पावसाळा सुरू झाला की सगळीकडे निसर्गाची हिरवाईची मुक्त उधळण सुरू होते.कुठे पांढरेशुभ्र धबधबे लक्ष वेधून घेत असतात.अशावेळी आपणही निसर्गाच्या सानिध्यात जावं,यासाठी प्रत्येकाचं मन उत्साही असतं,तरुण म्हणल्यावर आधीच उल्हास त्यात ‘श्रावण’ मास हे ठरलेलंच,त्यामुळे तरुणाई बाइक कार अन मिळेल त्या वाहनाने निसर्गाच्या भेटीला जात असते.असाच ग्रुप टीम भटकंती नावानेच राज्यातील विविध ठिकाणी भेटी देत असतो गड किल्ले बुद्ध कालिन लेण्या डोंगर जंगल सगळीकडे भटकंती करत असताना या तरुणांना कुठेतरी सामाजिक भान जपण्याची देखील जाणीव आहे.अशातच त्यांनी निर्णय घेत हा वृक्षारोपणाचा निर्णय अंमलात देखील आणला.जाणून घेऊया त्यांच्याच शब्दांत..
तरुणाई जपतेय सामाजिक भान
दर महिन्यात किमान एक तरी राईड- ट्रेक आपली ठरलेली असते. मात्र यंदा सगळेच जण बीझी असल्याने जुन जुलै मधे राईड झाल्या नाहीत.
म्हणुन, नको देवराया अंत आता पाहू, लवकर काढू राईड आता ..!
असा सर्वांचा एकसुर झाला आणि संडे फिक्स करून सगळ प्लॅनिंग केलं ..
नेहमी पेक्षा ही राईड वेगळी करण्याच्या उद्देशानं, एक कल्पना ग्रुप समोर ठेवली. सर्वांना ती पटली, लगेच सर्वांनी होकार कळवला ..
आणि पुढे त्या दिशेनं हालचाली सुरू झाल्या. फक्त या कामासाठी आमचा एक सहकारी मित्र सुधीर औरंगाबाद वरून एका दिवसात तडकाफडकी मुंबईला आला.
तर अवघ्या तीन दिवसात आंबा, पिंपळ, वड, अशोक, जांभूळ, फणस, कडूलिंब.. अशा ११० रोपांची जुळवणी झाली.
फावडं, कुदळ ..अशी सर्व तयारी झाली.
Avinash Narvankar कडे ८० रोपं होती तर माझ्याकडे २० होती. आणि इतरांनी चार दोन अशी १० रोपं सोबत घेतली होती.
महापेला सर्वजण एकत्र भेटल्यावर प्रत्येकाच्या गाडीवर थोडी-थोडी रोपं वाटून घेण्यात आली,
आणि या सिजनच्या पहिल्या राईडची सुरवात झाली.
आम्ही झाडांची रोपं घेवून आलो आहोत हे समजल्यावर तिकडचे फॅारेस्ट ॲाफिसर श्री घोलप साहेब आम्हाला भेटले.
आमची विचारपुस केली आणि सहभागी झाले.
घोलप सरांच्या हातूनच प्रथम पिंपळाच रोपं लावून या वृक्षापोपणाची सुरवात केली. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली, माहितीच्या ठिकाणी या ११० झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं ..
या कामात घोलप सरांसोबतच, फॅारेस्ट ॲाफिसर क्षीरसागर मॅडम आणि बेंबले सर यांच सहकार्य लाभलं.
हि झाडं जपली जातील. आमचं लक्ष असतचं, तुम्ही सुद्धा आधुन मधून भेट देऊ शकता,असं त्यांनी आम्हाला सांगितलं.
पोरांनी, .. पार, कुदळ, फावडं हाती घेवून पटापट खड्डे घेतले. Sudhir Bhalerao, गोटू दादा,Shekhar Nikam Sachin Kamble,Sanket Emptiness Mahesh Dreamcatcher,Mansukh Pawar, Amit Anil Sawant हे पुर्ण घामाने भिजले तर Amol Ujawala Ashok Kirtikar च्या हाताला फोड आला होता.. प्रत्येक जण नसांगता पळत होते. यात मुली सुद्धा अगदी खांद्याला खांदा लावून झटून काम करत होत्या. सगळेच न थकता, अगदी उउत्साहात काम करत होते.भटकंतीचं हे टिम वर्क पाहून कौतूक वाटलं ..
तर काल फ्रेंडशिप डे सुद्धा होता.. !
या निमित्ताने ११० झाडांना निसर्गाच्या कुशीत नवजीवन देऊन आम्ही असाही मैत्री दिवस साजरी केला. झांडासारखा निस्वार्थी मित्र कुणी नाही. ते सावली देतात, फळं, फुलं देतात, औषधही देतात, सरपण देतात, आणि महत्वाचं म्हणजे ते ॲाक्सिजन देतात. आपल्या पर्यावरणाचं संतुलन झाडांनी राखलयं म्हणुन आपण जगू शकतोय.. हि काळ्या दगडावरची रेघ आहे ..
पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झालेले गौतमबुद्ध, झाडांसाठी आग्रही असणारे सम्राट अशोक, जंगल जपली जावीत म्हणुन सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज , आणि वडाच्या झाडाला आपल्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीदचिन्ह करणारे कर्मवीर आण्णा ..आणि वृक्ष चळवळ हाती घेतलेले सयाजी शिंदे,
या सर्वांच्या प्रेरणेतून हा वृक्षरोपणाचा छोटासा कार्यक्रम टिम भटकंतीच्या माध्यमातून पार पाडला.
पुढे उरलेल्या वेळात, आमच्या आवडत्या बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन सर्वांनी फुल्ल धमाल-मजा-मस्ती करत पाण्यात मनसोक्त उड्या मारत हा दिवस एन्जॅाय केला.
चार वाजता, झणझणीत चिकन, तांदळाची भाकरी, भात असं पोटभर जेवण करून परतीचा मार्ग धरला…
तर, टिम भटकंती हा उपक्रम दरावर्षी राबवणार आहे.
तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. 😊
वृक्षवल्ली आम्हां सोयरे ..!
#टिम_भटकंती
हिंदू तरुणाला दाढी पाहून मारहाण; धर्म जाणून घेण्यासाठी अंतर्वस्त्रे काढली
28 तास लटकलेल्या अवस्थेत साधू चा मृतदेह; भाजप आमदारासह तिघांवर गुन्हा दाखल
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 08,2022, 20:00 PM
WebTitle – Picnic trekking youth is also maintaining social consciousness