भारतात जातीयवादाच्या घटना या समाजाचा एक काळाडाग म्हणून राहिला आहे.जो कितीही सुसंस्कृत आणि महान संस्कृती म्हणून मिरवले तरी पुसला जात नाही,तर त्यात दिवसेंदिवस भरच पडत असते.भारतासारख्या देशात तथाकथित उच्चजातीयांकडून मागासवर्गीय समाजाच्या संदर्भात केली जाणारी वक्तव्ये आणि वागणूक ही अतिशय अमानवी असल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
केवळ समाजच नाही तर मागासवर्गीय समाजातील विविध पक्षीय नेते हे त्यांच्या राजकीय योगदान कार्य कर्तृत्व यापेक्षा जातीच्या पातळीवर पाहिले आणि जोखले जातात आणि यावरून त्यांच्यावर अतिशय हिणकस शेरेबाजीही केली जाते.
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना ही भारतात सर्वसाधारण गोष्ट बनली आहे.त्यांच्यावर केली जाणारी वक्तव्ये टीका हेटाळणी ही इथल्या तथाकथित उच्चजातीय लोकांची अमानवीय संस्कृती कायम ठळक करत असते.मात्र तरीही यात फरक पडत नाही तर हे अधिकाधिक विषारी आणि द्वेषयुक्त होत आहे.
अलिकडे सोशल मिडियात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी काही जातीयवादी ठरवून बदनामीकारक मजकूर सोशल मिडियात प्रसारित करत असतात.आणि त्यातून विकृत आनंद मिळवत असतात.हिणकस विषारी द्वेषयुक्त गोष्टींतून आनंद मिळवण्याची संस्कृती जगाच्या पाठीवर खचितच असावी.
असाच प्रकार आजही समोर आला आहे.आणि हा प्रकार करणारे केवळ सामान्य लोक नाहीत.तर अधिकृत वेबसाईट असणाऱ्या संस्था देखील आता या गोष्टी करू लागल्या आहेत. Urban Dictionary ही इंटरनेटवर तशी लोकाना माहीत असावी.अनेकांनी त्यावर काही शब्द सर्च केले असतील. त्यातून माहिती मिळवली असेल शब्द शोधले असतील.
या Urban Dictionary चे ट्विटर हँडल आहे.या हँडलला अधिकृत असा ब्लुटिक चा बॅज सुद्धा आहे.
ज्यामुळे हे हँडल याच वेबसाईटचे आहे हे लोकांना समजते.
या हँडलवरुन काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अतिशय हिणकस भाषेतील ट्विट केले गेले.
Bhimrao Ambedkar: A man who did a lot of studies b… https://t.co/WoPtEP7cNj pic.twitter.com/rENs1LSsM0
— Urban Dictionary (@urbandictionary) June 17, 2021
या ट्विट नंतर ट्विटरवर Urban Dictionary च्या विरोधात लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली.
अनेकांनी सदर ट्विट रिपोर्ट करण्याचे आवाहन केले.
अनेकांनी याबाबत संबंधित सरकारी अधिकारी नेत्यांच्याही निदर्शनास ही गोष्ट आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र हे ट्विट हटवले गेले नाही.
आणि आज मात्र Urban Dictionary ने कहर केला.बहुजन समाज पार्टी च्या अध्यक्षा मायावती यांच्या चारित्र्यावर अतिशय हिणकस शब्दात शेरेबाजी करत ट्विट केले गेले.हे ट्विट इथे उल्लेख देखील करता येणार नाही अशा अतिशय गलीच्छ भाषेत करण्यात आले आहे.तसेच या ट्विट मध्ये बसपाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचाही आक्षेपार्ह उल्लेख आहे तसेच समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे.
https://twitter.com/urbandictionary/status/1405842925519618048
या घटनेमुळे ट्विटरवर लोक प्रचंड संताप व्यक्त करत Urban Dictionary च्या विरोधात कडक कारवाईची मागणी करत आहेत.
तसेच,Urban Dictionary हे हँडल सस्पेंड करण्यात यावे अशीही मागणीही लोक करत आहेत.
प्रसिद्ध पत्रकार आणि बहुजन चळवळींचे अभ्यासक दिलीप मंडल यांनी इलेक्ट्रॉनिक्स
आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना ट्विट करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Dear @rsprasad @GoI_MeitY This is very serious. Take strong action against the culprits. @TwitterIndia @verified @TwitterSafety @manishm @amritat this is unacceptable. There must be some Indian guy behind this bot. Must be arrested. #SuspendUrbanDictionary https://t.co/789io2SK4T
— Dilip Mandal (@Profdilipmandal) June 18, 2021
या आक्षेपार्ह ट्विट विरोधात #SuspendUrbanDictionary हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
भारतातील तथाकथित उच्चजातीय कधी मानवतावादी बनतील? कधी त्यांच्यात माणूसकी निर्माण होईल? कधी ते मानसाळतील हा एक गंभीर प्रश्न तथाकथित उच्चजातीय भारतीय समाजाच्या बाबत निर्माण झाला आहे.
उत्तरप्रदेश,उत्तराखंडमधील विधानसभा बसपा स्वबळावर च लढवणार!
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 18, 2021 21 : 10 PM
WebTitle – offensive tweet on ambedkar mayawati from urban dictionary website outbreaks of people 2021-06-18