पाकिस्तान : बलुचिस्तानमधील मशिदीजवळ स्फोट, ५२ जणांचा मृत्यू बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला जेथे लोक पैगंबर मुहम्मद यांची जयंती साजरी करण्यासाठी जमले होते.
मस्तुंग शहरातील एका धार्मिक मेळाव्याला लक्ष्य करण्यासाठी हा आत्मघाती हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी मस्तुंग रशीद मुहम्मद सईद यांनी पुष्टी केली आहे की मस्तुंग जिल्ह्यातील अल फलाह रोडवर असलेल्या मदिना मशिदीजवळ झालेल्या स्फोटात किमान 52 लोक ठार आणि डझनभर जखमी झाले आहेत.
पाकिस्तान : बलुचिस्तानमधील मशिदीजवळ स्फोट, ५२ जणांचा मृत्यू
मृतांमध्ये डीएसपी नवाज गशगुरी यांचाही समावेश आहे. मस्तुंग शहरातील सहाय्यक आयुक्त अत्ता अल-मुनैम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंग शहरातल्या मदिना मशिदीजवळच हा मोठा स्फोट झाला,याठिकाणी मोठ्याप्रमाणावर लोक ईद अल-मिलाद अल-नबी साजरी करण्यासाठी जमा झाले होते.
पोलिसांनी सांगितले की, जखमींना दोन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मस्तुंग शाह येथील दोन पोलीस अधिकाऱ्यांनी मृतांच्या संख्येबाबत माहिती दिली.
गृहमंत्री सरफराज बुगती यांनी या स्फोटाचे वर्णन ‘घृणास्पद कृत्य’ असे केले आहे.
सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये बचाव कर्मचारी आणि स्थानिक लोक जखमींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही
अद्याप कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.
लोकांना मदिना मशिदीतून जमवून मिरवणुकीत सामील व्हावे लागले. या स्फोटात किमान सहा जण ठार झाल्याचे अत्ता अल-मुनईमने सुरुवातीला सांगितले होते.
बलुचिस्तानमध्ये मिरवणुकीत झालेल्या स्फोटाची चौकशी करण्याचे आदेश हंगामी मुख्यमंत्री मीर अली मर्दान खान डोमकी यांनी दिले आहेत.
त्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की “समाज विघातक घटक कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत
आणि शांततापूर्ण मिरवणुकांना लक्ष्य करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
दुसरीकडे, कार्यवाहक माहिती मंत्री जॉन अचकझाई यांनी संपूर्ण प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.
बलुचिस्तान सरकारचे कार्यवाहक माहिती मंत्री जॉन अचकझाई यांनी सांगितले की, मस्तुंग बॉम्बस्फोटानंतर क्वेटाच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
ते म्हणाले की, बलुचिस्तान सरकारच्या सूचनेनुसार एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आले असून गंभीर जखमींना क्वेट्टा येथे पाठवले जात आहे.
क्वेट्टाच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे
बलुचिस्तानचे कार्यवाहक मुख्यमंत्री मीर अली मर्दान खान डोमकी यांनी मस्तुंगमधील मिरवणुकीवर झालेल्या स्फोटाचा निषेध केला असून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 29,2023 | 16:40 PM
WebTitle – Pakistan: Bomb blast near mosque in Balochistan, 52 killed