परभणी : परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी एका व्यक्तीने शहराच्या मध्यभागी उभारलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती. या घटनेचा निषेध करत आंबेडकरवादी संघटनांनी 11 डिसेंबर रोजी जिल्हा बंदची हाक दिली होती. बंददरम्यान नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले, घोषणा दिल्या आणि “तत्काळ न्याय” मिळावा, अशी मागणी केली. मात्र, आंदोलनाला पुढे हिंसक वळण लागलं आणि काही ठिकाणी जाळपोळ व दगदफेकीच्या घटना घडल्या.यामध्ये परभणी पोलिसांनी कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती,न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीचे नाव सोपान दत्तराव पवार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय किंवा कोणत्याही उकसाव्याशिवाय हा प्रकार केला असून, घटनास्थळीच त्याला पकडून जमावाने धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
आंदोलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल केले असून 50 पेक्षा अधिक लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भीमनगर आणि प्रियदर्शिनी नगरसारख्या दलित वसाहतींतील महिला आणि युवकांचा समावेश आहे.
सोपान दत्तराव पवार ने केलेल्या कृत्याचा निषेध म्हणून परभणी येथे आक्रोशीत आंबेडकरी समाजाने आंदोलने केले होते.यावेळी काही ठिकाणी दगडफेक जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या,यामध्ये परभणी पोलिसांनी कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती,न्यायालयीन कोठडीत त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे,सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन झाला होता अशी माहिती समोर आल्याने या मृत्यू विषयी आणखी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत्यू झालेला युवक कायद्याचे शिक्षण घेत होता
मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हे कायद्याचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले आहे. यामुळे वडार समाजातील एक उच्चशिक्षित तरुण गमावल्याची भावना जनतेत पसरली असून सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन झाला होता
परभणी घटनेच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटर/एक्स वर शेअर केलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन झाला होता.
त्यांची ट्विटर पोस्ट मध्ये म्हटले की, “परभणीमधिल वडार समाजातील भीमसैनिक – सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक, आणि दुःखद आहे.
त्यांनी पुढे असेही म्हटले की,त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायी आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी. याचे चित्रीकरण करण्यात यावे.
फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली याचे पोस्टमॉर्टम केले जावे.”
आम्ही न्यायासाठी लढत राहू”
या घटनेची माहिती बाहेर येताच परभणी पोलिस दलाने जिल्ह्यातील आणि इतर ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या बसेसची सेवा त्वरित बंद केली आहे.
उद्या महाराष्ट्र बंद ची हाक
या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद ची हाक आनंदराज यशवंतराव आंबेडकर
सरसेनानी रिपब्लिकन सेना यांच्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सोपान दत्तराव पवार याला अटक केल्यानंतर काही तासांतच त्याला “माथेफिरू” असल्याचे जाहीर करण्यात आले.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांना सोपान दत्तराव पवार याची काहीही ओळख नाही.
तो परभणीचा रहिवासी आहे की बाहेरून आला आहे, याबाबतही कुणालाच माहिती नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान दत्तराव पवार हा ओबीसी धनगर समाजाचा आहे.
त्याने काहीही विचार न करता हा प्रकार केला असून, त्याचे परिणाम काय होतील, याची त्याला कल्पना नव्हती.
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 15,2024 | 14:55 PM
WebTitle – Parbhani: Somnath Suryawanshi Dies in Judicial Custody Despite Bail Approval
#ParbhaniNews #JudicialCustodyDeath #BailGranted #CustodialDeath #JusticeForSomnath #MaharashtraNews #LegalSystemIndia #HumanRightsViolation #JudiciaryAccountability