पुणे : पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम तरुणांनी पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांना NIA ने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ केलेल्या निदर्शनानंतर (PFI) पीएफआय च्या ४१ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली,या प्रकरणी तरूणांवर बेकायदेशीर जमाव जमावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र निदर्शनात “पाकिस्तान जिंदाबाद” च्या घोषणा दिल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.असं वृत्त लोकमत दैनिकाने दिलेलं आहे.
पीएफआय संघटनेवर कारवाई का केली जात आहे?
(PFI) पीएफआय संघटना तपास यंत्रणांच्या रडारवर आली आणि देशभरात १५ राज्यात एकाचवेळी तपास यंत्रणा NIA ने छापेमारी करत ४५ जणांना अटक केली,महाराष्ट्रातही नवी मुंबई,भिवंडी,पुणे,मालेगाव इत्यादि ठिकाणी छापे टाकून तापर्यंत २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने देशभरात PFI विरोधात मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले होते. पीएफआयवरील ऑपरेशनला ‘ऑपरेशन ऑक्टोपस’ असे नाव देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात पीएफआयबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत.नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने टेरर फंडिंग संदर्भात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) शी संबंधित अधिकार्यांवर देशभरात कारवाई करण्यात आली आहे.
PFI Full Form पीएफआय म्हणजे काय?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ((Popular Front of India ; संक्षिप्त: PFI ) ही भारतातील एक इस्लामीक संघटना आहे. 22 नोव्हेंबर 2006 रोजी तीन मुस्लिम संघटनांच्या एकत्रीकरणातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये केरळची नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि तामिळनाडूची मनिता नीती पसाराय यांचा समावेश होता. PFI स्वतःला एक ना-नफा संस्था म्हणून ओळख स्पष्ट करत असते.या संघटनेवर बंदी घातलेल्या सीमी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप करण्यात येतो.
fact check भिकारी के रूप में ५०० लोग,किडनी निकाल ले रहे है, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
फॅक्टचेक – न्यूयॉर्क टाइम्स ने मोदींच्या जागी मगरीचा फोटो छापला का?
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 24,2022, 22:48 PM
WebTitle – PFI Full Form What is PFI? Why is action being taken against the organization?