व्हॅलेंटाईन डे – मर्दानी लढवय्यी वीर सूपुत्री भीमाच्या लेकीला समर्पित
आजच्या दिवशी एक इतिहास घडला.उत्तरप्रदेशाच्या कानपूर मधील बहमाही गावात तथाकथित उच्चजातीय समाजातील नराधम विकृत मर्दांनी आपली मर्दुमकी गाजविण्यासाठी एका १५ वर्षाच्या मुलीला घरात कोंडून तीन आठवडे तिच्यावर सतत सामुहिक बलात्कार केला.गावातील काही दलित लोकांनी तिची यातून कशीबशी सुटका केली.
एवढे आभाळफाटूनही ती खचली नाही.हार मानली नाही.आत्महत्या केली नाही.
त्या मुलीने काय करावं? वयात येण्याअगोदरच तिचं आयुष्य उध्वस्थ झालेलं.
एक अजान कळी उमलण्याआधीच जातीयवादी मर्दांच्या वासनेची शिकार झाली.आता उरलेलं आयुष्य ती कसे घालवणार? समाज तिच्या घरचे तीला स्वीकारतील? पोलिसात कोर्टात गेल्यावर तिला खरोखर न्याय मिळाला असता? केस तरी दाखल करून घेतली असती?
एवढे आभाळफाटूनही ती खचली नाही.त्या मुलीने हार मानली नाही.तीने आत्महत्या केली नाही.ज्यांनी तिला लुटली त्यांना धडा शिकवण्याची तीने शपथ घेतली.डोक्याला कफन बांधलं काही लोक जमवले.
तिने आदेश दिला त्यांचा वध झाला.
१४ फेब्रुवारी १९८१ म्हणजे आजच्या व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी ती त्याच बहमाही गावात दाखल झाली.
ज्यांनी ज्यांनी बलात्कार केला त्या नराधम विकृत मर्दाना निवडून एका ओळीत उभे केले.
बलात्कार करताना हिंस्त्र पशुप्रमाणे तिच्या शरीराचे लचके तोडणारे लांडगे आज तिच्यासमोर मृत्युच्या भयाने थरथर कापत होते.
तिने आदेश दिला त्यांचा वध झाला.आत्मसन्मानाचा बदला घेतला.
त्या रणरागिनीचे नाव फुलनदेवी !!
ती पोलीस कोर्ट कचेरीत फसली असती तर कदाचित भय्यालाल भोतमांगे सारखी न्यायाविनाच मरून गेली असती.
मी आजच्या दिवशी सर्व माझ्या भगिनींना आवाहन करतो तुमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला फुलनदेवीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल.अर्थात संवैधानिक मार्गाने.
जेव्हा जेव्हा स्त्रियांच्या आत्मसन्मानाचा बलिदानाचा शोषणाचा स्त्रीमुक्तीचा इतिहास लिहिला सांगितला जाईल तेव्हा तेव्हा तुमचे नाव त्यात आदराने घेतले जाईल.
फुलनदेवी जिंदाबाद !!
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)