी ‘रेवडी संस्कृती’ ‘मोफत योजना वर ‘ सर्वोच्च न्यायालय कठोर
आम्ही सावरकरांची अवलाद नाही,जेल जाण्यास घाबरत नाही-केजरीवाल
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 27 2022, 19:25 PM
WebTitle – Plantation of trees by Annis by the victimized student in menstruation case