इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा वर्क-लाइफ बॅलन्सवर आपला विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी आठवड्यात पाच दिवस काम करण्याच्या संकल्पनेवरही नाराजी व्यक्त केली आहे. सीएनबीसी ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये बोलताना मूर्ती म्हणाले, “मी वर्क-लाइफ बॅलन्सवर विश्वास ठेवत नाही.”
जास्त काम करण्याच्या तास वाढवण्याच्या मतावर ठाम
यावेळी नारायण मूर्ती यांनी असेही सांगितले की, ते आपल्या जास्त काम करण्याच्या तास वाढवण्याच्या मतावर ठाम राहतील आणि जीवनाच्या शेवटपर्यंत त्यात बदल करणार नाहीत. भारतातील वर्क-लाइफ बॅलन्सबद्दल विचारले असता मूर्तींनी सांगितले की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे इंडिपेंडंट डायरेक्टर आणि नॉन-एग्झिक्युटिव्ह चेअरमन के. व्ही. कामत यांनी एकदा म्हटले होते की, भारत एक गरीब आणि विकसनशील देश आहे. त्यामुळे वर्क-लाइफ बॅलन्सवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आव्हानांवर मात करण्यावर भर द्यायला हवा.
1986 मधील आठवड्यात 6 दिवसांऐवजी 5 दिवस कामाचा निर्णय
मूर्तींनी सांगितले की, “1986 मध्ये आठवड्यात 6 दिवसांच्या कामाचा नियम बंद करून 5 दिवस काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी खूप निराश झालो होतो.” त्यांच्या मते, जेव्हा प्रधानमंत्री मोदी दर आठवड्यात 100 तास काम करू शकतात, तेव्हा आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी सकारात्मकतेचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम.
मी शेवटपर्यंत माझे मत बदलणार नाही
मूर्ती पुढे म्हणाले, “भारतासाठी कष्ट करण्याला पर्याय नाही. जरी तुम्ही स्मार्ट असाल, तरी तुम्हाला कष्ट करावेच लागतील.” त्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमांबद्दल अभिमान व्यक्त केला आणि ठामपणे सांगितले की, “मी शेवटपर्यंत माझे मत बदलणार नाही.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, भारताचा विकास आरामात नव्हे तर त्याग आणि कष्टांवर अवलंबून आहे.
त्यांनी असेही म्हटले की, “गंभीर मेहनतीशिवाय भारतासाठी जागतिक पातळीवरील प्रतिस्पर्ध्यांशी सामना करणे कठीण होईल.”
कामाचे तास
मूर्तींनी त्यांच्या कामाच्या तासांबद्दलही माहिती दिली. ते दररोज 14 तास आणि आठवड्यात साडेसहा दिवस काम करत होते.
त्यांनी सांगितले की, “मी सकाळी 6.30 वाजता ऑफिसला पोहोचत होतो आणि रात्री 8.30 नंतर निघत होतो.”
याआधीही मूर्तींनी भारतीयांनी दर आठवड्यात 70 तास काम करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.
त्यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर वर्क-लाइफ बॅलन्सवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.अनेकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत मूर्तीवर टीका केली आहे.
हे ही वाचा.. सुधा मूर्ती अन त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप
Support Jaaglyabharat.com
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 15,2024 | 22:32 PM
WebTitle – narayana-murthy-disappointed-with-5-day-work-week-system