कागल,प्रतिनिधी : नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांचे मरण!- कॉ. धनाजी गुरव,दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद, युवा बौध्द धम्म परिषद महाराष्ट्र-कर्नाटक राज्य आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य मार्फत झालेल्या शिक्षण महापरिषदेत कॉ. धनाजी गुरव, राज्य कार्याध्यक्ष, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र राज्य यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपले मत मांडताना “स्वातंत्र्यपुर्व काळात छ. शाहू महाराज यांनी ‘गाव आणि वस्ती तिथे शाळा’ हे धोरण अवलंबले पण सध्या वाड्या वस्त्यावरील २० पटाखालील शाळा बंद करायला सुरूवात झाली आहे किंबहुना गोर गरीब आणि राबणाऱ्या बहुजन समाजाचा शिक्षणाचा हक्क हिरावुन घेतला जात आहे, त्यामुळे शाळेस गळती लागुन याना शिक्षणा पासुन वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.
नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांचे मरण!- कॉ. धनाजी गुरव
हवाई दर दहा किलोमीटर अंतरावर एक शाळा ठेवण्याचे धोरण हे बहुजन मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थाच उध्वस्त होणार आहे त्यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सोबतच समाजानेही या विरोधात उठाव करणे गरजेचे आहे. महामानवांच्या अथक प्रयत्नांनी मिळालेला शिक्षणाचा अधिकार हिरावून घेऊन पुन्हा मनुस्मृतीचे राज्य आणणारे हे नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे बहुजनांचे मरणच आहे.” असे प्रतिपादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय हॉल, गहिनीनाथ नगर, सांगाव रोड कागल येथे झालेल्या या परिषदेचे उद्घाटन माजी शिक्षण व ग्राम विकास मंत्री मा. आमदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी भैय्यासाहेब माने (संचालक केडिसीसी) राज्य शिक्षक नेते मा. सदानंद भोसले, राज्य सचिव युवा बौद्ध धम्म परिषद मा. सतिश भारतवासी, ज्येष्ठ नेते मा. परशराम कीर्तीकर, राष्ट्रीय काँग्रेस कागल तालुका अध्यक्ष मा. शिवाजी कांबळे,
जिल्हाध्यक्ष युवा बौद्ध धम्म परिषद अभि. बापूसाहेब राजहंस, अनिसचे जेष्ठ कार्यकर्ते मा. बाबासाहेब माने सर, प्रा. डॉ. संजय साठे,
मा. शफिक देसाई, मा. शंकर गावित, कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता युवा बौद्ध धम्म परिषद मा. अनिता गवळी,
कॉ. गौतम कांबळे, मा. अनुप्रिया कदम, मा. नीलाप्पा ऐवळे गुरुजी, मा. विजय पोवार जिल्हा सरचिटणीस समता शिक्षक परिषद,
मा. अमित कांबळे सर, मा. मंदाताई सोनताटे, समता सैनिक दलाच्या मा. ज्योती डोंगरे आणि सुनीता खिलारे,
मा. भास्कर कांबळे गुरुजी, मा. श्रीकांत मिठारे गुरुजी, मा. योगेश कांबळे,
प्रा. रविदास पाडवी, प्रा. संदीप गावित, मा. तानाजी भोसले, मा. भगवान कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष मा. उत्तम कांबळे यांनी
तर प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष प्रा. किरण भोसले यांनी केले.
यावेळी प्रा. डॉ. किशोर खिलारे, मा. महावीर माने साहेब माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य,
जिल्हा आरोग्य अधिकारी मा. डॉ. योगेश साळे साहेब यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष भोसले यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. प्रभुदास खाबडे यांनी मानले.
शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये – प्रा. किरण भोसले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on NOV 29,2022, 11:32 AM
WebTitle – New education policy is the death of Bahujans!- Com. Dhanaji Guruv




















































