पटेली म्हणजे बोलघेवडेपणा. हा शब्द प्रत्येक मुंबईकराच्या शब्दकोषात सापडणार नाही. मुंबईतल्या लुंपेन वर्गाच्या तोंडी हा शब्द नक्की ऐकू येईल. लुंपेन केवळ आर्थिक अंगाने नव्हे. कित्येक पिढ्या मुंबईत राहणारा आणि आपल्या डोळ्यादेखत आपल्या हातून सुटणारी मूंबई पाहणारा हा वर्ग आहे. या वर्गाकडे सांगण्यासारख, व्यक्त होण्यासारखं खूप काही आहे. ते व्यक्त होण म्हणजे पटेली…
nostalgia
पटेली मधला मुंबईचा nostalgia पटेलीच्या कव्हर मधून नेमका व्यक्त होतोय. गिरण्या, चिमणी,
कॅरम बोर्डवर लटकणारा फोकस, दाटून आलेला अंधार आणि या अंधारात मागे उभे राहणारे स्कायस्क्रॅपर जे हळूहळू सगळं गिळंकृत करत उभे आणि आडवे पसरत चालले आहेत. आजही गीरणगावात शिल्लक असलेल्या गिरण्यांच्या भिंती, चिमण्या आणि भले मोठे गेट पाहिले एक nostalgia दाटून येतो. हे कव्हर पाहून नेमकं तसच वाटत.
मी जेव्हा जेव्हा बालपण आठवतो तेव्हा तेव्हा बालपणीची संध्याकाळ या पिवळ्या बल्बच्या प्रकाशात पाहतो. काही तरी सुटत चाललय जे आपण शब्दात मांडू शक्त नाही आणि आपण केवळ एक प्रेक्षक म्हणून ते पाहण्या पलीकडे काहीही करू शकत नाही ही भावना दाटून येते. पटेली केवळ कथा नव्हे तर एक महत्वाचा दस्तावेज ठरणार आहे. जे काही सुटत चाललय ते अविनाशने नेमकं टिपून काढलय.
अविनाश किनीकरला पटेलीच्या प्रकाशनासाठी खुप खुप शुभेच्छा !
‘पटेली‘ ची प्री बुकिंग सुरू!
प्री बुकिंग किंमत रू २१०/-(घरपोच)
मुळ किंमत रू २५०/-
प्री बुकिंग साठी संपर्क
टिंब +91 98192 45972
संवाद ग्रंथ वितरण +91 9869377806
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)