नवी दिल्ली: देशात एकीकडे महिलांच्या अत्याचार संबंधित घटनांमध्ये वाढ झालेलीय पाहायला मिळत असतानाच,नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB The National Crime Records Bureau ) ने भारतातील हरवलेल्या महिला आणि मुलींच्या संख्येची एक नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. एनसीआरबी डेटाचा हवाला देत केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, एकट्या 2021 वर्षामध्ये देशभरातून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3,75,058 महिला बेपत्ता झाल्या आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या अहवालानुसार,NCRB डेटा मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत जिथे 2019 ते 2021 पर्यंत सर्वाधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.आकडेवारीनुसार 2019 मध्ये मध्य प्रदेशातून 52,119, 2020 मध्ये 52,357 आणि 2021 मध्ये 55,704 महिला बेपत्ता झाल्या आहेत, तर महाराष्ट्रात 2019 मध्ये 63,167, 58,735 आणि 2019 मध्ये 58,204, 520 2020 मध्ये 55,704 महिला बेपत्ता झाल्या आहेत.
संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी
सन 2021 मध्ये एकूण 90,113 मुली (ज्या 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत) बेपत्ता झाल्या,
त्यापैकी सर्वाधिक 13,278 मुली पश्चिम बंगालमधील होत्या.
2019 ते 2021 या कालावधीत देशभरातून एकूण 10,61,648 महिला बेपत्ता झाल्या आहेत.
याच कालावधीत 2,51,430 मुली बेपत्ता झाल्या आहेत.
“महिलांवरील गुन्ह्यांचा तपास आणि खटला चालवण्यासह कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी आहे,”
असे गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
यात लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध प्रभावी कारवाईसाठी फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा, 2013 लागू करण्यासह महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकारांचा उल्लेख आहे.
मात्र केवळ सुधारणा,उल्लेख धोरण असून उपयोग आहे का? जमिनी वास्तव लक्षात घेणे गरजेचे आहे,महिला बेपत्ता होणे ही बाब गंभीर आहे,महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर आहे.देशभरात त्याचा प्रत्यय येत असतो.
समाजातील सर्वच घटकांनी महिलांना समान न्याय समान दर्जा आणि सुरक्षा देण्यासाठी स्वत:मध्येच अगोदर बदल करण्याची नितांत गरज आहे.याशिवाय कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे.घरात सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि बाहेरही सुरक्षित वातावरण निर्माण करणं हे काम सामाजिक आणि राजकीय दोन्ही पातळीवर करणे गरजेचे आहे.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 28,2023 | 14:50 PM
WebTitle – Over 1 million women went missing across the country from 2019 to 2021 NCRB