मणिपूर व्हिडिओ: मणिपूर मध्ये परिस्थिती हळूहळू सामान्य होत होती की 19 जुलै रोजी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये दोन महिलांना नग्नावस्थेत नराधमांच्या एका गटाने परेड केली. वाढत्या तणावादरम्यान, बिरेन सरकार आता शेजारच्या मिझोराम राज्यातून मेईतेई लोकांना एअरलिफ्ट करू शकते.मिझोरम पोलिसांनी आयझॉल शहरातील मैतेई समुदायाच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सुरक्षा वाढवली आहे. मणिपूरमध्ये दोन आदिवासी कुकी महिलांवर आरोप असल्याप्रमाणे मैतेई समाजातील नराधमांनी क्रूरपणे अत्याचार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मैतेई विरोधात सार्वजनिक आक्रोश होण्याची शक्यता आहे, असे पत्रात म्हटले आहे.त्याची आग मिझोराममध्ये राहणाऱ्या मेईतेई समुदायाच्या लोकांपर्यंत पोहोचली आहे. हे पाहता, मैतेई च्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आयझॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
लोकांची गणना सुरू
पत्रिका ने दिलेल्या वृत्तानुसार आयझॉलमध्ये राहणार्या मैतेई च्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की सरकारने मैतेई लोकांना आयझॉलमधून एअरलिफ्ट करण्याची योजना आखली आहे. मात्र ही मोहीम कधी सुरू होईल, याची तारीख देण्यात आलेली नाही. सुरक्षेची परिस्थिती लक्षात आल्यानंतर, मैतेई लोकांना त्यांच्या सुरक्षेसाठी मिझोराम सोडण्याचे आवाहन करण्यात आले, त्यानंतर मिझो स्टुडंट युनियन (एमएसयू) ने एक मोठे पाऊल उचलले आणि मिझोरामच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये मैतेई विद्यार्थ्यांची जनगणना जाहीर केली.
बिरेन सरकार मेईतीला एअरलिफ्ट करणार!
मणिपूर मधिल तो भीषण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आयझॉलमध्ये राहणार्या मैतेई लोकांना धोका आहे
आणि म्हणून मणिपूर राज्य सरकार मिझोरमच्या लोकांना ऐझॉल-इम्फाळ
आणि ऐझॉल-सिलचर दरम्यान चालणाऱ्या विशेष एटीआर फ्लाइटद्वारे एअरलिफ्ट करण्याची योजना आखत आहे.
धोका वाढला असल्याने मिझोराममधील शैक्षणिक संस्थांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे जेथे धोका होण्याची शक्यता आहे.
हिंसा कधीपासून का सुरू झाली ? थोडक्यात जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
मैतेई हा तिथला हिंदू धर्मीय समुदाय आहे या समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ डोंगराळ भागातील जिल्ह्यांमध्ये आदिवासी एकता मोर्चा काढल्यानंतर 3 मे रोजी डोंघामध्ये दोघांमध्ये प्रथमच संघर्ष झाला.Meitei समुदाय मणिपूरच्या लोकसंख्येपैकी 64.6 टक्के आहे आणि बहुतेक हे सर्व इंफाळ खोऱ्यात राहतात. आदिवासी नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 35.4 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. जर मैतेई लोकांना अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा दिला तर नाग आणि कुकी लोकांच्या सरकारी नोकऱ्या कमी होतील तसेच मैतेई लोक डोंगराळ भागात जमिन खरेदी करून आपलं वर्चस्व प्रस्थापित करतील,आणि त्यामुळे त्यांचे तिथले अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नाग आणि कुकी समुदायांना वाटते.त्यामुळे त्यांनी या मागणीला विरोध केला आहे.
राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे सुमारे 10,000 जवान तैनात करण्यात आले आहेत.मात्र लाखो प्रयत्न करूनही कोणतीही सुधारणा होताना दिसत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत 140 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील बिरेन सरकार या प्रश्नावर आतापर्यंत पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 23,2023 | 19:00 PM
WebTitle – Panic in Mizoram after Manipur video goes viral, govt may airlift