मुंबई : Maharashtra Political Crisis : मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठ्या बंडानंतर त्यांच्यासहित शिवसेनेचे अनेक नेते ‘नॉट रिचेबल’ झाले होते. या पार्श्वभूमीवर काल शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे या नेत्यांशी संवाद साधला.महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे भाजपने वेगळी रणनिती आखली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे.या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस मीडियासाठी ‘नॉट रिचेबल’ झाले असल्याची माहिती समोर आलीय.सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्याची रणनीती आणखण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीसांचा सागर बंगला गोपनीय हालचालींचं केंद्र बिंदु ठरला आहे.
सरकारमधील हालचालींबाबत फडणवीसांचा सावध पवित्रा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या मीडियासाठी ‘नॉट रिचेबल’ असतील अशी माहिती झीचोवीस तास या वृत्तवाहिनीने दिली आहे.यामागचे प्रमुख कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस सध्या सत्तेचा नवा प्रयोग यशस्वी करण्यासाठी रणनीती आखत आहेत अशी माहिती मिळत आहे. अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेत सत्तेच्या अध्यायाचे एकेक पान तयार करीत आहेत. मलबार हिलवर समुद्राला लागून फडणवीस यांचा सागर हा बंगला सध्या गोपनीय हालचालींचे केंद्र बनला आहे.
सत्तेची स्क्रिप्ट ते लिहीत आहेत. राज्यसभा, विधान परिषदेतील विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर त्यांची नजर आहे. फडणवीस-अजित पवार प्रयोग फसला. राजस्थानमध्येही आपटी खावी लागली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हे बघितले जात आहे. नियोजन त्यांनी खूप आधीपासून केलेले होते…पण कुठेही त्याची वाच्यता न करण्याचे भान त्यांनी बाळगले आहे.
राज्यातील राजकीय पेच सुप्रीम कोर्टात
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय कोंडीच्या (Maharashtra Political Crises) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर (Jaya Thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. जया ठाकूर यांनी याचिकेत मागणी केली आहे की, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी त्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला सोडला.
याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भावनिक आवाहन केलं होतं.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
शिवसेना आमदार सूरत वरून पळाला,बेशुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन दिलं
400 हून अधिक सीए चिनी कंपन्यांना मदत करत होते,कारवाई ची तयारी
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 23 2022, 10:05 AM
WebTitle – Opposition Leader Devendra Fadnavis ‘not reachable’