नीट 2021 : नीट परीक्षेच्या तारखा अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत.केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी याबाबत एक घोषणा केली आहे.शिक्षणमंत्र्यांनी ट्विट केले की NEET (UG) 2021 परीक्षा 12 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 1 ऑगस्टला होणार होती.या वेळी कोविड -19 प्रोटोकॉलची संपूर्ण काळजी घेतली जाईल,असे त्यांनी सांगितलं आहे.अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून एनटीएच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले की कोविड -१९ प्रोटोकॉलचा विचार करतासर्व विद्यार्थ्यांना केंद्रातच फेस मास्क चे वाटप केले जाईल.
या व्यतिरिक्त प्रवेश व बाहेर जाण्यासाठी वेळेचा स्लॉट निश्चित केला जाईल.
कॉन्टॅक्टलेस नोंदणी,सॅनिटायझेशन आणि फिजिकल डिस्टन्सिंगसह आसन व्यवस्था निश्चित केली जाईल.
फिजिकल डिस्टन्सिंग अंतराचे निकष पार पाडण्यासाठी ज्या शहरांमध्ये परीक्षा घ्यायची आहे त्यांची संख्या 155 वरून 198 वर करण्यात आली आहे. 2020 च्या तुलनेत परीक्षा केंद्रेही 3862 करण्यात आली आहेत.
The NEET (UG) 2021 will be held on 12th September 2021 across the country following COVID-19 protocols. The application process will begin from 5 pm tomorrow through the NTA website(s).
— Dharmendra Pradhan (मोदी का परिवार) (@dpradhanbjp) July 12, 2021
कोरोनाच्या प्रादुर्भावाने प्रभावित झालेली व्यवस्था
कोरोना विषाणूमुळे देशातील शिक्षण व्यवस्था अत्यंत विचलित झाली आहे.
महामारीमुळे मंडळाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत.
यासह उच्च शिक्षणात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षाही पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.देशभरातील लाखो विद्यार्थी NTA NEET 2021 नोंदणीच्या तारखेची प्रतीक्षा करीत होते.
अर्ज कधीपासून करू शकतो?
NEET UG 2021 Application: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की अर्ज करण्याची प्रक्रिया मंगळवार, 13 जुलैपासून सुरू होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) nta.ac.in किंवा ntaneet.nic.in या संकेतस्थळावर या अर्जाची लिंक जारी करण्यात आली आहे.दोन्हीपैकी कोणत्याही वेबसाइटला भेट देऊन विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात.
यापूर्वी ऑगस्टमध्ये परीक्षा होणार होती
देशभरातील लाखो विद्यार्थी NEET UG 2021 च्या परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा करीत होते. कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.यासंदर्भात सविस्तर माहिती जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून बर्याच दिवसांपासून केली जात होती. यापूर्वी परीक्षेची तारीख १ ऑगस्ट अशी देण्यात आली होती, परंतु अर्जाच्या संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती.आता ती तारीख जाहीर झाली आहे.
एमपीएससी परीक्षा,तारखांचा गोंधळ; नेमकं काय झालं?
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on March 13, 2021 21 : 30 PM
WebTitle – NEET 2021 Updates: Medical Exam Registration Begins 2021-07-13